ब्रेकिंग न्यूज
⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा
SP News Maregaon

उपचाराच्या नावाखाली 10 दिवसांच्या बालिकेचा 3 लाखांत सौदा:गोंदियातील डॉक्टर फरार, भंडारा–गोंदिया आंतरजिल्हा रॅकेटचा पर्दाफाश

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


ज्या डॉक्टरांना समाजात देवाचे रूप मानले जाते, त्याच पेशाला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात उघडकीस आली आहे. पोटच्या गोळ्यावर उपचार करण्याच्या बहाण्याने एका 10 दिवसांच्या चिमुकलीला चक्क 3 लाख रुपयांना विकल्याचा प्रकार समोर आला असून, या रॅकेटचा मुख्य सूत्रधार डॉ. नितेश बाजपेयी हा सध्या फरार आहे. ​गोंदिया येथील बालाजी हॉस्पिटलमध्ये एका गरीब दाम्पत्याने आपल्या 10 दिवसांच्या मुलीला उपचारासाठी दाखल केले होते. हीच संधी साधून डॉ. नितेश बाजपेयी याने ‘उपचाराचा खर्च खूप जास्त होईल’ अशी भीती पालकांना घातली. त्यानंतर, नागपूरच्या एका स्वयंसेवी संस्थेमार्फत मुलीवर मोफत उपचार करून देतो, असे खोटे आश्वासन देऊन त्याने बाळाला आपल्या ताब्यात घेतले. ​मात्र, या नराधम डॉक्टरने मुलीला उपचारासाठी न पाठवता, भंडाऱ्याच्या पांढराबोडी येथील एका महिलेला 3 लाख रुपयांत विकले. भंडाऱ्याच्या महिला व बालविकास विभागाला पांढराबोडी गावात एका महिलेकडे संशयास्पद रित्या 10 दिवसांचे बाळ असल्याची माहिती मिळाली. अधिकारी चौकशीसाठी पोहोचले असता संबंधित महिलेने पळ काढण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे संशय बळावला. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत बाळाला ताब्यात घेतले आणि तपासाची चक्रे फिरवली असता या आंतरजिल्हा रॅकेटचा पर्दाफाश झाला. ​या प्रकरणी एकूण 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून एका महिलेला अटक करण्यात आली आहे. त्यात ​डॉ. नितेश बाजपेयी (मुख्य सूत्रधार, गोंदिया) – फरार, ​ललेश्वरी सादेपाच (गोंदिया) – अटक ​मालती वाघमारे (पांढराबोडी, भंडारा) – फरार, ​पौर्णिमा धुर्वे (गोंदिया) – फरार, उमेशसिंग गहलोत (गोंदिया) – फरार तपासात समोर आले की, 3 लाखांपैकी 1 लाख रुपये रोख आणि 1 लाखाचा धनादेश मध्यस्थीच्या खात्यात जमा झाला होता. उर्वरित 1 लाख रुपये 5 फेब्रुवारीला दिले जाणार होते. मोठे रॅकेट असण्याची शक्यता गरिबीचा फायदा घेऊन अशा प्रकारे नवजात बालकांची विक्री करणाऱ्या या रॅकेटमध्ये आणखी किती जणांचा समावेश आहे, याचा तपास भंडारा पोलिस करत आहेत. फरार डॉक्टर आणि इतर आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना झाली असून, या घटनेने संपूर्ण विदर्भात संतापाची लाट उसळली आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर