ब्रेकिंग न्यूज
⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू
SP News Maregaon

रिल्सची राणी पराभूत, निर्मला नवले यांना धक्का:सोशल मीडियावर स्टार, पण मतपेटीत अपयश; इन्स्टाग्राम लोकप्रियता ठरली निष्प्रभ

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


शिरुर तालुक्यातील कारेगावच्या माजी सरपंच निर्मला नवले यांना यंदाच्या पंचायत समिती निवडणुकीत अनपेक्षित पराभवाचा सामना करावा लागला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्या कारेगाव–कान्हूर मेसाई गणातून रिंगणात उतरल्या होत्या. सोशल मीडियावर प्रचंड फॅन फॉलोअिंग असलेला चेहरा म्हणून त्यांची ओळख असूनही, मतपेटीत मात्र त्यांची लोकप्रियता मतांमध्ये रूपांतरित होऊ शकली नाही. भाजपच्या मनीषा सतीश पाचंगे यांनी नवले यांचा 300 मतांनी पराभव केला. हा निकाल नवले आणि त्यांच्या चाहत्यांसाठी मोठा धक्का मानला जात आहे. निर्मला नवले या सोशल मीडियावर कायम चर्चेत असतात. त्यांच्या रिल्स, व्हिडीओ आणि वेगळ्या स्टाईलमुळे त्या नेहमीच व्हायरल होत राहिल्या आहेत. त्यांच्या प्रत्येक वक्तव्याचे आणि कृतीचे चाहत्यांना विशेष आकर्षण असते. त्यामुळे त्यांच्या पोस्टला मोठा प्रतिसाद मिळत असे. राजकारणात सक्रिय असतानाही त्यांनी सोशल मीडियावर आपली वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या लोकप्रियतेमुळे त्यांना ‘रिल्सची राणी’ अशीही ओळख मिळाली होती. मात्र, या वेळी हीच लोकप्रियता निवडणुकीत उपयोगी पडली नाही. निर्मला नवले या उच्चशिक्षित असून त्यांनी आयटी इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले आहे. काही वर्षांपूर्वी त्यांची कारेगावच्या सरपंचपदी बिनविरोध निवड झाली होती. त्यानंतर त्यांच्या लोकप्रियतेत सातत्याने वाढ झाली. उच्चशिक्षित, सोशल मीडियावर प्रभावी उपस्थिती आणि गावपातळीवरील सक्रियता यामुळे त्या कायम चर्चेत राहिल्या. इन्स्टाग्रामवर त्यांच्या पाच लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. मात्र, पंचायत समितीच्या निवडणुकीत त्यांची ही प्रतिमा मतांमध्ये बदलू शकली नाही, हे या निकालातून स्पष्ट झाले. लोकप्रियता आणि प्रत्यक्ष निवडणूक यामधील फरक दरम्यान, पुणे जिल्हा परिषदेच्या 299 जागांपैकी 73 जागांचे निकाल समोर आले आहेत. त्यामध्ये भाजपचे 20, शिवसेनेचे 7, राष्ट्रवादी काँग्रेसचे 27, ठाकरे गटाचे 2 आणि शरद पवार गटाचे 3 उमेदवार विजयी झाले आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार पूर्णपणे थंडावला होता. मोठ्या सभा झाल्या नाहीत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसला सहानुभूतीची लाट मिळताना दिसत असली, तरी कारेगाव–कान्हूर मेसाई गणात मात्र निर्मला नवले यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे सोशल मीडियावरील लोकप्रियता आणि प्रत्यक्ष निवडणूक यामधील फरक पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर