ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: ‘ऑक्टोबर हिट’मुळे रेल्वेचा खोळंबा, मुंबईत रुळांच्या प्रसरणाने प्रवाशांचे हाल, काय घडतंय? ✦ ⚡ वन्यजीव संरक्षणाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत! ✦ ⚡ कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार, एकाचा खून, पित्रा-पुत्रासह तिघांना जन्मठेप, काय घडलं? ✦ ⚡ Pune Video:पुण्यातील MPSCविद्यार्थ्यांना पोलिसांकडून नोटीस, २९ क्लास, अभ्यासिका चालकांनाही नोटिसा ✦ ⚡ लिलाबाई बापूराव कुचनकर यांचे निधन ✦ ⚡ चारा संपला, पाणीही नाही प्यायला, जिवापाड जपलेल्या मुक्या जिवाला अर्ध्या किंमतीत विकायची वेळ, बीडमधलं भीषण व… ✦ ⚡ ‘आई मला वाचव’ तरुणाचा व्हॉट्सॲपवर मेसेज अन् घडलं भयंकर, पंढरपूरमधील त्या घटनेने एकच खळबळ ✦ ⚡ Eknath Shinde Amit Shah: दिल्लीत खलबतं, महाराष्ट्रात टेन्शन! एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा; अमित शाहांसो… ✦ ⚡ Instagram वर मैत्री, लिव इन रिलेशनशीपमध्ये असताना मृत्यू, कल्याणच्या मुलीसोबत छत्तीसगडमध्ये काय घडलं? ✦ ⚡ दिनेश धोंडूजी वैद्य यांच्या ३० वर्षांच्या ज्ञानयज्ञाची सांगता
SP News Maregaon

हिंदू धर्म नाही, लिंगायत बांधवांनी जनगणनेत केवळ ‘लिंगायत’ नोंदवा:बसवनंद स्वामीजींचे विधान, काळाराम मंदिराच्या पुजाऱ्यांचा आक्षेप

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


आगामी जनगणनेच्या पार्श्वभूमीवर लिंगायत धर्माच्या स्वतंत्र ओळखीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. “हिंदू हा धर्म नसून भारतात त्याला अधिकृत मान्यता नाही, त्यामुळे जनगणनेमध्ये धर्माच्या रकान्यात लिंगायत बांधवांनी केवळ ‘लिंगायत’ असेच नमूद करावे,” असे खळबळजनक आवाहन बंगळूर धर्मपीठाचे मठाधिपती जनबसवनंद स्वामीजी यांनी केले आहे. मात्र, त्यांच्या या भूमीकेला नाशिकच्या श्रीकाळाराम मंदिराचे पुजारी सुधीरदास महंत यांनी तीव्र विरोध दर्शवला असून, स्वामीजींनी आपले वक्तव्य मागे घ्यावे, अशी मागणी केली आहे. जनबसवनंद स्वामी यांनी म्हटले की, भारतात सध्या अधिकृतपणे जैन, बौद्ध आणि शीख या तीनच भारतीय वंशाच्या धर्मांना मान्यता आहे. ब्रिटिश राजवटीत लिंगायत समाजाला स्वतंत्र धार्मिक मान्यता होती, परंतु स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ही मान्यता मोडीत निघाली. त्यामुळे लिंगायत धर्माला सार्वजनिक आणि कायदेशीर मान्यता मिळवून देण्यासाठी आगामी जनगणनेचा वापर करणे गरजेचे आहे. यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात प्रबोधन केले जाणार असून, येत्या २ जून २०२६ पासून सोलापूरच्या मंगळवेढा येथून थेट मुंबईपर्यंत भव्य ‘लिंगायत धर्म जनजागृती यात्रा’ काढण्यात येणार असल्याचे जनबसवनंद स्वामी यांनी जाहीर केले. हिंदू ही सांस्कृतिक ओळख; सुधीरदास महंतांचे प्रत्युत्तर जनबसवनंद स्वामींच्या या विधानावर श्रीकाळाराम मंदिराचे पुजारी सुधीरदास महंत यांनी आक्षेप घेतला आहे. ते म्हणाले की, हिंदू असणे हा केवळ धर्म नसून ती एक राष्ट्रीय आणि सांस्कृतिक ओळख आहे. “सनातन वैदिक संस्कृतीसह बौद्ध, जैन आणि शीख हे सर्व याच व्यापक व्याख्येत सामावतात. ज्यांची पितृभूमी आणि पुण्यभूमी ही भारत आहे, ते सर्वच हिंदू आहेत,” असे त्यांनी सांगितले. धार्मिक विभाजनाचा धोका सुधीरदास महंत यांनी पुढे म्हटले की, लिंगायत समाज हा हिंदू धर्म आणि सनातनी विचारानेच पूजा-अर्चा करतो. अशा प्रकारे प्रत्येक संप्रदायाने स्वतंत्र धर्माची मागणी केल्यास भारताचे धार्मिक ऐक्य धोक्यात येईल आणि समाजात दुफळी निर्माण होईल. जनबसवनंद स्वामीजींनी हिंदू धर्माची व्याख्या नीट समजून घेऊन आपले वक्तव्य मागे घ्यावे, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर