ब्रेकिंग न्यूज
लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian … Tukaram Mundhe : एफडीएमध्ये आधी काय सुरू होतं? तुकाराम मुंढेंनी मनापासून सगळं सांगितलं; म्हणाले, “माझ्याआधी… मोबाईल बाजूला ठेवायला लावला, कामाच्या ठिकाणी महिलेला मागील खोलीत बोलावले अन्…, छत्रपती संभाजीनगरमधील धक्क… Mumbai Local: गणपती विसर्जनासाठी मध्य रेल्वे सज्ज, मुंबईत 22 विशेष लोकल चालवणार, संपूर्ण वेळापत्रक IND vs WI : भारताविरुद्ध वेस्ट इंडिजची टीम जाहीर! 3 खुंखार खेळाडू घालणार तांडव; 30 वर्षाच्या वादळी खेळाडूचा… घराला एकच दरवाजा, कामे आटोपून झोपली महिला, शेजाऱ्यानं मध्यरात्री पाहिलं, तर…, सांगली हादरलं! गांडूळ खत निर्मितीचा व्यवसाय केला यशस्वी, आता वर्षाला होतीये 7 लाख रुपयांची उलाढाल, सांगितला यशाचा मंत्र नागपुरात सर्वात लांब उड्डाणपूल, CM फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन, पुलाची वैशिष्ट्ये काय? VIDEO
SP News Maregaon

गोदावरी पाटबंधारे कार्यालय नांदेडला हलवण्यास विरोध:मंत्र्यांच्या हकालपट्टीची मागणी करत 12 जूनला निघणार धडक मोर्चा

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे मुख्य अभियंता कार्यालय छत्रपती संभाजीनगरहून नांदेडला हलवण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला मराठवाड्यातून तीव्र विरोध होत आहे. मराठवाडा बहुजन विकास आघाडीने या निर्णयाला ‘राजकीय स्वार्थापोटी’ घेतलेला आणि ‘कॅबिनेट मंजुरीविना’ केलेला मनमानी कारभार म्हटले आहे. त्यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची मंत्रिमंडळातून तत्काळ हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. या अन्यायाविरोधात १२ जून २०२६ रोजी सेव्हन हिल उड्डाणपूल ते गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळ कार्यालयावर भव्य धडक मोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशारा आघाडीचे संस्थापक अध्यक्ष रमेश गायकवाड यांनी दिला आहे. कार्यालय हलवण्याचा निर्णय बेकायदेशीर असल्याचा आरोप करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर हे मराठवाड्याचे मध्यवर्ती मुख्यालय असून, उच्च न्यायालय आणि विभागीय आयुक्तालयासह अनेक महत्त्वाची कार्यालये येथे आहेत. असे असताना, केवळ राजकीय हेतूने हे कार्यालय नांदेडला हलवणे हा छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यावर अन्याय असल्याचे गायकवाड यांनी म्हटले आहे. हा निर्णय तत्काळ रद्द न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला. शेतकरी आत्महत्यांसाठी अधिकारी आणि मंत्री जबाबदार असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आणि मेंढेगिरी समितीच्या अहवालानुसार जायकवाडीला पाणी सोडणे बंधनकारक असताना, ते जाणीवपूर्वक अडवण्यात आले. यामुळे खरिपाची पिके करपली आणि हजारो शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आली. या शेतकऱ्यांच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर ‘सदोष मनुष्यवधाचा गुन्हा’ दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील हे सुरुवातीपासूनच मराठवाडा द्वेषी राहिले असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. त्यांच्याकडून मराठवाडा गोदावरी खोऱ्याचा पदभार तत्काळ काढून घेत त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची थेट मागणी करण्यात आली आहे. या प्रश्नावर मराठवाड्याचे खासदार डॉ. कल्याण काळे आणि आमदार अंबादास दानवे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाब विचारणार आहेत. १२ जून रोजी होणाऱ्या महामोर्चात सर्वपक्षीय नेते, शेतकरी आणि जनतेने मोठ्या संख्येने सामील व्हावे, असे आवाहन रमेश गायकवाड यांनी केले आहे. शासनाने हा निर्णय मागे न घेतल्यास मराठवाड्यात तीव्र आंदोलन छेडले जाण्याची शक्यता आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर