ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

अधिकमास संपला, तरी गौडगावमधील हनुमान मंदिरात भक्तांची दर्शनासाठी गर्दी:भक्तिमय वातावरणात दोन हजार भाविकांना महाप्रसादाचे वाटप

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


अधिकमासाची सांगता झाली असली तरी अक्कलकोट तालुक्यातील गौडगाव बुद्रुक येथील दक्षिणमुखी जागृत हनुमान मंदिरात भक्तांची गर्दी कायम असल्याचे चित्र मंगळवारी पाहायला मिळाले. पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. मंदिर परिसरात दिवसभर भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. मंदिरात शनिपूजा, नवग्रह शांती, होम-हवन आदी धार्मिक विधी मोठ्या भक्तिभावाने पार पडले. हनुमान मंदिराच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे परिसरातील रिक्षा, टमटम व अन्य वाहन चालकांनाही रोजगार उपलब्ध होत असून स्थानिक व्यावसायिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. यावेळी कलबुर्गी येथील भक्त नागेंद्रप्पा ब. रुदनूर यांच्या वतीने भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. दर्शनानंतर हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. मंदिर समितीने दर्शन रांग, पिण्याचे पाणी, निवास व स्वच्छता यांची उत्तम व्यवस्था केल्याने भाविकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, मुंबई येथील कस्टम विभागाचे अधिकारी कन्हैय्यालाल बुरडे यांनी देवस्थान व भक्तनिवासाची पाहणी केली. मंदिर परिसरातील स्वच्छता, नियोजनबद्ध व्यवस्था आणि प्रशस्त भक्तनिवास पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी मंदिर समितीर्फे त्यांचा सत्कार झाला. करण्यात आला. तसेच मंदिरात प्रत्येक मंगळवार व शनिवारी मोठ्या प्रमाणात भाविकांची उपस्थिती असते. अक्कलकोट रेल्वे स्थानक जवळ असल्याने श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेणारे अनेक भाविक गौडगावच्या जागृत हनुमान मंदिरालाही आवर्जून भेट देत आहेत. महाप्रसाद आणि भक्तनिवासाच्या सुविधांमुळे भाविकांची संख्या वाढत असल्याचे मंदिर समितीकडून सांगण्यात आले. गौडगाव हनुमान मंदिर ठरतेय भक्तांचे आकर्षण केंद्र अक्कलकोटमधील श्री स्वामी समर्थ यांच्या दर्शनासोबतच गौडगाव येथील दक्षिणमुखी जागृत हनुमान मंदिराला भेट देण्याकडे भाविकांचा वाढता कल दिसून येत आहे. धार्मिक विधी, महाप्रसाद, निवास व्यवस्था आणि सहज दर्शन यामुळे मंदिर परिसरात वर्षभर भाविकांची वर्दळ कायम राहत आहे. हनुमान मंदिरात नवग्रहांची स्थापना ^हनुमान मंदिरात नवग्रहांची स्थापना करण्यात आली असून भाविकांना या नवग्रहाच्या दर्शनामुळे मन प्रसन्न होऊन शांती लाभते. मंदिर समितीच्या वतीने भाविकांच्या सुख समृद्धीसाठी मंदिरात विशेष यज्ञ, होम, हवन करण्यात येते. – श्रीकांत खानापूरे, अध्यक्ष जागृत हनुमान मंदिर, गौडगांव बु (ता. अक्कलकोट)

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर