ब्रेकिंग न्यूज
⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा
SP News Maregaon

अँटिलियासमोर स्फोटक, 100 कोटी खंडणी ते लीलावती प्रकरण:अनिल देशमुखांनी माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांची कुंडलीच मांडली

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर जोरदार टीका केली. मी गृहमंत्री असताना माझ्यावर खोटे आरोप करून बदनाम करण्याचे षडयंत्र ज्याने रचले, त्याच व्यक्तीचे भ्रष्ट कारनामे आता एकामागून एक समोर येत आहेत, असे देशमुख म्हणाले. मुंबईतील प्रख्यात लीलावती रुग्णालय येथे त्यांना ज्या प्रकारे पदावरून दूर करण्यात आले, त्यावरून त्यांचे वर्तन आणि चारित्र्य जनतेसमोर उघड झाले असल्याचा दावा त्यांनी केला. देशमुखांनी सांगितले की, लीलावती रुग्णालयातील ट्रस्टी आणि डॉक्टरांनी परमबीर सिंग यांच्याविरोधात गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बढतीच्या आमिषाने अनेक डॉक्टरांकडून प्रत्येकी 25 लाख रुपये उकळण्याचा प्रकार सुरू होता. या कथित गैरप्रकारांमुळे आणि गैरवर्तनामुळे रुग्णालय प्रशासनाने त्यांना पदावरून काढून टाकल्याचे देशमुखांनी नमूद केले. या घडामोडींमुळे सिंग यांच्या वागणुकीबाबत अनेक प्रश्न निर्माण झाल्याचेही त्यांनी म्हटले. माजी गृहमंत्र्यांनी पुढे अँटिलिया प्रकरणाचा उल्लेख करत सांगितले की, उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थान Antilia बाहेर स्फोटकासारखी वस्तू आढळल्यानंतर तपासाच्या दिशेबाबत शंका निर्माण झाल्या होत्या. त्या वेळी तत्कालीन पोलिस आयुक्त म्हणून परमबीर सिंग सरकारची दिशाभूल करत असल्याचा संशय आल्याने तपास त्यांच्या हातातून काढून दहशतवाद विरोधी पथक (ATS) यांच्याकडे सोपवण्यात आला, असे देशमुखांनी स्पष्ट केले. एटीएसच्या तपासातून काही गंभीर संकेत समोर आले होते, असा दावा करत देशमुख म्हणाले की, या प्रकरणात सिंग यांची भूमिका संशयास्पद वाटल्याने त्यांची कमी महत्त्वाच्या पदावर बदली करण्यात आली. पुढे शासकीय सेवेतून त्यांना दूर करण्याची कारवाईही करण्यात आली, असे त्यांनी सांगितले. या सर्व निर्णयांचा संदर्भ त्या वेळच्या तपासातील निष्कर्षांशी जोडला गेला होता, असे देशमुखांचे म्हणणे आहे. देशमुखांनी 100 कोटी रुपयांच्या कथित आरोपांचा उल्लेख करत सांगितले की, ही कारवाई टाळण्यासाठी माझ्यावर खोटे आरोप लावण्यात आले. आरोप होताच स्वतः चौकशीची मागणी केल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती न्यायमूर्ती चांदीवाल यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आली होती. या समितीसमोर हजर राहण्याचे समन्स बजावूनही सिंग वारंवार गैरहजर राहिल्याचा आरोप त्यांनी केला. अटकेच्या भीतीने सिंग काही काळ फरार देशमुखांच्या म्हणण्यानुसार, सहा वेळा समन्स बजावूनही उपस्थित न राहिल्याने अटकेच्या भीतीने सिंग काही काळ फरार होते. शेवटी वकिलामार्फत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात अनिल देशमुखांविरुद्ध कोणताही ठोस पुरावा नाही, असे मान्य केल्याचा दावा त्यांनी केला. या घटनाक्रमामुळे 100 कोटींच्या आरोपांची विश्वासार्हता उरली नसल्याचे देशमुख म्हणाले. या पार्श्वभूमीवर लीलावती रुग्णालयातील घडामोडींचा उल्लेख करत देशमुखांनी संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी केली. भ्रष्ट आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या अधिकाऱ्याचे रुग्णालयातील कथित कारनामे गंभीर आहेत. याबाबत सत्य बाहेर यावे, असे ते म्हणाले. पत्रकार परिषदेत त्यांनी या सर्व घटनांचा परस्परसंबंध मांडत, जनतेसमोर सत्य येण्याची गरज अधोरेखित केली.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर