ब्रेकिंग न्यूज
Maratha OBC Reservation: मराठा आरक्षणाचा वाद पुन्हा पेटणार? जरांगेंच्या आक्रमकतेला उत्तर देण्यासाठी OBC सम… India Vs Sri Lanka : ‘सरफराज खानला क्लियारिटी द्या…’, गंभीरला झापलं! मुंबईकर खेळाडूसाठी मैदानात उतरला 765… Chandrapur : खेळता खेळता बाळाने ट्यूबचं टोपण गिळलं,कुटुंबियांच्या काळजाचा ठोका चुकला, पुढे काय घडलं? उभ्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक; तरुण गंभीर जखमी मारेगावच्या वारंवार वीजखंडितीविरोधात नागरिक आक्रमक; सात दिवसांचा अल्टिमेटम Kolhapur: चारित्र्याचा संशय, गाडीवरून जातानाच बिनसलं, पतीनं…, भरदिवसा कोल्हापूरच्या रस्त्यावर थरार Konkan Railway: कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी गुड न्यूज, विशेष रेल्वेला अतिरिक्त थांबे, पण कुठे? पतीच्या व्हॉट्सॲपवरून नंबर घेतला, त्याला अडचण सांगितली, 26 वर्षांच्या विवाहितेला ‘ती’ चूक भोवली, छ. संभाजी… FDA News | अन्नाच्या नावाखाली काळा धंदा! FDA कडून पर्दाफाश | Tukaram Mundhe News | Special Report Satish Maratha Murder : ‘प्रत्येक चौकात मीच टिकणार…’, सतीश मराठावर 39 सपासप वार करण्याआधी राहुलचा शेवटचा …
SP News Maregaon

ठाकरे बंधूंसोबत लढूनही मनसे मुंबईत भाजपसोबत?:भाजप-मनसे समीकरण पुन्हा चर्चेत; मात्र, राज ठाकरेंनी शक्यता फेटाळली

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मुंबई महापालिकेच्या सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला असून भाजप मोठी राजकीय चाल खेळण्याच्या तयारीत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून समोर येत आहे. राज ठाकरे यांच्या मनसेकडून भाजपच्या महापौरपदाच्या उमेदवाराला पाठिंबा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भाजप, शिंदे यांची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना सोबत घेतल्यानंतर महापौरपदाच्या निवडणुकीत संख्याबळ मजबूत करण्यासाठी भाजप सक्रिय झाल्याचे संकेत आहेत. महायुतीचे एकूण संख्याबळ 121 पर्यंत नेल्यानंतर मनसेच्या 6 नगरसेवकांबाबतही चर्चेची दारे उघडल्याची माहिती मिळत आहे. मात्र, दुसरीकडे राज ठकारे यांनी ही शक्यता फेटाळली आहे. मनसे भाजपला पाठिंबा देणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. मुंबई महानगरपालिकेच्या 227 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. भाजपने 89 जागांवर विजय मिळवला असून सत्तास्थापनेसाठी आवश्यक असलेल्या 114 आकड्यापासून तो काही पावले दूर आहे. महायुतीतील भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेने एकत्रितपणे निवडणूक लढवली होती. शिंदे गटाच्या शिवसेनेला 29 जागांवर यश मिळाले. या दोन्ही पक्षांची बेरीज 118 होते; मात्र स्थैर्यासाठी आणखी पाठिंबा मिळवण्याची रणनीती आखली जात असल्याचे समजते. यावेळी ठाकरे बंधूंनी एकत्र येत निवडणूक लढवली होती. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला 65 जागा मिळाल्या, तर राज ठाकरे यांच्या मनसेला 6 जागांवर समाधान मानावे लागले. हीच मनसेची संख्या आता महापौर निवडणुकीत निर्णायक ठरू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मनसेने भाजपला पाठिंबा दिल्यास महापौरपदाच्या लढतीत समीकरणे अधिक स्पष्ट होतील, असे राजकीय जाणकारांचे मत आहे. दरम्यान, भाजपने संघटनात्मक पातळीवरही महत्त्वाची हालचाल केली आहे. गणेश खणकर यांची मुंबईतील भाजप गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. संघाचा स्वयंसेवक, बूथ प्रमुख, भाजपचा सरचिटणीस ते नगरसेवक असा प्रवास असलेल्या खणकरांनी या निवडीबद्दल पक्षाचे आभार मानले. भ्रष्टाचारमुक्त मुंबई हे आमचे ध्येय असेल. मुंबईकरांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आणि मुख्यमंत्र्यांनी सुरू केलेल्या विकासकामांना गती देण्यासाठी आम्ही काम करू, असे त्यांनी म्हटले. त्यांच्या निवडीमुळे महापालिकेतील भाजपच्या रणनीतीला नवे बळ मिळाल्याचे मानले जात आहे. महापौर निवडीसाठी राजकीय गणिते अधिक गुंतागुंतीची मुंबई महापालिकेच्या अंतिम निकालानुसार भाजप 89, शिवसेना ठाकरे गट 65, शिंदे यांची शिवसेना 29, काँग्रेस 24, मनसे 6, एमआयएम 8, राष्ट्रवादी काँग्रेस 3, समाजवादी पक्ष 2 आणि एनसीपी (शरद पवार गट) 1 अशा जागा मिळाल्या आहेत. या आकड्यांवरून कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्याने महापौर निवडीसाठी राजकीय गणिते अधिक गुंतागुंतीची झाली आहेत. त्यामुळे लहान पक्ष आणि अपक्षांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. महापौरपद खुल्या गटातील महिलांसाठी राखीव यात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे महापौरपदाचे आरक्षण. मुंबई महापालिकेचे महापौरपद यावेळी खुल्या गटातील महिलांसाठी राखीव झाले आहे. त्यामुळे पुढील महापौर महिला असणार हे निश्चित झाले आहे. सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपकडून कोणत्या महिला उमेदवाराची निवड होते, याकडे उत्सुकतेने पाहिले जात आहे. मात्र त्याहून महत्त्वाचे म्हणजे मनसेचा अंतिम निर्णय काय असेल, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर