ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

अवकाळीग्रस्तांना दिलासा!:पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश, चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मराठावाडा, विदर्भ आणि राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. याचे सर्वेक्षण करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले असून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचेही आदेश मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांना दिले आहेत, असे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. सर्वेक्षण करत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाईल. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, अशोक खरात प्रकरणात पोलिसांकडून सर्व बाजूने योग्य तपास सुरू आहे. पोलिसांकडे जी माहिती येते आहे त्या आधारावर पोलिस काम करत आहे. कोणाकडे अजून काही माहिती असेल त्यांनी जर ती पोलिसांना दिली तर तपासाला चालना मिळेल. या प्रकरणी संपूर्ण चौकशी पारदर्शकपणे सुरू आहे. या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी कोणालाही सोडणार नाही असे सांगितले आहे. खरात प्रकरणी चौकशी सुरू चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, खरात प्रकरणी एसआयटी चौकशी सुरू आहे. त्यांना जे जमीनीचे गैरव्यवहार दिसून येतील त्यानंतर त्यावर आम्ही चौकशी करू. पोलिस तपास सुरू असताना दुसऱ्या चौकशा लावणे योग्य नाही. यापुढे कोणाला गैरफायदा घेता येणार नाही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, लाडकी बहीण योजनेचा काही लोकांनी गैरफायदा घेतला असेल तर शासन ते शोधून काढते. नंतर मात्र त्यांना लाभ होणार नाही. काही लोकांनी योजनेचा गैरफायदा घेतला तसा घ्यायला नको होता पण यापुढे त्यांना लाभ मिळणार नाही. राष्ट्रवादी अजित पवार पक्षातील गोष्टींबद्दल मला काही माहिती नाही, असे म्हणत त्यांनी सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला लिहलेल्या पत्रावर बोलणं टाळले. राहुल गांधींवर टीका राहुल गांधी यांना ‘वंदे मातरम’चा नेमका अर्थही माहित नाही. त्यांनी हे राष्ट्रगीत कधी मनापासून वाचले नाही आणि समजून घेण्याचा प्रयत्नही केला नाही. वस्तुस्थिती तर अशी आहे की, त्यांना ‘वंदे मातरम’च्या चार ओळीही नीट म्हणता येत नाहीत, असे म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर राष्ट्रभक्तीच्या मुद्द्यावरून तीव्र शब्दांत निशाणा साधला आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर