ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

पुणे दारूकांड:मुख्य आरोपींवर “मकोका’ लावणार- मंत्री कदम, वारसांना आठवड्यात आर्थिक मदत

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसराला हादरवून सोडणाऱ्या विषारी दारूकांड प्रकरणाचे गुरुवारी विधान परिषदेत तीव्र पडसाद उमटले. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा आणि प्रशासकीय ढिसाळपणावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरत “संवेदनशून्य सरकार’ अशी घणाघाती टीका केली. तर, विरोधक या संवेदनशील विषयावर केवळ राजकारण करत असल्याचा पलटवार सत्ताधाऱ्यांनी केला. दोन्ही बाजूंचे सदस्य आक्रमक झाल्याने सभागृहात जोरदार गदारोळ पाहायला मिळाला. दरम्यान, या प्रकरणातील मुख्य आरोपींवर “मकोका’ अंतर्गत कारवाई करण्याचा विचार सुरू असून, सर्व २२ मृतांच्या कुटुंबीयांना पुढील ७ दिवसांत आर्थिक मदत दिली जाईल, अशी घोषणा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केली. भाजप आमदार अमित गोरखे यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे पिंपरी-चिंचवड आणि पुण्यातील मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीची मागणी केली. यावर चर्चेदरम्यान शिवसेना (ठाकरे गट) आमदार सचिन अहिर, अंबादास दानवे आणि अनिल परब यांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले. “हडपसर, दापोडी, बोपोडी परिसरात वर्षानुवर्षे अवैध दारूचे अड्डे सुरू आहेत. या कांडातील काही मृतांवर पोस्टमॉर्टेमशिवाय अंत्यसंस्कार करण्यात आले, त्यामुळे प्रत्यक्ष मृतांचा आकडा अधिक असू शकतो,” असा दावा विरोधकांनी केला. तसेच भिवंडीतून २१५ लिटर मिथेनॉल पुण्यात आलेच कसे, असा सवाल करत वरिष्ठ पोलिस आणि उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांवर केवळ निलंबन नव्हे तर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्याची मागणी त्यांनी केली. मुख्यमंत्री भेटायलाही गेले नाहीत : सचिन अहिर चर्चेदरम्यान आमदार सचिन अहिर यांनी टोला लगावला की, “एवढी मोठी घटना घडूनही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा पालकमंत्र्यांनी अजूनही पीडित कुटुंबांची भेट घेतलेली नाही. हे सरकार गंभीर नाही. यावर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने सीआयडी चौकशीचे आदेश दिले असून मंत्री गिरीश महाजन यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. मात्र, विरोधकांचे समाधान झाले नाही आणि गोंधळ सुरू झाला.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर