ब्रेकिंग न्यूज
⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू
SP News Maregaon

कापूस आयात शुल्क रद्द करण्याची मागणी शेतकरी विरोधी:विजय जावंधिया यांचे थेट तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांना पत्र; काय म्हणाले वाचा?

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांनी केंद्र सरकारकडे कापसावरील ११ टक्के आयात शुल्क रद्द करण्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेमुळे देशातील कापड उद्योग आणि सूत गिरण्यांना परदेशातून स्वस्त कापूस आयात करणे सोपे होणार असले, तरी ही मागणी देशातील कोट्यवधी कापूस उत्पादक शेतकरी आणि शेतमजुरांच्या हिताला बाधा आणणारी आहे, असा दावा ज्येष्ठ शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांना थेट पत्र लिहून वस्त्रोद्योग क्षेत्रातील विदारक वास्तव समोर आणले आहे. मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांनी आपल्या मागणीच्या समर्थनार्थ देशातील कापसाचे दर वाढल्याचा तर्क दिला होता. यावर जावंधिया यांनी पत्रात स्पष्ट केले आहे की, भारतीय कापसाचे दर हे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील दरवाढीमुळे वाढले आहेत. अमेरिकेत कापसाचे दर ७०-७५ सेंट प्रति पाउंडवरून थेट ९५-९८ सेंटवर गेल्यामुळे देशात कापूस महाग झाला आहे. अशा स्थितीत आयात शुल्क रद्द करून परदेशी कापूस देशात आणल्यास भारतीय कापसाचे भाव गडगडतील आणि त्याचा थेट फटका स्थानिक शेतकऱ्यांना बसेल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. कापड उद्योजकांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना जावंधिया यांनी पत्रात म्हटले आहे की, तीन वर्षांपूर्वी कापसाचे दर कमी होऊन ते ४० ते ५० हजार रुपये प्रति खंडीवर आले, तरीही उत्पादकांनी कापडाचे दर कमी केले नाहीत. पूर्वी गरिबांना मिळणारी ४० रुपयांची बनियान आज १५० रुपयांना मिळत आहे. “कापूस स्वस्त आणि कापड महाग’ ठेवण्याची ही नीती शेतकरी आणि ग्राहकांची लूट करणारी आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी केवळ उद्योजकांचा विचार न करता कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहावे, अशी विनंती जावंधिया यांनी केली आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर