ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

विलीनीकरणावर आधी शरद पवार गट बोलेल, मग आम्ही- सुनील तटकरे:भाजप मित्रपक्ष आहे, पण निर्णय आमचेच; राऊतांच्या टीकेला काहीच महत्त्व नाही

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


आज आम्ही एनडीमध्ये भाजपसोबत सत्तेत आहोत. देशाच्या विकासासाठी आम्ही एक आहोत. भाजपच्या विचारांशी प्रणित एनडीएमध्ये येण्यासाठी भूमिका ज्यांना सोबत यायचे त्यांनी स्पष्ट करण्याची गरज आहे. अजित पवारांच्या नेतृत्वात आमच्या पक्षाची भूमिका ठरली, त्यानुसार आम्ही निवडणूक लढवली आणि जिंकलो, विलीनीकरणाबद्दल शरद पवार गटातील नेते बोलल्यानंतर आम्ही बोलू, असे अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी म्हटले आहे. सुनील तटकरे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस हा भाजपचा मित्रपक्ष आहे. भाजपने कधीही आम्हाला कोणता निर्णय घ्यावा असे सांगितले नाही. आमच्या पक्षाचे निर्णय आम्हीच घेतो भाजप मित्रपक्ष म्हणून आमच्या निर्णयाच्या सोबत आहे. प्रफुल्ल पटेल आणि माझी काही वेगळी भूमिका नाही. शरद पवार यांनी माझी प्रदेशाध्यक्ष म्हणून नेमणूक केली मी यशस्वीपणे काम केले. अजित पवार यांच्या अपघाताची चौकशी करण्यात यावी हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. तर आमची सुद्धा तीच भूमिका आहे. राऊत काय म्हणतात त्याला महत्त्व नाही सुनील तटकरे म्हणाले की, संजय राऊत काय म्हणतात याला मी फारसे महत्त्व देत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने अजित पवार यांच्या नेतृत्वात एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. राज्यातील जनतेने विधानसभेच्या निवडणुकीत यावर शिक्कामोर्तब केला आहे. त्यामुळे प्रत्येक जण टीका करत असतो, संजय राऊत यांची टीका यापेक्षा काही वेगळी असेल असे मला वाटत नाही, विलीनीकरण कुठल्या पक्षाचे कुठल्या पक्षात होणार? सुनील तटकरे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनकरणाच्या संदर्भात शशिकांत शिंदे काय बोलले याबद्दल काही बोलणार नाही. पण इतर सहकार्यांनी ज्या प्रतिक्रिया दिल्या ते अंत्यसंस्कार होण्यापूर्वीच सुरू झाले. विलीनीकरण कुठल्या पक्षाचे कुठल्या पक्षात होणार? याचा खुलासास किंवा माहिती कळाली तर मला बोलता येईल. वडेट्टीवारांनी आमच्या पक्षावर बोलू नये सुनील तटकरे म्हणाले की, विजय वडेट्टीवार यांनी आमच्या पक्षावर बोलण्यापूर्वी चंद्रपूर मनपामध्ये काँग्रेसचा महापौर करावा. काँग्रेस अंतर्गत नगरसेवक पळवापळवी करणाऱ्या विजय वडेट्टीवारांनी आमच्या पक्षाबद्दल फारसे बोलण्याचा प्रयत्न करू नये. त्यांनी महापौर पदाकडे लक्ष दिले पाहिजे. आम्ही अजित पवार यांच्या नेतृत्वामध्ये निवडणूक लढवली आणि 41 जांगावर उमेदवार निवडून आणले. आमचा पक्ष बळकट आहे. नेता निवडीचा अधिकार हा निवडून आलेला आमदारांचा असतो.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर