ब्रेकिंग न्यूज
⚡ वन्यजीव संरक्षणाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत! ✦ ⚡ Pune Video:पुण्यातील MPSCविद्यार्थ्यांना पोलिसांकडून नोटीस, २९ क्लास, अभ्यासिका चालकांनाही नोटिसा ✦ ⚡ लिलाबाई बापूराव कुचनकर यांचे निधन ✦ ⚡ चारा संपला, पाणीही नाही प्यायला, जिवापाड जपलेल्या मुक्या जिवाला अर्ध्या किंमतीत विकायची वेळ, बीडमधलं भीषण व… ✦ ⚡ ‘आई मला वाचव’ तरुणाचा व्हॉट्सॲपवर मेसेज अन् घडलं भयंकर, पंढरपूरमधील त्या घटनेने एकच खळबळ ✦ ⚡ Eknath Shinde Amit Shah: दिल्लीत खलबतं, महाराष्ट्रात टेन्शन! एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा; अमित शाहांसो… ✦ ⚡ Instagram वर मैत्री, लिव इन रिलेशनशीपमध्ये असताना मृत्यू, कल्याणच्या मुलीसोबत छत्तीसगडमध्ये काय घडलं? ✦ ⚡ दिनेश धोंडूजी वैद्य यांच्या ३० वर्षांच्या ज्ञानयज्ञाची सांगता ✦ ⚡ ज्ञानेश्वर ढोके यांच्या ३२ वर्षांच्या ज्ञानयज्ञाची सांगता ✦ ⚡ 6,6,6,4,6,4,6,6… इकडं अभिषेकने ‘गोल्ड’ पटकावलं, तिकडं गुरू Yuvraj Singh चा राडा! ऑस्ट्रेलियाविरुद्ध 71 धा…
SP News Maregaon

काळाचा घाला! विहिरीत पडून ७८ वर्षीय वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू; मांगली परिसरात हळहळ

4 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

मारेगाव पोलिसांत BNSS कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद; शवविच्छेदन अहवालानंतरच कारण स्पष्ट होणार

सुरेश पाचभाई | मारेगाव

मारेगाव तालुक्यातील मांगली येथे गुरुवारी (दि. १२ फेब्रुवारी) पहाटेच्या सुमारास एका ७८ वर्षीय वृद्धाचा विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली. महादेव बालाजी गाणफाडे असे मृत वृद्धाचे नाव असून, या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महादेव गाणफाडे हे पहाटे सुमारे ३ वाजताच्या दरम्यान शौचास जाण्यासाठी घराबाहेर पडले होते. बराच वेळ उलटूनही ते घरी परतले नसल्याने कुटुंबीयांनी चिंतेपोटी त्यांचा शोध सुरू केला. शोध घेत असताना घराशेजारील शेतातील विहिरीत त्यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. हे दृश्य पाहून कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.

घटनेची माहिती मिळताच मारेगाव पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह विहिरीतून बाहेर काढून पंचनामा करण्यात आला असून, पुढील तपासासाठी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

प्राथमिक माहितीनुसार, मृतक महादेव गाणफाडे हे काही काळापासून मानसिक आजाराने त्रस्त असल्याची चर्चा आहे. मात्र, त्यांच्या मृत्यूमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच याबाबत ठोस माहिती समोर येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

या प्रकरणी भारतीय नागरी सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस निरीक्षक श्याम वानखेडे व सहाय्यक पोलिस निरीक्षक दिगंबर किनाके यांच्या मार्गदर्शनाखाली मारेगाव पोलीस पुढील तपास करीत आहेत.
एका ज्येष्ठ नागरिकाचा अशा प्रकारे झालेला दुर्दैवी अंत गावकऱ्यांना चटका लावणारा ठरला असून, मांगली परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर