ब्रेकिंग न्यूज
10 सेकंदांचा थरार! लिफ्टमध्ये वर जाताना अचानक बसले भूकंपाचे धक्के, नाशिकमधील घटना CCTV कॅमेऱ्यात कैद CRIME : गँगवॉरने नांदेड हादरलं! दोघं दबा धरून बसले, गाडी पेट्रोल पंपावर वळली अन् सांडला रक्ताचा सडा; इंद्रज… Ravindra Jadeja : ड्रेसिंग रूमममध्ये रविंद्र जडेजाने असं काय केलं की, गंभीर खळखळून हसला; Video आला समोर मारेगावच्या हेमंतची UPSC-CAPF मध्ये दमदार भरारी! Success Story : नोकरीच्या मागे न लागता घेतला व्यवसायाचा निर्णय, बंदिस्त शेळीपालन केलं यशस्वी, वर्षाला 7 लाख… पश्चिम बंगालच्या उपसागरात घोंगावतंय मोठं संकट, विदर्भ-मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा अलर्ट, हवामान विभागाने … CRIME : बालपणापासून जिवाभावाच्या मैत्रिणी अन् एकत्र मृत्यूला कवटाळलं! नातेवाईकांकडे दुपारी जेवण अन् 4 तासात… Eknath Shinde: सुप्रीम कोर्टात सुनावणी अन् एकनाथ शिंदे अचानक दिल्लीत! पीएम मोदींची घेणार भेट, बैठकीचं कारण … IND vs SL : श्रीलंका क्रिकेटचा टीम इंडियासोबत ‘गोलीगत धोका’! गंभीरच्या लगेच लक्षात आला शातीर डाव, शुभमनचाही… Chandrpur: हॉस्टेलमध्ये पाचवीमध्ये शिकणाऱ्या 2 भावांवर मित्रांकडून अनैसर्गिक अत्याचार, चंद्रपूर हादरलं
SP News Maregaon

मनरेगा बचावासाठी शेतमजूर युनियनचे जिल्हाधिकारी कार्यालयावर महाधरणे:व्हीबी ग्रामजी कायदा रद्द करून मनरेगा पुन्हा लागू करण्याची मागणी‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


महाराष्ट्र राज्य लाल बावटा शेतमजूर युनियन (संलग्न भारतीय खेत मजदूर युनियन) अमरावती जिल्हा कौन्सिलच्या वतीने शेतमजुरांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवार २३ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर महाधरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मोठ्या संख्येने शेतमजूर व महिला कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यापूर्वी १५ ते २२ जूनदरम्यान संघटनेतर्फे ‘मनरेगा बचाव जनजागरण अभियान’ राबवण्यात आले होते. त्यानंतर देशव्यापी आंदोलनाचा भाग म्हणून हे महाधरणे आयोजित करण्यात आले. शेतीच्या वाढत्या यांत्रिकीकरणामुळे शेतमजुरांच्या रोजगारावर परिणाम होत आहे. मजुरीचे प्रमाण घटले आहे. दुसरीकडे महागाई, बेरोजगारी, शिक्षण, आरोग्य, निवारा व अन्नसुरक्षा यांसारख्या मूलभूत प्रश्नांमुळे ग्रामीण भागातील शेतमजूर कुटुंबांचे जीवन अधिकच कठीण झाल्याचा आरोप आंदोलकांनी केला. आंदोलनादरम्यान जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात व्हीबी ग्रामजी कायदा रद्द करून मनरेगा कायदा पूर्ववत लागू करण्याची प्रमुख मागणी करण्यात आली. तसेच मनरेगा अंतर्गत वर्षाला २०० दिवस रोजगार देणे. किमान ७०० रुपये मजुरी देणे. भूमिहीनांना पाच एकर शासकीय जमीन वाटप करणे. दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेची प्रभावी अंमलबजावणी करणे. गायरान व वनजमिनीवरील धारकांना जमिनीचे पट्टे देणे. घरकुलासाठी किमान पाच लाख रुपये अनुदान देणे. सर्व भूमिहीनांना जमीन वाटप करणे. या मागण्या करण्यात आल्या. या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हा सचिव तथा अमरावती विभागीय समन्वयक कॉ. संजय मंडवधरे, जिल्हाध्यक्ष कॉ. चंद्रकांत वडस्कर, कार्याध्यक्ष कॉ. सुनील घटाळे, माजी जिल्हाध्यक्ष कॉ. नारायण भगवे, जिल्हा संघटक कॉ. ज्ञानेश्वर मेश्राम यांच्यासह विविध तालुक्यांतील पदाधिकारी व शेकडो शेतमजुरांनी केले. आंदोलनात महिला कार्यकर्त्यांचीही लक्षणीय उपस्थिती होती. संघटनेने शासनाने शेतमजुरांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. मागण्या तातडीने मान्य कराव्यात. अन्यथा भविष्यात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. दरमहा ५ हजार रु. पेंशनची मागणी; निर्णयाकडे लक्ष श्रावणबाळ, निराधार, दिव्यांग व शेतमजुरांना दरमहा पाच हजार रुपये पेन्शन देणे. श्रावणबाळ योजनेची वयोमर्यादा ६५ ऐवजी ६० वर्षे करणे. महिलांना मायक्रो फायनान्सच्या कर्जजाळ्यातून मुक्त करणे. बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देणे. शेतकऱ्यांप्रमाणे शेतमजुरांनाही सन्मानधन देणे. विविध शासकीय योजनांचा लाभ देणे. शासकीय शिक्षण व आरोग्य सेवा मजबूत करणे. निकृष्ट धान्य वितरण थांबवणे. दर्जेदार धान्य पुरवठा करणे. ग्रामीण रस्ते व पुलांची कामे तातडीने पूर्ण करणे. स्मार्ट मीटर योजना रद्द करणे. शेतमजुरांना दरमहा २०० युनिटपर्यंत मोफत वीज देणे. ही मागणीही करण्यात आली.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर