ब्रेकिंग न्यूज
⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा
SP News Maregaon

प्रकाश आंबेडकरांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका:म्हणाले- एकेकाळी नटांना नाच्या म्हणणारे आज त्यांनाच कार्यक्रमात बोलवतायत

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेत सरसंघ चालक मोहन भागवत तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात अभिनेता सलमान खान उपस्थित होता. यावरून देखील आंबेडकरांनी संघावर टीकेची झोड उठवली आहे. प्रकाश आंबेडकर म्हणाले, मोहन भागवत यांनी मुंबईत बॉलीवूडमधील लोकांसमोर भाषण दिले. आरएसएसने एकेकाळी ह्या सर्व सांस्कृतिक कलेचा निषेध केला होता, शिव्या दिल्या होत्या. नटांना नाच्या म्हणून त्यांनी संबोधले होते. सिनेमातील जे सेलिब्रिटी आहेत, त्यांना त्यांच्या कामामुळे समाजात मान्यता आहे, त्याचा फायदा घेण्यासाठी आरएसएसने हे काम सुरू केले आहे. हे आरएसएसचे नवीन चारित्र्य असल्याची टीका आंबेडकरांनी केली आहे. तसेच आरएसएसचे गोळवलकर यांनी बंच ऑफ थॉट्स या पुस्तकात आरएसएससाठी सांस्कृतिक रोड मॅप दिला होता, त्याचा मोहन भागवत निषेध करतायत का? याचा खुलासा त्यांनी करावा, असेही आंबेडकर म्हणाले. जेलमध्ये जाण्याच्या आधी सावरकर क्रांतिवीर होते विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न देण्याची मागणी सध्या सुरू आहे. यावर बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, दुर्दैवाने मोहन भागवत यांनी सावरकर यांच्यावरचा माझा लेख त्यांनी वाचला नसेल. सावरकरांचे दोन चेहरे आहेत. एक क्रांतिकारी सावरकर आणि एक ब्रिटीशांना मदत करणारे सावरकर. जेलमध्ये जाण्याच्या आधी ते क्रांतिवीर होते, हे सर्वांनीच मान्य केले पाहिजे. पण जेलमधून बाहेर आल्यानंतर त्यांची संघटना जी होती हिंदू महासभा, या संघटनेने पत्री सरकारच्या लढवय्याना ब्रिटीशांना पकडून देण्याचे काम केले आहे. सावरकरांनी ब्रिटिशांना मदत केली, त्यांना भारतरत्न देऊ नये प्रकाश आंबेडकर म्हणाले, महाराष्ट्रात महाराष्ट्रामध्ये ब्रिटिशांविरोधात पत्री सरकार लढत होते, तेव्हा त्या लढवय्यांना ब्रिटिशांना पकडून देण्याचे काम हिंदू महासभा करत होती. सातारा, सांगली, कोल्हापूरमधील पत्री सरकारमधील अनेकांना त्यांनी पकडून दिले होते. तेव्हा हिंदू महासभेच्या एका व्यक्तीने सांगितले होते की, हे काम आम्ही आमच्या प्रमुखाच्या म्हणजेच विनायक सावरकर यांच्या सांगण्यावरून करतोय. सावरकरांनी ब्रिटिशांना मदत केली होती. त्यामुळे अशा व्यक्तीला भारतरत्न द्यावा, असे मी मानत नाही, असे मत आंबेडकरांनी व्यक्त केले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर