ब्रेकिंग न्यूज
⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा
SP News Maregaon

लेखक, तंत्रज्ञांसारखी मंडळी समाजासाठी मोठी देणं:ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या सत्कार समारंभात मान्यवरांचा अभिप्राय, शिक्षण क्षेत्रातील योगदानाचा गौरव‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


लेखक, तंत्रज्ञ, संशोधक, खेळाडू, कलावंत ही गुणी मंडळी समाजासाठी मोठी देणगी आहे. त्यामुळे या वारशाची जपणूक करणे हे आपले प्रत्येकाचेच कर्तव्य असल्याचा अभिप्राय ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी नोंदविला. मोर्शीच्या आर. आर. लाहोटी विज्ञान महाविद्यालयाचे माजी प्राचार्य दिलीपसिंह खांबरे यांचे चिरंजीव प्रा. पंकजसिंह खांबरे यांची जेएसपीएम विद्यापीठ, पुणे येथे असोसिएट डायरेक्टर पदावर निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे माजी सचिव, लेखक शेषराव खाडे यांची ‘कृत्रिम प्रज्ञा’ ही कादंबरी वाचकांच्या भेटीला आल्याबद्दलही सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ नागरिक महासंघाशी संलग्न येथील ज्येष्ठ नागरिक मंडळातर्फे त्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हे पदाधिकारी बोलत होते. मंडळाचे अध्यक्ष पुरुषोत्तम गावंडे, उपाध्यक्ष दामोदर पवार, सचिव चंदनसिंह राजपूत, कोषाध्यक्ष धनराज निपाने आदी यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी बोलताना गावंडे, पवार, पाथरे यांनी खांबरे कुटुंबाच्या शिक्षण क्षेत्रातील योगदानाचा गौरव केला. प्रा. दिलीपसिंह खांबरे यांनी आयुष्यभर शिक्षणाची सेवा केली. त्याच परंपरेला त्यांचे चिरंजीव पंकजसिंह यांनी उंचीवर नेऊन ठेवले, अशा भावना व्यक्त केल्या. हीच परंपरा या कुटुंबाची तिसरी पिढीही पुढे नेत आहे. याचाही यावेळी उल्लेख करण्यात आला. खाडे यांच्या निवासस्थानी रंगलेल्या त्यांच्या सत्कारावेळीसुद्धा ज्येष्ठ नागरिकांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. खाडे हे महसूल, ग्रामविकास, लोकप्रशासन अशा वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय सेवा बजावत उपायुक्त म्हणून निवृत्त झाले आहेत. परंतु या जीवनप्रवासात त्यांनी स्वतःतील लेखक कधीही कोमेजू दिला नाही. लेखनाची आवड त्यांनी सतत जपली. त्याचाच परिपाक म्हणून एकामागून एक अनेक कादंबऱ्या ते लिहू शकले. हा लेखनप्रवास असाच सुरू राहो. अशा शुभेच्छाही ज्येष्ठ नागरिकांनी यावेळी दिल्या. प्रारंभी उपस्थित प्रमुख अतिथी व संजय खोंडे, अनिल वानखडे, गजेंद्र पाथरे, प्रभाकरराव उमक, मधुकर भोपळे, श्रीकृष्ण टोंगसे यांच्या हस्ते प्रा. पंकजसिंह खांबरे यांचा शाल-श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. अशीच कृती खाडे यांच्या निवासस्थानीही करण्यात आली. याप्रसंगी मंडळाचे इतर पदाधिकारी राजाभाऊ देशमुख, दीपकराव जुनघरे, सुरेशराव शिर्के, अशोकराव हांडे, प्राचार्य एस. बी. देशमुख, चंदनसिंह खांबरे, शांताबाई खांबरे, लेखिका छायाताई पाथरे, अशोका पार्क अध्यक्ष वानखडे, मधुकरराव भोपळे, वैभव म्हस्के आदी मान्यवर उपस्थित होते. कोण आहेत खाडे, खांबरे शिक्षण, प्रशासन व शैक्षणिक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे निष्ठावान अधिकारी आहेत. कामाची सचोटी, पारदर्शक व्यवहार, माणुसकी ही त्यांची ओळख आहे. ते नामवंत कादंबरीकार असून नुकतेच ”कृत्रिम प्रज्ञा” या कादंबरीचे प्रकाशन झाले. कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयाचा त्यांचा दांडगा अभ्यास आहे. प्रा. पंकजसिंह खांबरे हे माहिती तंत्रज्ञान शाखेचे तज्ज्ञ असून त्यांनी विविध अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक म्हणून कार्य केले आहे. प्लेसमेंट क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. खेळाडू म्हणून त्यांनी क्रिकेटमध्येही विद्यापीठ व राज्यस्तरावर प्रतिनिधित्व केले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर