ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

संत वासुदेव महाराज पालखीचे शुक्रवारी प्रस्थान:श्रीक्षेत्र श्रद्धासागरला आढावा बैठक, विविध कार्यक्रमांनी साजरा होणार पुण्यतिथी महोत्सव‎

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


विठुरायाच्या भेटीसाठी आसुसलेल्या वारकऱ्यांच्या पुण्यपावन परंपरेचे पाईकत्व अंगिकारून, पंढरपूर वारीसाठी श्री संत वासुदेव महाराज पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. श्री संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्थेच्या वतीने आयोजित हा १६ वा पायी पालखी सोहळा २६ जूनला दुपारी १ वाजता श्री क्षेत्र श्रद्धासागर, अकोट येथून पंढरपूरकडे प्रस्थान करेल. श्रीक्षेत्र श्रद्धासागर ते श्रीक्षेत्र पंढरपूर असा सुमारे ६०० किलोमीटरचा पायी प्रवास करून ही दिंडी श्री संत वासुदेव महाराज धर्मशाळा, पंढरपूर येथे पोहोचेल. या पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या सर्व वारकऱ्यांसाठी संस्थेच्या वतीने निवास, भोजन व आरोग्याची व्यवस्था करण्यात आली आहे. २६ जून रोजी सकाळी ९ वाजता पालखी सोहळा प्रमुख तथा संस्थाध्यक्ष वासुदेवराव महाराज महल्ले यांचे प्रस्थानाचे कीर्तन होईल. त्यानंतर महाप्रसाद वाटप होऊन दुपारी एक वाजता रथयात्रा व पायी दिंडीचे प्रस्थान होईल. सोहळ्याचे नियोजन नुकत्याच पार पडलेल्या आढावा बैठकीत निश्चित झाले. या वारीचे मार्गक्रमण वासुदेवराव महाराज महल्ले, महादेवराव ठाकरे, अविनाश गावंडे, अनिल कोरपे, अंबादास महाराज मानकर यांच्या मार्गदर्शनात होणार आहे. २४ जुलैला पंढरपुरात पुण्यतिथी सोहळा : सद्गुरू श्री संत वासुदेव महाराज यांनी २ जुलै २००९ रोजी पंढरपुरात पांडुरंगाच्या चरणी आपला देह अर्पण केला होता. या तिथीचे औचित्य साधून २४ जुलै रोजी पंढरपूर येथील चंद्रभागा वाळवंटातील अग्निसंस्कार स्थळी अभिषेक, आरती, पुण्यतिथीचे कीर्तन, महाप्रसाद व रात्री दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. पंढरपुरात अखंड हरिनाम सप्ताह व नोंदणी पंढरपूर येथील श्री संत वासुदेव महाराज धर्मशाळेत २२ ते २९ जुलै दरम्यान श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताह होईल. यात नामवंत महाराजांचे कीर्तन व प्रवचन होतील. वारीत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या भक्तांनी आपले नाव, आधार कार्ड झेरॉक्स व पासपोर्ट फोटोसह संस्थेच्या कार्यालयात त्वरित नोंदवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर