ब्रेकिंग न्यूज
⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू
SP News Maregaon

यावली- सालसे रस्ता अडीच वर्षांतच उखडला; 14 किमी खड्ड्यांचे साम्राज्य:अपघाताचे प्रमाण वाढले, मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग केवळ बघ्याच्या भूमिकेत‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


यावली-सालसे राज्य मार्गाची अडीच वर्षाच्या आतच चाळण झाली आहे. कोट्यावधी रुपये खर्चून या मार्गाचे काम झाले आहे. मात्र काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाल्याची बाब ‘दिव्य मराठी’च्या पाहणीतून समोर आली आहे. मोहोळ तालुक्यातील यावली पासून पुढे माढा शहरातून कुर्डूवाडी मार्गे करमाळा तालुक्यातील सालसे गावा पर्यंत हा राज्य मार्ग जोडला गेलेला आहे. मात्र माढ्यापासून कुर्डूवाडी पर्यंतच्या या १४ कि.मी च्या अंतरात ठिकठिकाणी खड्डे पडून रस्ताच उखडला गेला आहे. अर्धवट रस्ता, ठिकठिकाणी उखडलेल्या रस्त्यामुळे अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे.भोसरे मधील बागल वस्तीच्या ठिकाणी रस्ता अर्धवट असल्याने रस्त्यात पडलेल्या गॅप मुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या ८ दिवसात लहान मोठे १५ हून अधिक अपघात झाले आहेत. यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी मात्र केवळ बघ्याच्या भूमिकेत असून दुर्लक्ष करीत आहेत. दररोज प्रवास करणारे हजारो वाहनधारक मात्र हैराण झाले असून त्यांच्या जीवाशी खेळ सुरु आहे. डांबर उपलब्ध होत नसल्याचे कारण सा.बा.विभागाकडून देण्यात आले असून किमान त्यापूर्वी प्राथमिक स्वरुपात तरी मुरुमीकरण करायला हवे. यावली सालसे राज्य मार्गावरील रणदिवेवाडी, वेताळवाडी, वडाचीवाडी गावच्या हद्दीत रस्ते उखडले गेले असून ठिक ठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. भोसरे मधील बागल वस्तीच्या ठिकाणी रस्ता अर्धवट असल्याने रस्त्यात पडलेल्या गॅप मुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या ८ दिवसात लहान मोठे १५ हून अधिक अपघात झाले आहेत. इराणच्या युद्धामुळे डांबराचे दर वाढले ^इराणच्या युद्धामुळे डांबराचे दर ९० हजार ते १ लाख रुपये टन झाले आहेत. डांबरी करायचे राहिले आहे. डांबर शॉर्ट असल्यामुळे ठेकेदाराकडून काम करायचे राहिले आहे. काम करून घेतले जाईल. – आनंद नाझरे,(सा.बा. उपविभाग, कुर्डूवाडी)

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर