ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: ‘ऑक्टोबर हिट’मुळे रेल्वेचा खोळंबा, मुंबईत रुळांच्या प्रसरणाने प्रवाशांचे हाल, काय घडतंय? ✦ ⚡ वन्यजीव संरक्षणाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत! ✦ ⚡ कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार, एकाचा खून, पित्रा-पुत्रासह तिघांना जन्मठेप, काय घडलं? ✦ ⚡ Pune Video:पुण्यातील MPSCविद्यार्थ्यांना पोलिसांकडून नोटीस, २९ क्लास, अभ्यासिका चालकांनाही नोटिसा ✦ ⚡ लिलाबाई बापूराव कुचनकर यांचे निधन ✦ ⚡ चारा संपला, पाणीही नाही प्यायला, जिवापाड जपलेल्या मुक्या जिवाला अर्ध्या किंमतीत विकायची वेळ, बीडमधलं भीषण व… ✦ ⚡ ‘आई मला वाचव’ तरुणाचा व्हॉट्सॲपवर मेसेज अन् घडलं भयंकर, पंढरपूरमधील त्या घटनेने एकच खळबळ ✦ ⚡ Eknath Shinde Amit Shah: दिल्लीत खलबतं, महाराष्ट्रात टेन्शन! एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा; अमित शाहांसो… ✦ ⚡ Instagram वर मैत्री, लिव इन रिलेशनशीपमध्ये असताना मृत्यू, कल्याणच्या मुलीसोबत छत्तीसगडमध्ये काय घडलं? ✦ ⚡ दिनेश धोंडूजी वैद्य यांच्या ३० वर्षांच्या ज्ञानयज्ञाची सांगता
SP News Maregaon

धमक्या देणाऱ्यांना सोडणार नाही:कोणाचेही घर उडवू देणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा कडक इशारा

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या तक्रारीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धमक्यांच्या प्रकरणावर कठोर भूमिका घेतली आहे. कोणालाही धमकावणे किंवा कोणाचेही घर उडवण्यासारख्या धमक्या देणे सहन केले जाणार नाही, असे स्पष्ट करत त्यांनी पोलिसांना कायद्यानुसार कठोर कारवाई करण्याचे निर्देश असल्याचे सांगितले. ‘कोणालाही घाबरण्याचे कारण नाही’ नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आम्ही कोणाचेही घर उडवू देणार नाही किंवा कोणालाही कोणत्याही प्रकारे धमकावू देणार नाही. अशा धमक्यांमुळे कुणीही घाबरू नये. जर कोणी धमक्या देत असेल तर पोलिस त्यांच्यावर कायद्यानुसार योग्य आणि कठोर कारवाई करतील.” धमकीच्या वक्तव्यांवरून राजकारण तापले अलीकडेच खासदार संजय दिना पाटील यांच्या काही वक्तव्यांवरून राजकीय वर्तुळात मोठा वाद निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांना पत्र लिहून कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनीही कायदा-सुव्यवस्थेच्या बाबतीत सरकार कोणतीही तडजोड करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. कायद्यापुढे सर्व समान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणाचेही नाव न घेता, धमक्या देणारे कोणत्याही पक्षाचे असोत, कायद्यापुढे सर्व समान आहेत, असा संदेश दिला. राज्यात भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात पोलिस प्रशासन कठोर पावले उचलेल, असेही त्यांनी नमूद केले. नागपूर विमानतळाचा विकास वेगाने; कार्गो हबच्या स्वप्नाला मिळणार बळ– फडणवीस नागपूर विमानतळाच्या संचालनाची जबाबदारी आज जीएमआरकडे (GMR) सोपवण्यात येत असल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आनंद व्यक्त केला. यामुळे नागपूरमध्ये अत्याधुनिक आणि आधुनिक सुविधांनी सुसज्ज विमानतळ उभारला जाणार असून, मध्य भारतासाठी एक सक्षम हवाई वाहतूक परिसंस्था निर्माण होईल, असे त्यांनी सांगितले. तसेच नागपूरला कार्गो हब म्हणून विकसित करण्याचे स्वप्नही यामुळे पूर्णत्वास जाईल. विमानतळ विकासामुळे उद्योग, व्यापार, गुंतवणूक आणि रोजगारनिर्मितीला चालना मिळून विदर्भासह संपूर्ण प्रदेशाच्या आर्थिक विकासाला मोठी गती मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. संबधित बातमी वाचा… विरोध केला तर बॉम्ब टाकेन, घरात घुसून मारेन: संजय पाटलांच्या धमकीवरून संजय राऊत आक्रमक, पोलिस आयुक्तांकडे केली अटकेची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मुंबईचे पोलिस आयुक्त देवेन भारती यांना पत्र लिहून खासदार संजय दिना पाटील यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. आंदोलकांना धमक्या देणे, बॉम्ब टाकण्याची भाषा करणे आणि जीवघेण्या इशाऱ्यांमुळे समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचा आरोप त्यांनी पत्रात केला आहे. ‘माझ्या नादाला लागू नका’ वक्तव्यावर आक्षेप
संजय राऊत यांनी पत्रात नमूद केले आहे की, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून फुटून गेलेल्या खासदारांविरोधात राज्यभरात आंदोलने सुरू असताना संजय दिना पाटील यांनी आंदोलकांना गंभीर धमक्या दिल्या. “माझ्या नादाला लागू नका, नाहीतर हॉस्पिटलमध्ये किंवा स्मशानात पाठवीन,” अशा वक्तव्याचा उल्लेख करत त्यांनी याची गंभीर दखल घेण्याची मागणी केली. सविस्तर वाचा

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर