ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

एकनाथ शिंदेंचा विश्वासाला पात्र ठरणारा शिलेदार कोण?:एक नाव निश्चित होत असतानाच दुसऱ्या ज्येष्ठ नेत्याने व्यक्त केली इच्छा

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


भारतीय निवडणूक आयोग यांनी दहा राज्यांमधील 37 राज्यसभा जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या सर्व जागांसाठी 16 मार्च रोजी मतदान होणार असून त्याच दिवशी संध्याकाळी पाच वाजल्यापासून मतमोजणी केली जाणार आहे. रिक्त होणाऱ्या 37 जागांपैकी 12 जागा राष्ट्रीय लोकशाही आघाडीशी संबंधित सदस्यांच्या आहेत, तर 25 जागा विविध विरोधी पक्षांकडे आहेत. त्यामुळे या निवडणुकीकडे राष्ट्रीय पातळीवर महत्त्वाच्या राजकीय चाचणीच्या दृष्टीने पाहिले जात आहे. राज्यनिहाय चित्र पाहिल्यास महाराष्ट्रातून सर्वाधिक सात जागांसाठी निवडणूक होत आहे. त्याखालोखाल तामिळनाडूत सहा, तर पश्चिम बंगाल आणि बिहारमधून प्रत्येकी पाच जागांसाठी मतदान होणार आहे. उर्वरित जागा इतर राज्यांमध्ये विभागल्या गेल्या आहेत. महाराष्ट्रातील सात जागांची निवडणूक विशेष महत्त्वाची मानली जात असून विधानसभेतील पक्षीय संख्याबळाच्या आधारे कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील, याबाबत उत्सुकता आहे. राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी आपापली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्रातील काही प्रमुख नेत्यांचा कार्यकाळ 2 एप्रिल रोजी संपत आहे. त्यामध्ये शरद पवार, रामदास आठवले, प्रियांका चतुर्वेदी यांचा समावेश आहे. तसेच तामिळनाडूतील कनिमोझी आणि तिरुची शिवा यांचाही कार्यकाळ संपत आहे. याशिवाय राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांचाही कार्यकाळ 2 एप्रिलला पूर्ण होत आहे. त्यामुळे या जागांवर नव्या सदस्यांची निवड होणार आहे. 16 मार्च रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 4 या वेळेत मतदान पार पडेल आणि त्याच दिवशी निकाल जाहीर होण्याची प्रक्रिया सुरू होईल. महाराष्ट्रात विशेषतः सत्ताधारी शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारीबाबत चर्चा रंगली आहे. माजी खासदार राहुल शेवाळे यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात असले तरी पक्षातील इतर काही नेत्यांची नावेही चर्चेत आहेत. ज्योती वाघमारे, शायना एनसी, संजय निरुपम यांची नावे संभाव्य उमेदवारांमध्ये घेतली जात आहेत. याशिवाय ज्येष्ठ नेते गजानन किर्तीकर यांनीही राज्यसभेवर जाण्याची इच्छा व्यक्त केल्याचे समजते. त्यामुळे अंतिम क्षणी पक्षश्रेष्ठी कोणावर विश्वास दाखवतात, याकडे लक्ष लागले आहे. शिंदे गटाकडे सुमारे 20 अतिरिक्त मते शिंदे गटाकडे विधानसभेत आवश्यक ते संख्याबळ असल्यामुळे त्यांचा एक उमेदवार निवडून येऊ शकतो, असे चित्र आहे. यासोबतच त्यांच्याकडे सुमारे 20 अतिरिक्त मते असल्याची चर्चा आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज उमेदवारीबाबत निर्णय घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अंतिम निर्णय घेण्यापूर्वी ते पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी सविस्तर चर्चा करतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाकडून नेमकी कुणाची वर्णी लागते, हे लवकरच स्पष्ट होणार आहे. 16 मार्च रोजी मतदान, त्याच दिवशी मतमोजणी निवडणूक कार्यक्रमानुसार उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत 5 मार्च निश्चित करण्यात आली आहे. त्यानंतर 6 मार्च रोजी अर्जांची छाननी होईल. उमेदवारांना माघार घेण्यासाठी 9 मार्चपर्यंत वेळ देण्यात आली आहे. या सर्व टप्प्यांनंतर 16 मार्च रोजी मतदान होऊन त्याच दिवशी मतमोजणी सुरू होईल. देशातील 37 जागांसाठी होणारी ही निवडणूक पुढील राजकीय समीकरणांवर परिणाम करणारी ठरणार असल्याने सर्व पक्षांची हालचाल वाढली आहे. महाराष्ट्रातील सात जागांवरील निकाल राज्याच्या राजकारणात नवे संकेत देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर