ब्रेकिंग न्यूज
⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ…
SP News Maregaon

यवतमाळमध्ये जन्म दाखल्यांचा महाघोटाळा:1500 लोकसंख्येच्या गावात 27 हजार जन्मांच्या नोंदी, 11 आरोपींना अटक; उद्या किरीट सोमय्यांचा दौरा

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील शेंदूरसणी या छोट्याशा गावातून समोर आलेल्या २७ हजार ३४९ बनावट जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, राज्याच्या गृहविभागाने विशेष तपास पथकाची (SIT) नियुक्ती केली असून, एसआयटीने या प्रकरणी ११ आरोपींना अटक केली आहे. बनावट जन्म दाखला घोटाळ्यातील 2 आरोपी अद्याप फरार असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते किरीट सोमय्या उद्या (मंगळवार) यवतमाळ दौऱ्यावर येत आहेत. काय आहे ‘शेंदूरसणी’ जन्म प्रमाणपत्र घोटाळा? शेंदूरसणी गावाची एकूण लोकसंख्या अवघी दीड हजार आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांत ग्रामपंचायतीच्या ‘सीआरएस’ (Civil Registration System) पोर्टलवर तब्बल 27 हजार 349 जन्म आणि 11 मृत्यूच्या संशयास्पद नोंदी आढळल्या. तांत्रिक तपासणीत असे समोर आले की, या ग्रामपंचायतीचा लॉगिन आयडी चक्क मुंबईतून वापरला जात होता आणि मुख्य सर्व्हर हॅक करून या नोंदी करण्यात आल्या होत्या. बिहार कनेक्शन आणि 11 जणांना अटक या घोटाळ्याचे धागेदोरे बिहारपर्यंत पोहोचले आहेत. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार आणि सरकारी पोर्टल हॅक करणारा मास्टरमाइंड बिहारमधून पकडण्यात आला आहे. पोलिसांनी आतापर्यंत तबीश असगर अली, अभिजित मोरे, संतोष सूर्यवंशी यांच्यासह एकूण 11 आरोपींना अटक केली आहे. उर्वरित 2 मुख्य आरोपी अद्याप फरार असून, त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी छापेमारी सुरू केली आहे. राज्याच्या सायबर विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक यशस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील ‘एसआयटी’ या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे. किरीट सोमय्यांचा यवतमाळ दौरा बनावट जन्म प्रमाणपत्रांविरोधात किरीट सोमय्या यांनी पहिल्यापासूनच आक्रमक भूमिका घेतली आहे. यापूर्वीही त्यांनी मालेगाव, छत्रपती संभाजीनगर, सिल्लोड इत्यादी ठिकाणी भेट देऊन या घोटाळ्याप्रकरणी प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. आता किरीट सोमय्या उद्या यवतमाळला भेट देऊन जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांशी चर्चा करणार आहेत. यासंदर्भात किरीट सोमय्या यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर पोस्ट करून माहिती दिली आहे. सिल्लोडमध्ये 4 हजार 700 हून अधिक संशयित दरम्यान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही जन्मप्रमाणपत्र घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यात 10 हजार 68 बांगलादेशी नागरिकांना जन्म प्रमाणपत्र देण्यात आले आहेत. संभाजीनगर शहरात 2 हजार 448, तर सर्वाधिक 4 हजार 730 बांगलादेशी नागरिक हे एकट्या सिल्लोड तालुक्यात वास्तव्यास आहेत. त्यांनी जन्म प्रमाणपत्र मिळण्यासाठी प्रशासनाकडे अर्ज केले आहेत. त्यांच्या प्रत्येक अर्जाची आणि कागदपत्रांची पडताळणी करावी, अशी मागणी भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केली होती.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर