ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

हिंगोलीच्या गणेशवाडीत जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा:1.19 लाखांचा मुद्देमाल जप्त, 6 जणांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


हिंगोली शहरातील गणेशवाडी शिवारात विटभट्टीच्या पाठीमागे मोकळ्या जागेत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर हिंगोली शहर पोलिसांनी सोमवारी ता. 22 सायंकाळी छापा टाकला. या कारवाईत सहा जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून रोख रक्कम, मोबाईल व दुचाकी असा एकूण 1 लाख 19 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात रात्री उशीरा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली शहरासह जिल्हाभरात अवैध व्यवसाय बंद करण्यासाठी छापासत्र सुरु करण्यात आले आहे. पोलिस अधिक्षक निलाभ रोहन यांनी स्थानिक पोलिस ठाण्यासह गुन्हे शाखेचे पथकही स्थापन केले आहे. या पथकाकडून अवैध व्यवसायाची माहिती घेऊन छापे टाकले जात आहेत. दरम्यान, हिंगोली शहरातील गणेशवाडी शिवारात विटभट्टीच्या पाठीमागे मोकळ्या जागेत जुगार सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक देवेंद्रसिंह ठाकुर, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संजय मार्के, जमादार अशोक धामणे, शेख मुजीब, शंकर ठोंबरे, गणेश लेकुळे, संतोष करे, जोगे, जमादार शेख मोहसीन यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी जाऊन छापा टाकला. यामध्ये पोलिसांनी घटनास्थळावरून रोख रक्कम, मोबाईल, दुचाकी असा 1.19 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी जामदार शेख मोहसीन यांच्या तक्रारीवरून मधुकर शिंदे, बंडू घडाळे, अजय होकर्णे, मनिष भगत, गुलाम अकबर, सतीष लोखंडे यांच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. जमादार शेख मोहसीन पुढील तपास करीत आहेत. दरम्यान, शहरात कुठल्याही प्रकारचे अवैध व्यवसाय खपवून घेतले जाणार नाही, अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार असल्याचा इशारा पोलिस निरीक्षक देवेंद्रसिंह ठाकुर यांनी दिला आहे. नागरीकांनीही अवैध व्यवसायाची माहिती पोलिस प्रशासनाला देण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर