ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

सावरकरांचे विचार मान्य असतील तर सोबत या:नाहीतर तुमच्याशिवाय पुढे जाऊ, आशिष शेलारांनी अजित पवारांना ठणकावले

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर महायुतीतील मित्रपक्षांमधील सख्य संपल्याचे चित्र दिसत आहे. राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी अजित पवार यांच्यावर सडकून टीका करत त्यांना सावरकरांच्या मुद्द्यावरून आरसा दाखवला आहे. “तुम्हाला सावरकरांचे विचार मान्य असतील, तर तुमच्या बरोबर, नाहीतर तुमच्याविना आणि विरोधात शिरलात तर तुमच्या विरोधात आम्ही आमचे काम करू,” अशा अत्यंत कडक शब्दांत शेलारांनी अजित पवारांना ठणकावले आहे. भाजप नेते रवींद्र चव्हाण यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा उल्लेख केल्यानंतर अजित पवार यांनी टीका केली होती. या टीकेला उत्तर देताना आशिष शेलार यांनी उपरोक्त इशारा दिलेला आहे. ते म्हणाले, आमचा पक्ष स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांवर चालणारा आहे. रवींद्र चव्हाण म्हणालेच आहेत की आम्ही सावरकरांचे भक्त आहोत. सावरकरी विचारांवर चालणारे लोक आहोत. त्यामुळे अजित पवारांच्या पक्षाला सुद्धा सावरकरांचे विचार मान्य करावेच लागतील. याल तर तुमच्या बरोबर न याल तर तुमच्याविना आणि विरोधात शिरलात तर तुमच्या विरोधात आम्ही आमचे काम करु,” असा इशारा आशिष शेलार यांनी अजित पवारांना दिला. त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या आधी भाजपा आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये जुंपण्याची शक्यता आहे. ठाकरे बंधूंचा त्यांच्या त्यांच्यात बेबनाव आशिष शेलार यांनी यावेळी ठाकरे बंधुंवरही निशाणा साधला. मुंबईकर महायुतीच्या बाजूने आहे. राजकारणात अंकगणित आणि रसायनशास्त्र चालत नाही. अनैसर्गिक रसायनशास्त्र असला आणि गुणधर्म वेगळे असले तर स्फोट होईल. त्यांच्या त्यांच्यात बेबनाव आहे. आदित्य ठाकरे विरुद्ध उद्धव ठाकरेंना माननारी लोकं आहेत. तर दुसरीकडे अमित ठाकरे विरुद्ध राज ठाकरेंची लोकं असा संघर्ष आहेत, असा दावा शेलार यांनी केला. तसेच माझे कुटुंब माझी जबाबदारी, माझे कुटुंब माझे घर इथून रस्त्यावर तरी मुंबईकरांना ते दिसू लागले. सगळी अव्यवस्था आणि बेबनाव असे दोन्ही भावांचे पक्ष आहेत. मनसेच्या सर्व पदाधिकारी यांनी राजीनामा दिला, संतोष धुरी यांचा प्रश्न बघितला. पाटणकर एकनाथ शिंदेंकडे, राऊळ भाजपात आल्या. मोडकळीस आलेली परिस्थिती दोन्ही भावांच्या पक्षाची झालेली आहे, अशी टीकाही आशिष शेलार यांनी केली. निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांची चांदी? मतदानाला अवघे १० दिवस उरले असताना महायुतीमधील हा कलह चव्हाट्यावर आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधील या वादामुळे महाविकास आघाडीला फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मित्रपक्षांमधील या वाकयुद्धामुळे कार्यकर्त्यांमध्ये आणि मतदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर