ब्रेकिंग न्यूज
⚡ शाळा सुटल्यावर चौथीच्या मुलींना थांबवायचा, कपडे काढून डान्स करायचा अन्…, बीडमध्ये शिक्षकाचं भयंकर कृत्य, … ✦ ⚡ शाळा सुटल्यावर चौथीच्या मुलींना थांबवायचा, कपडे काढून डान्स करायचा अन्…, बीडमध्ये शिक्षकाचं भयंकर कृत्य, … ✦ ⚡ शिवाजी पार्कची दोस्ती, ‘नटसम्राट’ पाहून ढसाढसा रडला होता 1983 च्या वर्ल्ड कपचा हिरो! नाना पाटेकरांच्या क्रि… ✦ ⚡ शेताच्या बांधावरून थेट रुपेरी पडद्यावर! वेगावच्या अजय बदकी यांची ‘हुंकार’मधून दमदार एन्ट्री! ✦ ⚡ शेतकरी ते यशस्वी उद्योजक, नाशवंत भाजीपाल्याने पालटलं नशीब, आता महिन्याला 2 लाखांची कमाई ✦ ⚡ दुष्काळात बीडच्या शेतकऱ्यानं करून दाखवलं, 500 रुपयांच्या खर्चात मिळवलं तब्बल 32 क्विंटल सोयाबीनचे उत्पादन, … ✦ ⚡ लेकीच्या सुखासाठी कर्ज काढलं, पण जावई निघाला…, लग्नानंतर 4 महिन्यांत सगळं संपलं, संजनाचा आईला शेवटचा फोन … ✦ ⚡ Pawanraje Nimbalkar Murder Case : पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाला नवं वळण! पद्मसिंह पाटलांचा पाय खोलात? CB… ✦ ⚡ CRIME : फेसबूक LIVE सुरू असताना थरारक हत्याकांड! मेडिकल स्टोअरबाहेर पेटला वाद अन् ‘स्टिंग ऑपरेशन’ करताना झा… ✦ ⚡ Success Story : शेती करावी तर अशी, तीन पिकातून बीडच्या शेतकऱ्याचं पालटलं नशीब, वर्षाला 8 लाख कमाई, Video
SP News Maregaon

महाराष्ट्राच्या सत्ताकेंद्राजवळ कोण… मराठा की ब्राह्मण?:पुण्यातील कार्यक्रमात भाजप आमदार पवार, खासदार मेधा कुलकर्णींत वाद

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


पुण्यातील सारथी संस्थेच्या एका कार्यक्रमात भाजपच्या राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी आणि भाजपचेच आमदार अभिमन्यू पवार यांच्यात पहिल्या रांगेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या शेजारी रिकाम्या खुर्चीवर बसणे आणि कथित विधानावरून जोरदार वाद झाला. त्यामुळे कुलकर्णी कार्यक्रमातून बाहेर पडल्या. त्यानंतर त्यांनी सांगितले की, आमदार पवार मला म्हणाले “मराठ्यांच्या कार्यक्रमात तुम्ही पहिल्या रांगेत बसणे शोभत नाही, तुम्ही दुसऱ्या रांगेत बसा.’ त्यावर पवार म्हणाले की, ‘एकच खुर्ची रिकामी असल्याने मी अशी विनंती केली होती. यात कोणताही जातीय किंवा वादाचा हेतू नव्हता.’ सारथी संस्थेच्या वतीने लोकसेवा आयोग (यूपीएससी आणि एमपीएससी) परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांच्या आणि त्यांच्या पालकांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन पुण्यात स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा रंगमंदिर येथे शुक्रवारी करण्यात आले होते. तेथे हा प्रकार घडला. खा. कुलकर्णी यांची या पूर्वी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांशी तसेच भाजपच्या एका नेत्याशी वादावादी झाली होती. तेव्हा काही ज्येष्ठांनी त्यांची समजूत घातली होती. आताही या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनाच हस्तक्षेप करून वादावर पांघरुण घालावे लागणार आहे. अशा वादातून समाजाला काय संदेश देणार- पाटील नरेंद्र पाटील म्हणाले की, ब्राह्मण मराठा वादाची कोणती घटना घडलेली नाही. मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजासाठी ज्या काही गोष्टी केल्या त्या आतापर्यंत कोणत्याही नेत्यांनी केलेल्या नाही. त्यामुळे अशाप्रकारचे वाद करून आपण समाजाला काय संदेश देणार आहोत. विनंती केली होती, जातीय हेतू नव्हता : अभिमन्यू पवार आमदार अभिमन्यू पवार म्हणाले, पुढे एकच खुर्ची रिकामी असल्याने त्यावर नरेंद्र पाटील बसतील आणि आपण दोघे मागे बसू, असे मी त्यांना विनंतीवजा सुचवले होते. यात कोणताही जातीय किंवा वादाचा हेतू नव्हता. पहिल्या रांगेत बसण्यासाठी पवारांची धडपड : कुलकर्णी खा. मेधा कुलकर्णी म्हणाल्या की, “जातीय टिप्पणीमुळे माझ्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. पहिल्या रांगेत बसण्यासाठी पवारांची धडपड सुरू होती. कार्यक्रमात एखाद्या जातीचा विषय कुठून आला हे समजत नाही.’

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर