ब्रेकिंग न्यूज
⚡ स्कूल बसच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू ✦ ⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर
SP News Maregaon

अमरावती- सुरत एक्स्प्रेस आता एलएचबी कोचसह:आधुनिक सुविधांमुळे प्रवास हाेणार आरामदायक‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मध्य रेल्वेने निवडक गाड्यांमध्ये पारंपारिकऐवजी नवीन तंत्रज्ञान वापरुन एलएचबी डबे (लिंक हॉफमन बुश) डबे लावण्यात आले. आता अमरावती- सुरत एक्स्प्रेसच्या पारंपरिक आयसीएफ रॅकऐवजी एलएचबी रेकमध्ये रूपांतर करण्याचा निर्णय घेतला आहे आता . या डब्यांमुळे प्रशावांच्या सुरक्षेत वाढ होणार असून, प्रवास आरामदायकही होणार आहे. मध्य रेल्वेने प्रवाशांच्या अधिक सुरक्षिततेसाठी आणि उत्कृष्ट प्रवास अनुभवासाठी या ८ गाड्यांमधील सध्याच्या (पारंपारिक) डब्यांच्या जागी नवीन एलएचबी डबे कायमस्वरूपी बसवण्याचा निर्णय घेतला होता. एलएचबी डबे हे स्टेनलेस स्टीलपासून तयार केलेले राहणार आहेत. यात अँटी-क्लाइंबिंग यंत्रणा, अग्निरोधक साहित्य, एलईडी प्रकाश व्यवस्था, ५-पीन चार्जिंग सॉकेट्स, डिस्क ब्रेक प्रणाली; तसेच आपत्कालीन स्थितीत उघडता येणाऱ्या खिडक्या अशा अत्याधुनिक सुविधा आहेत. प्रवासी तिकीट बुकिंगसाठी RailOne ॲप देखील डाउनलोड करू शकतात.या विशेष गाड्यांच्या थांब्यावरील सविस्तर वेळापत्रकासाठी, कृपया www.enquiry.indianra il.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करता येणार आहे. गाडी क्रमांक २०९२६ अमरावती- सुरत एक्स्प्रेस अमरावती येथून २९ मे २०२६ पासून एलएचबी कोचसह धावेल. गाडी क्रमांक २०९२५ सुरत- अमरावती एक्स्प्रेस सुरत येथून २८ मेपासून एलएचबी कोचसह धावणार आहे. अशी असेल रचना सुधारित रचनेनुसार १६ डबे पुढीलप्रमाणे राहणार आहेत. १ वातानुकूलित चेअर कार, ४ द्वितीय श्रेणी चेअर कार, २ स्लीपर क्लास, ७ सामान्य द्वितीय श्रेणी डबे, १ लगेजसह गार्ड ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर व्हॅन राहणार आहे. एलएचबी कोच आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असून प्रवाशांना अधिक आरामदायी, सुरक्षित आणि सुकर प्रवासाचा अनुभव देतात. या कोचमध्ये उत्तम सस्पेन्शन, अधिक स्थिरता तसेच प्रगत सुरक्षा सुविधा उपलब्ध आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर