ब्रेकिंग न्यूज
10 सेकंदांचा थरार! लिफ्टमध्ये वर जाताना अचानक बसले भूकंपाचे धक्के, नाशिकमधील घटना CCTV कॅमेऱ्यात कैद CRIME : गँगवॉरने नांदेड हादरलं! दोघं दबा धरून बसले, गाडी पेट्रोल पंपावर वळली अन् सांडला रक्ताचा सडा; इंद्रज… Ravindra Jadeja : ड्रेसिंग रूमममध्ये रविंद्र जडेजाने असं काय केलं की, गंभीर खळखळून हसला; Video आला समोर मारेगावच्या हेमंतची UPSC-CAPF मध्ये दमदार भरारी! Success Story : नोकरीच्या मागे न लागता घेतला व्यवसायाचा निर्णय, बंदिस्त शेळीपालन केलं यशस्वी, वर्षाला 7 लाख… पश्चिम बंगालच्या उपसागरात घोंगावतंय मोठं संकट, विदर्भ-मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा अलर्ट, हवामान विभागाने … CRIME : बालपणापासून जिवाभावाच्या मैत्रिणी अन् एकत्र मृत्यूला कवटाळलं! नातेवाईकांकडे दुपारी जेवण अन् 4 तासात… Eknath Shinde: सुप्रीम कोर्टात सुनावणी अन् एकनाथ शिंदे अचानक दिल्लीत! पीएम मोदींची घेणार भेट, बैठकीचं कारण … IND vs SL : श्रीलंका क्रिकेटचा टीम इंडियासोबत ‘गोलीगत धोका’! गंभीरच्या लगेच लक्षात आला शातीर डाव, शुभमनचाही… Chandrpur: हॉस्टेलमध्ये पाचवीमध्ये शिकणाऱ्या 2 भावांवर मित्रांकडून अनैसर्गिक अत्याचार, चंद्रपूर हादरलं
SP News Maregaon

खासदारांचा मान-सन्मान म्हणजे 50 ते 75 कोटी रुपये:मतदारसंघाचा निधी पडून, मग विकास करायला तिकडे गेलात की कंत्राटं घ्यायला?- संजय राऊत

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


संजय दिना पाटील यांनी काही बोलण्यापूर्वी खासदारकीचा राजीनामा द्यावा. उद्धव ठाकरेंशी भांडण नव्हते तर त्यांनी पक्ष सोडायला नको होता. ज्यांच्याशी त्यांचे भांडण आहे त्यांच्यासंदर्भात मातोश्रीवर येत चर्चा करायला हवी होती. या सर्व गोष्टीचा आणि पक्ष सोडण्याचा काही संबंध नाही. ते हे का सांगत नाहीत की 13 तारखेला त्यांच्याकडे 15 कोटी रुपयांचे खोके आले, त्यानंतर 14 तारखेला पुन्हा 5 कोटी रुपये आले मग मी दिल्लीतील पक्षाच्या बैठकीचा व्हीप धुडकावला आणि गायब झालो त्यानंतर मला उरलेले 35 कोटी रुपये मिळाले हे संजय दिना पाटील यांच्यासह सर्व गद्दारांनी सांगितले पाहिजे, असे उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. संजय राऊत म्हणाले की, नांदेडमध्ये काल रात्री शिवसैनिकांनी काही गद्दार खासदारांच्या गाड्या अडवण्याचे काम केले. दोन का 3 जणांसाठी 850 पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. तुम्ही काय आम्हाला काय सांगता? आम्ही काय इराण सारखे हल्ला करणार होतो का? असा सवाल राऊतांनी केला आहे. 2029 पर्यंत देशाच्या राजकारणात काय होईल याची शाश्वती कोणीही देऊ शकत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एकनाथ शिंदे खूर्चीवर राहतील का नाही याची शाश्चती नाही. महाराष्ट्रात काय होईल हे सांगता येत नाही. आम्ही तुमच्यापेक्षा जास्त पावसाळे बघितले आहेत. पैसा फेको तमाशा देखो सुरू संजय राऊत म्हणाले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचा नाशिक विधान परिषद निवडणुकीत पराभव झाला. भाजपचे सर्व मते गोकुळ गिते यांना पडले पुढच्या दोन तासांमध्ये त्यांनी गोकुळ गितेंना विकत घेत त्यांच्या पक्षामध्ये आणले. पैसा फेको तमाशा देखो हे महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू आहे. शिंदेंनी काल पक्षात आलेल्या 6 खासदारांचा मान सन्मान ठेवू असे म्हटले. मग काय आमच्याकडे त्यांचा मान सन्मान नव्हता का? यांचा मान-सन्मान म्हणजे 50 ते 75 कोटी रुपये आहे. पक्ष सोडणाऱ्यांनी खासदार निधी वापरला नाही संजय राऊत म्हणाले की, निधीसाठी शिंदेंसोबत गेलो असे म्हणणाऱ्या खासदारांनी त्यांचा खासदार निधीमधील पैसे सुद्धा खर्च केलेले नाहीत. प्रत्येकांच्या मतदारसंघासाठी असलेला 15-15 कोटी रुपये निधी पडून आहे. हा निधी तुम्ही का वापरला नाहीत, त्यासाठी तुम्हाला कोणी अडवले होते. विकासासाठी तिकडे गेलो म्हणतात मग खासदारांना मिळणाऱ्या निधीचा वापर का केला नाही. शिंदे गटात गेल्यावर त्यांना कंत्राट मिळणार 200 कोटी 300 कोटी रुपयांचे आणि त्यातील 25 टक्के त्यांच्या घरात जाणार हा त्यांचा मान-सन्मान आहे, मतदारसंघातील जनता काही खुळी नाही. ..तर ही लोकं कुपोषनाने मेली असती संजय राऊत म्हणाले की, बाळासाहेब ठाकरेंच्या वक्तव्याची खिल्ली शिंदे गटाकडून उडवण्यात आली. बाळासाहेब ठाकरेंनी अनेक वृद्धाश्रम आणि पाळणघरं सुरू केली. शिंदे गटात गेलेली लोकं त्याच पाळणाघरातील आहेत. त्यांचे पालन-पोषण मातोश्रीकडून करण्यात आले. नाहीतर हे लोकं कुपोषनाने मेली असती. हे लोकं जनतेची कामे करू शकत नाही ते केवळ कंत्राटदारांचे कामे करतात. जनता त्यांना माफ करणार नाही. उद्धव ठाकरे 27 जून पासून महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. यावेळी ते कार्यकर्ते, पदाधिकारी, जनता यांच्यासोबत चर्चा करणार आहेत. त्यानंतर पुढे काय ते करायचे ठरेल. 50 कोटी गिळले ना, मग गप्प बस खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटात गेलेले संजय दिना पाटील यांच्यावर अत्यंत शेलक्या आणि आक्रमक शब्दांत हल्ला चढवला आहे. संजय दिना पाटील यांनी मुलीच्या उमेदवारीसाठी तमाशा केला आणि उमेदवारी मिळूनही ते खोटं बोलत आहेत. मिंधे गटात गेल्यावर खोटं बोलण्याची सवयच लागतेच. ’50 कोटी गिळले ना, मग गप्प बस. शिवसैनिकांना बंदूक दाखवू नकोस. बंदूक तुझ्या … घालीन, झेड प्लस सुरक्षा काढून समोर ये.’ राऊतांनी भर जाहीरपणे पाटील यांचा ‘साल्या’ आणि ‘..’ असा अपशब्दांचा वापर करत तीव्र शब्दात उद्धार केला.. हे ही वृत्त वाचा
घरात घुसून मारू, सुरक्षा ठेवा नाहीतर बॉम्ब टाकेन!:माझ्या नादाला लागाल तर हॉस्पिटलमध्ये नाहीतर स्मशानात जाल, संजय दिना पाटलांचा ठाकरे गटाला इशारा ठाकरे गटातून कालच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत अधिकृत प्रवेश केलेले खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकार परिषदेत अत्यंत आक्रमक आणि हिंसक भाषेचा वापर करत विरोधकांना उघड आव्हान दिले आहे. “माझं ठाकरे गटाच्या सामान्य कार्यकर्त्यांशी वैमनस्य नाही, त्यांच्यामुळेच मी खासदार झालो. पण जर कोणी माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबाकडे वाकड्या नजरेने पाहिले, तर त्यांनी आधी स्वतःचा मेडिक्लेम आणि लाईफ इन्शुरन्स काढून ठेवावा, कारण माझ्या नादाला लागणारे थेट हॉस्पिटल किंवा स्मशानातच जातील, असा इशारा त्यांनी दिला आहे. वाचा सविस्तर
पैशांनी विकत घेता येणारे कार्यकर्ते आम्ही नाहीत:पक्षांतराच्या चर्चांदरम्यान खासदार संजय जाधवांची प्रतिक्रिया, संजय राऊतांबद्दलही मोठं वक्तव्य शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील खासदारांच्या पक्षांतराच्या चर्चांमुळे राज्याचे राजकारण ढवळून निघाले असताना परभणीचे खासदार संजय हरिभाऊ जाधव यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. आपण घेतलेल्या भूमिकेवर ठाम असल्याचे सांगतानाच कार्यकर्ते पैशांनी विकत घेता येत नाहीत, असे स्पष्ट शब्दांत त्यांनी म्हटले. वाचा सविस्तर

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर