ब्रेकिंग न्यूज
⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा
SP News Maregaon

अजितदादा पवार मागासवर्गीय सक्षमीकरण अभियान राबवणार:राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाच्या बैठकीत निर्णय

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


अजित पवार यांची शिव,शाहू,फुले,आंबेडकर विचारधारा पुढे नेण्यासाठी राज्यभर “अजितदादा पवार मागासवर्गीय सक्षमीकरण अभियान” राबविण्या एकमताने निर्धार करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभाग सेलकडुन विधानभवन येथे पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीत हा निर्णय झाला. “समाजातील शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोहोचवणे हे अजितदादा पवार यांचे ध्येय पुढे नेण्यासाठी मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, कोकण अशी राज्यात सहा विभागांची आखाणी करण्यात येणार आहे. यासाठी सामाजिक न्याय विभागाची जबाबदारी अत्यंत महत्त्वाची आहे.या नव्या अभियानामुळे पक्षाला मजबूती देण्यास मदत होईल असा विश्वास यावेळी उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी व्यक्त केलाय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभाग सेल शहर व ग्रामीण जिल्हाध्यक्षांच्या या बैठकीत सामाजिक न्यायाशी संबंधित विविध प्रश्न, आगामी पक्ष संघटनात्मक कार्यक्रम तसेच वंचित, दुर्बल घटकांपर्यंत पक्षाची भूमिका प्रभावीपणे पोहोचवण्याबाबत चर्चा करण्यात आली. पुढील वाटचाल सुरू ठेवण्यासाठी एकजूट ठेवत सामाजिक न्याय विभागाची भूमिका अधिक सक्रिय व जनतेशी जोडलेली असावी हीच खरी अजितदादा पवार यांना श्रद्धांजली ठरेल असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभाग प्रदेश अध्यक्ष सुनील मगर म्हणाले. मराठवाडा,पश्चिम महाराष्ट्र,उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, कोकण अशी राज्यात सहा विभागांची आखाणी करत पक्ष बांधणी करण्यात येणार आहे. शहर व ग्रामीण कार्यक्षेत्रातील समस्या, उपक्रम व संघटनात्मक कामाचा आढावा घेत “अजितदादा पवार मागासवर्गीय सक्षमीकरण अभियान” सुरू करण्यात येणार आहे. सामाजिक न्याय विषयक शासनाच्या योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी पक्ष पातळीवर समन्वय वाढवण्यावर भर देण्यात येईल असा विश्वास विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी कार्यकर्त्यांना दिला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभाग प्रदेश अध्यक्ष सुनील मगरे,कार्याध्यक्ष बाळासाहेब करडक,शहर तसेच ग्रामीण जिल्हाध्यक्ष,कार्याध्यक्ष व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर