ब्रेकिंग न्यूज
पिसगाव येथे मिस्त्री कामगाराची गळफास घेऊन आत्महत्या Dhiraj Pardeshi Case Update | धीरज परदेशी प्रकरणी पोलिसांची कारवाई | Ahilyanagar Crime News पावसाळ्यात जनावराच्या तोंडाला अन् जिभेवर फोड, असू शकतो गंभीर आजराचा धोका, अशी घ्या काळजी वाह रे मित्र…! घरी आला, खाल्लं, पिलं अन् जाता जाता…, कोल्हापूर पोलिसांनी 24 तासांत उचललं महाआवास अभियानात प्रतीक्षा गाडगे यांची दमदार कामगिरी Shravan Astrology: श्रावणात ग्रह फिरले, कुणाला संधी तर कुणावर संकट. मेष ते मीन राशीवाले काय काळजी घ्याल? खर्च कमी अन् मिळेल भरघोस उत्पन्न, गट शेती ठरेल फायद्याची, कृषी तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला, Video Agniveer-Bharti-2026: भावांनो, लागा तयारीला…! कोल्हापुरात 14 सप्टेंबरपासून अग्निवीर भरती, कुणाला संधी? CRIME : रात्री बायकोसोबत ‘आखाड पार्टी’ केली अन् सकाळी शुद्धीत येताच डोक्यात कुकरचं झाकण घालून संपवलं! शिक्ष… Maratha OBC Reservation: मराठा आरक्षणाचा वाद पुन्हा पेटणार? जरांगेंच्या आक्रमकतेला उत्तर देण्यासाठी OBC सम…
SP News Maregaon

अजित पवार असते तर आज दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या असत्या:विलीनीकरण न झाल्याची खंत, शरद पवार ठणठणीत- अंकुश काकडे

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


अजित पवार आज आपल्यामध्ये असते तर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आल्याचे चित्र महाराष्ट्राला पाहायला मिळाले असते. मात्र त्यांच्या अनुपस्थितीत विलीनीकरण होऊ शकले नाही, याची खंत आमच्यामध्ये आहे, असे शरद पवार गटाचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी म्हटले आहे. अंकुश काकडे पुढे बोलताना म्हणाले की, महापालिका निवडणुकीनंतर जिल्हा परिषद निवडणुकीची घोषणा झाली. त्यानंतर विलीनीकरणाचा निर्णय 8 तारखेला जाहीर करण्याचे ठरले होते. मात्र त्या दिवशी अजित पवार यांना काही कामानिमित्त दिल्लीला जावे लागणार असल्याने हा निर्णय 12 तारखेला जाहीर करण्याचे निश्चित करण्यात आले होते. आज अजितदादा असते तर राज्यातील राजकीय चित्र वेगळे असते, असेही त्यांनी नमूद केले. नेमके काकडे काय म्हणाले? अंकुश काकडे म्हणाले की, अजित पवार आम्हाला म्हणाले होते की फार ताणाताणी करु नका लवकरच आपण एकत्र होणार आहोत. विलीनीकरणाबाबत कुठे माशी शिंकली माहिती नाही. पण 12 तारखेलाच हे होणार होते. त्याचवेळी जयंत पाटील यांनी सांगितले होते की दादांची आणि आमची सखोल चर्चा झालेली आहे आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर 7-8 तारखेला याबद्दल जाहीर बोलण्यात येणार होते. पण ती तारीख अजित पवारांना सोयीची नसल्याने 12 तारीख ठरली होती. आज जर दादा असते तर चांगला निर्णय झाला असता. भविष्यात काय होईल याबद्दल मला काही माहिती नाही. शरद पवार यांनी देखील ही तारीख सांगितली होती, त्यामुळे आपण सर्व जण या तारखेची वाट पाहत होतो.
शरद पवारांची तब्बेत चांगली अंकुश काकडे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रिकरणाबाबत अधिक भाष्य करण्यास त्यांनी नकार दिला. आज जर अजित पवार असते, तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्या असत्या. यापेक्षा अधिक मी काही बोलणार नाही, असे ते म्हणाले. दरम्यान, शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत बोलताना काकडे यांनी सांगितले की त्यांची तब्येत उत्तम आहे. विठ्ठल मणियार यांच्याशी चर्चा झाली असून शरद पवार ठणठणीत आहेत. ते कालच रूममधून बाहेर पडले आणि कुटुंबीयांशी संवाद साधला, अशी माहिती त्यांनी दिली. 17 फेब्रुवारीला शरद पवारांची मुंबईत बैठक आता दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण होणार नाहीच, असे सांगत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी याविषयी 15 दिवसांपूर्वी सुरू झालेल्या चर्चेवर बुधवारी पडदा पाडला. दिल्लीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी मोदींची भेट घेतली. त्या वेळी तटकरेही उपस्थित होते. भेटीनंतर पक्षाची भूमिका स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की, आम्ही आमची ओळख जपूनच सत्तेत सहभागी आहोत. तीन महिन्यांपूर्वी अजित पवारांनी विलीनीकरणाच्या हालचाली सुरू केल्या होत्या. खुद्द शरद पवारांनीही राष्ट्रवादी एकत्र येण्याची अजित पवारांची अंतिम इच्छा पूर्ण झालीच पाहिजे, असे म्हटले होते. दोन्ही पक्ष एकत्र येऊन सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होणार, अशीही चर्चा शरद पवार गटाकडून सुरू होती. तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ विलीनीकरणास विरोध करत असल्याचाही आरोप नुकताच झाला. दरम्यान, तटकरेंनी भूमिका स्पष्ट केल्यावर 17 फेब्रुवारी रोजी मुंबईत शरद पवारांनी त्यांच्या पक्षाच्या आमदार, पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. राष्ट्रवादींचे विलीनीकरण होणार नाहीच- तटकरे नवी दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधताना तटकरे म्हणाले की, 2014 आणि 2019 पासूनच भाजपसोबत सत्तेत असावे ही अजितदादांची अधिकृत भूमिका होती. त्यानुसार शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या मूळ विचारधारेसह आमचा एनडीएतील सहभाग कायम आहे. सुनेत्रा पवारांची उपमुख्यमंत्रिपदी निवड कोणत्याही दबावाखाली नसून पूर्णतः पक्षीय सहमतीनेच झाली आहे. सुनेत्रा पवारांनी अजून खासदारकीचा राजीनामा दिलेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. तटकरेंनी सांगितले की, 2014 पासूनच राष्ट्रवादीने भाजपसोबत सत्तेत असावे, अशी अजित पवारांची स्पष्ट भूमिका होती. ती त्यांनी पक्षाच्या सर्व अंतर्गत बैठकींमध्ये मांडली होती. 2019 चा पहाटेचा शपथविधी हा त्याचाच भाग होता. तीन पक्षांच्या खिचडी सरकारपेक्षा दोन पक्षांचे (भाजप-राष्ट्रवादी) सरकार महाराष्ट्राला प्रगतिपथावर नेईल, असा विश्वास त्यांना होता.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर