ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: ‘ऑक्टोबर हिट’मुळे रेल्वेचा खोळंबा, मुंबईत रुळांच्या प्रसरणाने प्रवाशांचे हाल, काय घडतंय? ✦ ⚡ वन्यजीव संरक्षणाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत! ✦ ⚡ कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार, एकाचा खून, पित्रा-पुत्रासह तिघांना जन्मठेप, काय घडलं? ✦ ⚡ Pune Video:पुण्यातील MPSCविद्यार्थ्यांना पोलिसांकडून नोटीस, २९ क्लास, अभ्यासिका चालकांनाही नोटिसा ✦ ⚡ लिलाबाई बापूराव कुचनकर यांचे निधन ✦ ⚡ चारा संपला, पाणीही नाही प्यायला, जिवापाड जपलेल्या मुक्या जिवाला अर्ध्या किंमतीत विकायची वेळ, बीडमधलं भीषण व… ✦ ⚡ ‘आई मला वाचव’ तरुणाचा व्हॉट्सॲपवर मेसेज अन् घडलं भयंकर, पंढरपूरमधील त्या घटनेने एकच खळबळ ✦ ⚡ Eknath Shinde Amit Shah: दिल्लीत खलबतं, महाराष्ट्रात टेन्शन! एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा; अमित शाहांसो… ✦ ⚡ Instagram वर मैत्री, लिव इन रिलेशनशीपमध्ये असताना मृत्यू, कल्याणच्या मुलीसोबत छत्तीसगडमध्ये काय घडलं? ✦ ⚡ दिनेश धोंडूजी वैद्य यांच्या ३० वर्षांच्या ज्ञानयज्ञाची सांगता
SP News Maregaon

गडचिरोलीत कडक उन्हाचा फटका पक्ष्यांनाही!:एकाच झाडावरच्या 500 वटवाघळांचा मृत्यू; जंगलात दुर्गंधी पसरल्याने प्रकार उघडकीस

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


महाराष्ट्रात विशेषतः विदर्भात उकाडा चांगलाच वाढला आहे. तीव्र उष्णता तसेच जवळपास 46 डिग्री पर्यंतचे तापमान, यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. त्यात उष्माघातामुळे देखील अनेकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या उन्हाचा फटका केवळ मनुष्यांनाच बसत आहे असे नाही. गडचिरोलीमध्ये उष्णतेमुळे तब्बल 500 वटवाघळांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. एकाच वेळी आणि एकाच ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात वटवाघळांचा मृत्यू होण्याची ही राज्यातील बहुदा पहिलीच घटना असावी. चंद्रपूर, यवतमाळसह गडचिरोलीचेही तापमान चांगलेच वाढले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा वनविभागातील परिसरात चिंचाच्या झाडावर नेहमीच वटवाघळ वास्तव्य करत असतात. गेल्या 20-22 वर्षांपासून या चिंचाच्या झाडावर वटवाघळांचा जत्थाच मुक्कामी असतो. मात्र, जिल्ह्यात पहिल्यांदाच या पक्ष्यांना तापमान वाढीचा फटका बसला आहे. एवढे मोठे तापमान आणि उष्णता सहन न झाल्याने या झाडावरील एकाच वेळी 500 पेक्षा अधिक वटवाघळ मृत झाली आहेत. जंगलातून दुर्गंधी आल्याने प्रकार उघडकीस वनपरीक्षेत्र अधिकारी सुधीर सुरपाम यांनी दिलेल्या माहितीनुसार, अचानक जंगलातून दुर्गंधी येऊ लागल्यानंतर लोकांनी तिथे जाऊन पाहिल्यावर हा प्रकार उघडकीस आला. झाडाच्या खाली वटवाघळ मृत अवस्थेत पडलेली आढळून आली. तसेच काही वटवाघळ हे झाडावरच लोंबकळत मृत झाली होती. त्यानंतर काही गावकऱ्यांनी पुढाकार घेत जेसीबीच्या सहाय्याने खड्डा खोदून या सर्व मृत वटवाघळांना पुरले, अशी माहिती त्यांनी दिली आहे. दरम्यान, सध्या गडचिरोली जिल्ह्यात 46 डिग्री तापमानाची नोंद झाली आहे. त्यामुळे येथील प्रशासनाने नागरिकांना दुपारच्या वेळी घराबाहेर न पाडण्याचे आवाहन केले आहे. तसेच महत्त्वाचे काम असल्याच घराबाहेर पडावे व आवश्यक ती काळजी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर