ब्रेकिंग न्यूज
⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा
SP News Maregaon

कोश्यारी एक नंबरचा लफंगा माणूस:ज्यांना धोतर नीट नेसता येत नाही, ते आम्हाला अक्कल शिकवणार का, संजय राऊत यांची सडकून टीका

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


भगतसिंह कोश्यारी एक नंबरचा लफंगा माणूस आहे. ज्यांना धोतर नीट नेसता येत नाही, ते आम्हाला अक्कल शिकवणार काय, असे म्हणत संजय राऊत यांनी माजी राज्यपालांवर जोरदार टीका केली. कोश्यारी यांनी राज ठाकरे हे मोदींना घाबरतात, असे वक्तव्य केले होते. त्यांच्या याच वक्तव्याचा संजय राऊत यांनी आज जोरदार समाचार घेतला. राज ठाकरेंनी सरसंघचालक मोहन भागवत यांच्या कार्यक्रमावर एक पोस्ट लिहून टीका केली होती. त्यावर कोश्यारी यांनी ‘राज ठाकरे मोंदींना जरा जास्तच घाबरलेत, त्यांनी नरेंद्र मोदींच्या जवळ जावे!’ असे म्हणत टीका केली होती. या टीकेलाच आज संजय राऊतांनी उत्तर दिले. ‘भगतसिंह कोश्यारींनी संजय राऊत यांचा लंगोट सोडला. उद्धव ठाकरेंचा लंगोट सोडला,’ म्हणत भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी संजय राऊत यांना जोरदार उत्तर दिले. तसेच माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भूमिकेची जोरदार पाठराखण केली. मोदी, शहांनी पलायन केले संजय राऊत यांनी माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावरही सडकून टीका केली. राऊत म्हणाले, ‘जो स्वतः धोतर नीट नेसू शकत नाही, तो काय आम्हाला अक्कल शिकवतोय. ठाकरेंना सांगतोकी की मोदींना घाबरू नका. मोदींना कोण घाबरत आहे?,’ असा सवाल त्यांनी केला. राऊत पुढे म्हणाले, ‘राहुल गांधींनी काल सांगितलं नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यात डोळ्यात डोळे घालून बोलण्याची हिंमत नाही. गांधींचे भाषण सुरू असताना पंतप्रधान आणि अमित शाह यांनी संसदेतून पलायन केले आणि हे आम्हाला सांगणार,’ असा संताप त्यांनी व्यक्त केला. जोड्याने मारले असते संजय राऊत पुढे म्हणाले की, ‘तुमच्या हातात सत्ता आहे. तुमच्या हातात एजन्सी आहे. म्हणून तुम्ही आम्हाला सांगताय. पहिले नीट धोतर नेसायला शिका. मग महाराष्ट्रात येऊन आम्हाला अक्कल शिकवा. हा एक नंबरचा लफंगा माणूस. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले यांचा अपमान करणारा माणूस. त्याला भारतीय जनता पक्षाने पद्मभूषण दिला. हा बाळासाहेब ठाकरे यांचा विचार नाही मिस्टर फडणवीस हे लक्षात घ्या. त्याला पद्मभूषण देणाऱ्यांना बाळासाहेब ठाकरेंनी जोड्याने मारले असते,’ अशी आगपाखडी त्यांनी केली. तपास यंत्रणा गुलाम भाजप सत्तेत आल्यापासून देशातील आणि राज्यातील तपास यंत्रणा या भाड.. झाल्या आहेत. यामध्ये ईडी, महाराष्ट्रातील पोलिस यंत्रणा असेल न्यायालयीन चौकशी असेल यावर जनतेचा विश्वास राहिलेला नाही. ही लोकं भारत मातेला ट्रम्पकडे गहाण ठेवू शकतात ते काहीही करू शकतात. मोदी सत्तेत आल्यापासून कोणत्याही घटनेचा तपास निष्पक्ष झाला नाही. जे भ्रष्टनेते त्यांच्यासोबत गेले त्यांना सोडून देण्यात आले आहे. सरकार आणि तपास यंत्रणावर आमचा विश्वास नाही, असे उबाठाचे नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे. अहमदाबादमध्ये विमान कसं पडलं ? संजय राऊत म्हणाले की, अहमदाबादमध्ये विमान पडले त्यांचा तपास काय झाला? पण झालं काय? अहमदाबादमध्ये विमान कसं पडलं हे सांगू शकाल? अजितदादांना घेऊन येणारं विमान सुद्धा गुजरातमधूनच आलं. लोकांच्या मनात संशय येणारच. तुम्ही तापस यंत्रणांबाबत फाजील आत्मविश्वास दाखवू नका. न्यायालायापासून सर्व तपास यंत्रणा आपल्या टाचेखाली आहे हे सर्व जनतेना माहिती आहे. ..तर चौकशीला गती मिळाली असती संजय राऊत म्हणाले की, रोहित पवार यांनी मांडलेले मुद्दे आहेत ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तपासले पाहिजे. उपमुख्यमंत्री अजित पवार गेल्यानंतर तुम्हाला दु:ख झाले होते, त्यांचा पुतण्या सत्य आणि तथ्य दाखवतो आहे तर फडणवीसांनी त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे. तुमचे दु:ख हे ढोंग आहे. तपास यंत्रणा यांच्यावर जनतेचा विश्वास नाही, हे देवेंद्र फडणवीसांनी लक्षात ठेवावे. अजित पवारांच्या अपघाताचे सत्य पवार कुटुंबियांनी बाहेर काढले आहे. काल सुनेत्रा पवारांची मोदी यांच्याशी चांगली बैठक झाली आहे, त्यांनी दादांच्या अपघाताबद्दल मोदींशी चर्चा करायला हवी होती, तर तपासाला वेग आला असता. रोहित पवारांच्या प्रत्येक मुद्द्यावर अभ्यास झाला पाहिजे. अजित पवारांकडे भाजपच्या ज्या फाईल होत्या त्या घेण्यासाठी पूर्व विदर्भातील कोणता नेता अजित पवार यांच्याकडे आला होता का? असा सवाल राऊत यांनी केला आहे. हे गृहमंत्र्यांचे अपयश संजय राऊत म्हणाले की, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यबाबतीमध्ये तक्रारी आणि आरोप वारंवार होत आहे. मुख्यमंत्र्यांवर कसा विश्वास ठेवायचा? असा सवाल राऊत यांनी केला आहे. मुंबईत चार वर्षे याच सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी, मंत्र्यांनी, प्रशासकाने भ्रष्टाचार केला. त्यांनी नक्कीच तपास केला पाहिजे. मुंबई सुरक्षित नसेल तर हे सरकारचे अपयश आहे. महापौरांना गृहमंत्री कोण आहेत हे माहिती पाहिजे असा टोला ही त्यांनी लगावला आहे. महिलांना सुरक्षित ठेवणे गृहमंत्र्यांचे काम महापौरांचे नाही, मुंबईच्या महापौरांनी यासाठी ठिय्या आंदोलन केले पाहिजे. नवनाथ बन यांचा पलटवार भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी संजय राऊत यांना उत्तर दिले. ‘भगतसिंह कोश्यारींनी संजय राऊत यांचा लंगोट सोडला. उद्धव ठाकरेंचा लंगोट सोडला. त्यांना महाराष्ट्रासमोर उघडे करण्याचे काम केले. कोश्यारींजी नसते, तर तुम्ही त्याचवेळी महाराष्ट्र विकून खाल्ला असता,’ अशा शब्दांत राऊत यांच्यावर पलटवार केला.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर