ब्रेकिंग न्यूज
⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News
SP News Maregaon

मुश्रीफ साहेबांनी मदत मागितली तर विचार करू:कोल्हापूर झेडपीच्या सत्तेबाबत सतेज पाटलांचे सूचक विधान, राजकीय वर्तुळात चर्चा

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


राज्यात भाजपविरोधात कणखरपणे काँग्रेस लढत आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या एकत्रतेची जनतेच्या मनातील इच्छा पूर्ण होणार नाही. कोल्हापुरात राष्ट्रवादी आणि काँग्रेसची एकत्रित बहुमत दिसत आहे, मात्र ते महायुती म्हणून लढले आहेत. हसन मुश्रीफ स्वतंत्र लढले असते तर कदाचित विचार करता आला असता. मुश्रीफ साहेब अध्यक्षपदासाठी स्वतंत्र लढले आणि त्यांनी मदत मागितली तर विचार करू, असे सूचक विधान कॉंग्रेस नेते सतेज पाटील यांनी केले आहे. कोल्हापूरमध्ये जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी कॉंग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला असून 20 जागांवर विजय मिळवला आहे. तर कॉंग्रेसने 15 जागांवर विजय मिळवला आहे. सतेज पाटील म्हणाले, सहकारातील समीकरणे वेगळी आहेत. जिल्हा बँक किंवा गोकुळ अशा संस्था टिकल्या पाहिजेत. म्हणून मागे आम्ही पक्षविरहित आम्ही निवडणूक लढवल्या. मात्र आता माहित नाही. जिल्ह्यात काँग्रेस वाढवणे माझी जबाबदारी आहे, काँग्रेसच्या विचाराचा वर्ग कोल्हापुरात आहे. अजून विधानपरिषदेचे दोन वर्ष माझी बाकी आहेत, मी पुढे कसे निवडणूक लढवणार हे आता सांगू शकत नाही, तोपर्यंत हे सरकार राहील नाही राहील माहित नाही. पुढे बोलताना सतेज पाटील म्हणाले, आमच्या काँग्रेसने 15, स्वाभिमानी 1, शिवसेना ठाकरे गट 1 आणि शिवशाहू आघाडी 1 अशा एकूण 18 जागा आम्ही जिंकल्या आहेत. घवघवीत यश जरी नसले तरी प्रत्येक तालुक्यात आम्ही पोहोचलो आहोत. तीन सत्ताधारी पक्ष आणि बिगर सत्तेतील आमचा पक्ष आहे. मात्र, सत्तेमुळे काहीजण तिकडे गेले आहेत, सत्तेमुळे त्यांना हे यश मिळाले आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांवर सत्तेचा प्रभाव पहायला मिळत असतो, तेच आता पहायला मिळत आहे. ते पुढे म्हणाले की, स्व. अजितदादांच्या निधनानंतर सहानुभूतीचा उपयोग राष्ट्रवादीला निश्चित झाला. कदाचित दादा असते तर अजून यश त्यांना मिळाले असते. दरम्यान, गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वास आबाजी पाटील यांच्या मुलाचा पाडळी खुर्द मतदारसंघातून पराभव झाला. यावर बोलताना सतेज पाटील म्हणाले, विश्वास आबाजी पाटील, राजू सूर्यवंशी काँग्रेस मधून उभारले असते तर कदाचित निवडून आले असते. नरके गटातील लोकांना देखील ऐनवेळी आबाजी आल्यानंतर कदाचित ते पटले नसेल, त्यांना आत्मचिंतन करावे लागेल. शेवटी झेडपी, पंचायत समिती स्थानिक पातळीच्या निवडणुका आहेत. मतचोरी, मतदार यादीतील घोळ याबाबत काँग्रेसची भूमिका आहे, परंतु आत्ताच्या निकालात अशा गोष्टी कुठे समोर आलेल्या नाहीत. काँग्रेसच्या राज्यव्यापी भूमिकेवर सतेज पाटील म्हणाले की, आमची पक्षाची बैठक 18 तारखेला मुंबईत होत आहे, त्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका निकाल आणि राज्यातील काँग्रेसची पुढील भूमिका यावर चर्चा होईल, महाविकास आघाडीबाबत निर्णय त्यानंतर जाहीर करु. वरिष्ठांची भूमिका अशीच आहे की शक्य तिथे आघाडी, शक्य तिथे एकटे लढा, असे त्यांनी नमूद केले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर