ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

राज्यातील टपाल अन् पासपोर्ट कार्यालये बॉम्बने उडवण्याची धमकी:सायनाईड मिश्रित आरडीएक्स असल्याच्या ईमेलने खळबळ, यंत्रणा सतर्क

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


राज्यातील टपाल कार्यालय पासपोर्ट कार्यालय सायनॉईड विषारी वायू मिश्रीत आरडीएक्स बॉम्बचा स्फोट होणार असल्याचा ईमेल बुधवारी (ता. 25) टपाल कार्यालयास प्राप्त झाला असून त्यामुळे बहुतांश ठिकाणी टपाल कार्यालयातील कामकाज बंद करून तपासणीचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. सदर ईमेल कोणत्या भागातून आला याचीही पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे. या संदर्भात सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील टपाल कार्यालयांना आज ईमेल प्राप्त झाला आहे. ‘तुमच्या राज्यातील सर्व पासपोर्ट व टपाल कार्यालयात दुपारी बारा वाजून 10 मिनीटांनी सायनाईड विषारी वायू मिश्रीत 16 आरडीएक्स बॉम्बचा स्फोट होणार आहे. सर्वांना तातडीने बाहेर काढा’, असे या ईमेलमध्ये नमूद करण्यात आले आहे. या ईमेलमुळे राज्यातील बहुतांश टपाल कार्यालयातून एकच खळबळ उडाली आहे. या प्रकाराची माहिती पोलिसांना देण्यात आली असून काही ठिकाणी पोलिसांकडून तपासणीचे काम हाती घेण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने पासपोर्ट कार्यालयाची बाँम्ब शोध व नाशक पथकाकडून तपासणी केली जात असून तसेच पार्सलचे बॉक्स तपासले जात आहेत. राज्यभरात तपासणी सुरु असल्याचे हिंगोलीचे पोस्टमास्तर एस. एस. निर्मल यांनी सांगितले. हिंगोली कार्यालयाला माहिती मिळताच पोलिस अधिक्षक निलाभ रोहन, अप्पर पोलिस अधिक्षक कमलेश मीना, गुन्हे शाखेचे निरीक्षक मोहन भोसले, पोलिस निरीक्षक संदीप मोदे, जमादार अशोक धामणे, शेख मुजीब, संतोष करे, गणेश लेकुळे, गणेश वाबळे, संजय मार्के यांच्यासह पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली आहे. पोलिसांनी पोस्ट ऑफीस परिसरात बॅांम्ब शोधक व नाशक पथकाकडून तपासणीचे काम हाती घेण्यात आले आहे. सदर ई मेल कोणत्या ठिकाणावरून आला याची चौकशी केली जात आहे. हिंगोलीच्या नागरीकांनी अफवांवर विश्‍वास ठेऊ नये असे आवाहन पोलिस अधिक्षक निलाभ रोहन यांनी केले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर