ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

विशाखा सुभेदारचा मुलगा कुवैतमध्ये अडकला:व्हिडिओद्वारे रडत दिली माहिती; मोदी, फडणवीस, शिंदे, राज ठाकरेंना सुटका करण्याचे साकडे

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


इराण विरुद्ध इस्त्रायल – अमेरिका युद्धामुळे हजारो भारतीय नागरीक आखाती देशांत अडकले आहेत. या लोकांना मायदेशी आणण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. मराठी हास्य अभिनेत्री विशाखा सुभेदार यांचा लंडनला जाणारा मुलगाही या युद्धामुळे कुवैतमध्ये अडकला आहे. त्याच्या सुटकेसाठी विशाखा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना साकडे घातले आहे. यावेळी त्यांच्या डोळ्यांतून अश्रू ओघळत होते. विशाखा सुभेदार यांनी एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, माझी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती आहे की, माझा मुलगा अभिनय लंडनच्या प्रवासाला निघाला होता. पण सध्या तो कुवैतमध्ये अडकला आहे. गेली 4 दिवस एअरस्पेस नसल्यामुळे तो तिथे अडकून निघाला आहे. आता तेथील परिस्थिती गंभीर होत आहे. आपण हे बातम्यांमध्ये पाहत आहोत. तो स्वतः तिथे ते अनुभवत आहे. तिथे ड्रोन हल्लेही होत आहेत. आत्ता विमान कंपनीने त्याची तेथील एका हॉटेलमध्ये व्यवस्था केली आहे. कुवैतमधील भारतीय दुतावासानेही त्याला मदत केली आहे. परंतु आता त्यांना भारतात परत आणण्याची व्यवस्था करावी. जसे दुबईतील लोकांना परत आणण्याची व्यवस्था करण्यात आली, तशी व्यवस्था कुवैतमध्ये अडकलेल्या भारतीयांनाही परत आणण्याची व्यवस्था करावी ही त्यांना कळकळीची विनंती आहे. अनेक भारतीय, अनेक पोरांच्या आया, अनेक कुटुंब त्यांची इथे मायदेशी वाट पाहत आहेत. त्यामुळे त्यांना लवकरात लवकर परत आणण्याची व्यवस्था करावी. त्यांची योग्य ती काळजी घ्यावी, एवढीच विनंती मी सरकारला आणि भारताच्या पंतप्रधानांना यांना करत आहे. त्यांनी या लवकरात लवकर या स्थितीतून एखादा मार्ग काढावा, असे विशाखाने रडत – रडत आपल्या व्हिडिओत म्हटले आहे. दुबईतही अनेकजण अडकले – सुप्रिया सुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एका ट्विटद्वारे दुबईत कृष्णा पवार व त्यांचे कुटुंबीय तथा ज्योती कुमारी यादव हे दुबईत अडकल्याची माहिती दिली आहे. त्यांनी या नागरिकांना तातडीच्या मदतीची गरज असल्याचे नमूद करत परराष्ट्र मंत्री एस जयंशंकर व यांना त्यांना मदत करण्याचे आवाहन केले आहे.
मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यंत्रणांच्या संपर्कात दुसरीकडे, आखाती देशांत अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी राज्य सरकार सक्रिय झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासही एकनाथ शिंदे व सुनेत्रा अजित पवार हे दोन्ही उपमुख्यमंत्री या प्रकरणी विविध यंत्रणांच्या संपर्कात आहेत. एकनाथ शिंदे यांनी दुबईसह यूएईत अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या मदतीसाठी तातडीने पाऊले उचलली आहेत. त्यांनी तिथे अडकलेल्या नागरिकांशी व्यक्तिशः संवाद साधून त्यांच्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था केली. त्यानुसार, स्टार एअरची दोन विशेष विमाने आज दुपारी फुजैरा एअरपोर्टवरून उड्डाण घेणार आहेत. ही विमाने आजच मुंबईत पोहोचण्याची शक्यता आहे. सरकारने दुबईस्थित इंडियन पीपल्स फोरमच्या सहकार्याने मदत व समन्वयासाठी एक विशेष व्हॉट्सॲप हेल्पलाईन उपलब्ध करून देण्यात आली आहे. ज्यांना तातडीची मदत, माहिती किंवा मार्गदर्शन आवश्यक आहे, त्यांनी +97150 365 4357 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर