ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

तुमचा खासदार 50 कोटींना विकला गेला; मोदींचे बूट चाटायला गेला!:यवतमाळच्या सभेतून संजय राऊतांचा बंडखोरांवर कठोर प्रहार

8 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या 6 खासदारांनी नुकतीच शिंदे गटात प्रवेश करत बंडखोरी केली आहे. या पार्श्वभूमीवर पक्षबांधणीसाठी उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र दौरा सुरू केला आहे. या दौऱ्याच्या निमित्ताने आज यवतमाळमध्ये आयोजित करण्यात आलेल्या सभेत खासदार संजय राऊत यांनी बंडखोर खासदार संजय देशमुख आणि भाजपवर सडकून टीका केली. “यवतमाळचा खासदार 50 कोटींना विकला गेला,” असा खळबळजनक आरोप करत राऊत यांनी त्यांच्यावर अत्यंत कठोर शब्दांत प्रहार केला. 50 कोटींचा ‘बाजार’ आणि खासदाराची किंमत सभेचे ठिकाण असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीचा संदर्भ देत राऊत यांनी बंडखोर खासदाराची खिल्ली उडवली. ते म्हणाले, “ही सभा कृषी उत्पन्न बाजार समितीत सुरू आहे. इथे शेतमालाला फारसा भाव मिळत नाही, पण पंधरा दिवसांपूर्वी इथे एक जण आला आणि तो 50 कोटींना विकला गेला. खऱ्या बाजारात त्याला कोणी पाच रुपयांनाही घेतलं नसतं. पण तो शिवसेनेत आला, उद्धव साहेबांनी त्याला खासदार केलं, त्याच्या खांद्यावर भगवी शाल टाकली, म्हणूनच त्याची किंमत 50 कोटी झाली. मात्र, उद्याच्या निवडणुकीत त्याची किंमत पाच रुपयेही उरणार नाही.” विकासनिधीसाठी नाही, मोदींचे बूट चाटायला गेले बंडखोर खासदार विकासनिधीसाठी सत्ताधाऱ्यांसोबत गेल्याचा दावा करतात, यावर राऊत यांनी खरपूस समाचार घेतला. “तुम्ही कसला विकास करणार? गेल्या 12 वर्षांत नरेंद्र मोदी देशाचा विकास करू शकले नाहीत. त्यांच्या वाराणसीत जाऊन बघा, रस्ते नाहीत, पाणी नाही. ज्या मोदींनी देशाचा विकास केला नाही आणि ज्यांच्या लोकांनी राम मंदिराच्या दानपेटीतील दोन हजार कोटी रुपयांची लूट केली, त्यांचे बूट चाटायला हे लोक गेले आहेत,” असा घणाघात राऊत यांनी केला. राजीनामा देण्याचं आव्हान आणि ‘एकनिष्ठते’वरून टोला खासदार संजय देशमुख यांच्यावर थेट निशाणा साधताना राऊत म्हणाले, “तुम्ही मशालीच्या चिन्हावर निवडून आलात. ही मतं लोकांनी उद्धव ठाकरे साहेबांना दिली होती. जर तुम्हाला गद्दारीच करायची असेल, तर राजीनामा द्या आणि पुन्हा निवडणुकीला उभे राहा. मग तुम्हाला कळेल की यवतमाळ-वाशिमची जनता कुणासोबत आहे.” यावेळी निष्ठेबद्दल बोलताना त्यांनी अत्यंत आक्रमक विधान केले. ते म्हणाले, “एकनिष्ठ राहण्यासाठी ‘आई नेक आणि बाप एक’ असावा लागतो. आम्ही सगळे एकनिष्ठ आहोत आणि निष्ठावंतांचा हा सागर या गद्दारांना तुडवल्याशिवाय राहणार नाही.” दहावे-बारावे घाला आणि कामाला लागा; ठाकरे कधी संपत नसतात बंडखोरांच्या जाण्याने खचून न जाण्याचा सल्ला त्यांनी शिवसैनिकांना दिला. “खासदार गेले म्हणजे गेले, आता आपल्यासाठी ते मेले. आपण आता त्या दुखवट्याला आलेलो आहोत. त्यांचे दहावे-बारावे घाला आणि पुढल्या कामाला मोकळे व्हा. दुःख करत बसू नका,” असे आवाहन राऊत यांनी केले. “शिवसेना आणि ठाकरे कधीच संपत नसतात, ते राखेतून पुन्हा उभे राहतात. काल नागपुरात उद्धव साहेबांचे झालेले प्रचंड स्वागत जर मिंधेंनी पाहिले असते, तर शिवसेना जागेवरच असल्याचे त्यांना कळले असते. हे गद्दार गेले तरी शिवसेना त्यांच्या छाताडावर पाय देऊन पुन्हा एकदा विधानसभा आणि लोकसभेत जाईल,” असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. यवतमाळ हा कायम बाळासाहेब ठाकरेंवर प्रेम करणारा जिल्हा असल्याचे सांगत, यापुढे येथे गद्दारीची कीड लागू न देण्याचे आवाहन संजय राऊत यांनी जनतेला केले. राऊत यांच्या या आक्रमक भाषणामुळे यवतमाळमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, आता यावर शिंदे गटाकडून काय प्रत्युत्तर येते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. संबंधित बातमी वाचा… यवतमाळच्या सभेत उद्धव ठाकरेंचा घणाघात:गद्दारांनी आईची शपथ घेऊन विश्वासघात केला, म्हणाले- पुढचा खासदार आमचाच निवडून येणार “जी लोकं कालपर्यंत माझ्यासोबत होती आणि आज ती फुटली, या लोकांची मला लाज वाटते. माझ्या नावावर आणि माझ्या दौऱ्यांमुळेच हे खासदार निवडून आले होते. या गद्दारांनी चक्क आईची शपथ घेऊन गद्दारी केली आणि गद्दारांच्या कळपात जाऊन सामील झाले. म्हणूनच, या मतदारसंघात येऊन मी माझ्या मतदारांची जाहीर माफी मागण्यासाठी आलो आहे,” अशा भावनिक शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांचे वाभाडे काढले. यवतमाळच्या महासभेत बोलताना त्यांनी बंडखोर खासदार संजय देशमुख यांचा एक जुना व्हिडिओही दाखवला. येथे वाचा संपूर्ण बातमी गद्दार खासदारांना धडा शिकवण्याची वेळ आलीय:छत्रपती संभाजी महाराजांना पकडून देणारी गद्दार औलाद अजूनही जिवंत; अरविंद सावंतांचा थेट हल्ला
उद्धव ठाकरे हे काही चार्टर्ड विमानाने आले नाही, त्यांचा दौरा ठरलेला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ते एकाच विमानातून आले हा केवळ योगायोग आहे, असे ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी म्हटले आहे. विमानात काही चर्चा होत नसते. छत्रपती शिवाजी महाराज यांना आपल्याच लोकांसोबत अधिक लढावे लागले आणि छत्रपती संभाजी महाराज यांना पकडून देण्यात आपलीच गद्दार औलाद होती ती अजून थोडी थोडी जिवंत आहे. येथे वाचा सविस्तर बातमी

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर