ब्रेकिंग न्यूज
⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू
SP News Maregaon

मुलगा अन् सावत्र आईचे अनैतिक संबंध; दाेघांनी केली आत्महत्या:दोघांना गत आठवड्यात पोलिसांनी आणले शोधून

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


सावत्र आई आणि मुलाच्या पवित्र नात्याला काळीमा फासणाऱ्या अनैतिक प्रेमसंबंधांचा शेवट गुरुवारी (२८ मे ) अंबाजोगाई येथे झाला. बदनामीच्या भीतीने मुलाने विष प्राशन केले. प्रियकराच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने सावत्र आईने स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाच्या परिसरातच झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. केज तालुक्यातील सोनीजवळा येथील साहेबराव पवार (४०) यांचा पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट झाला होता. त्यानंतर ४ वर्षांपूर्वी त्यांनी अनिता नावाच्या महिलेशी दुसरे लग्न केले. साहेबराव यांचा संसार सुरू असतानाच त्यांच्या पहिल्या पत्नीचा मुलगा अनिल पवार (२१) याचे आपल्या सावत्र आईशी (अनिता) प्रेम जुळले. हे नाते इतके टोकाला गेले की काही दिवसांपूर्वी अनिल आणि अनिता हे दोघे घरातून पळून गेले होते. पत्नी आणि मुलगा दोघेही बेपत्ता झाल्याने साहेबराव यांनी पोलिसांत धाव घेतली होती. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे फोन ट्रॅक करून हैदराबाद गाठले. त्यांनी २१ मे रोजी दोघांना ताब्यात घेतले होते. या वेळी कामाच्या शोधात हैदराबाद येथे गेलो होतो, असे त्यांनी पोलिसांना सांगितले. हे कौटुंबिक प्रकरण असल्याने साहेबराव यांनीही आता माझी कुणाविरोधात तक्रार नाही, असे पोलिसांना लेखी दिले होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर