ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

मुंबईत मेट्रोचा स्लॅब रोडवर कोसळला:ऑटो, कारचा चेंदामेंदा; 1 जण ठार, 3 जण जखमी, मुलुंडच्या एलबीएस रोडवर घडली दुर्घटना

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मेट्रो पुलाचा स्लॅब कोसळून 1 जण ठार व 3 जण जखमी झाल्याची घटना मुंबईच्या मुलुंड पश्चिम परिसरातील एलबीएस रोडवर घडली आहे. ऐन वर्दळीच्या वेळी ही घटना घडल्यामुळे एकच खळबळ माजली आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, मुलुंड पश्चिम परिसरातील एलबीएस रोडवर मेट्रो पुलाचे काम सुरू आहे. या पुलाच्या स्लॅबचा एक तुकडा शनिवारी दुपाीर 12.20 च्या सुमारास अचानक रस्त्याने जाणाऱ्या ऑटो व एका कारवर पडला. त्यात ऑटो व कारमधून प्रवास करणारे 3-4 जण जखमी झाले. या जखमींना तत्काळ लगतच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे उपचारादरम्यान एका जखमीचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या व्यक्तीची ओळख अद्याप पटली नाही. गंभीर गोष्ट म्हणजे या ठिकाणी पुलाचे काम सुरू असतानाही बॅरिकेट्स लावण्यात आले नव्हते किंवा इतर योग्य ती उपाययोजनाही करण्यात आली नव्हती. त्यामुळे या प्रकरणी तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. घटनास्थळी सुरक्षा नियमांची अवहेलना स्लॅब कोसळल्याच्या घटनेनंतर मुंबई अग्निशमन दल, स्थानिक पोलिस, मेट्रो प्राधिकरणाचे कर्मचारी व संबंधित विभागाचे कर्माचारी रुग्णवाहिकेसह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी संपूर्ण परिसर ताब्यात घेऊन वाहतूक वळवली. रस्त्यावर पडलेला ढिगारा हटवला. सध्या हा अपघात नेमका कशामु्ळे झाला? याचा तपास सुरू आहे. तसेच या प्रकरणी बांधकामाविषयी सुरक्षेच्या नियमांचे पालन करण्यात आले होते का? याचीही चौकशी केली जात आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे मुलुंड येथील लाल बहादूर शास्त्री (एलबीएस रोड) रोडवर गत अनेक महिन्यांपासून मेट्रोच्या मार्गिकेचे काम सुरू आहे. या प्रकरणी दररोज भलेमोठे गर्डर व स्लॅब वर-खाली चढवण्याचे काम सुरू असते. त्यातच आज ही दुर्घटना घडल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. मुंबई महापालिकेने काय म्हटले? मुंबई महापालिकेने या दुर्घटनेची माहिती देताना म्हटले आहे की, आज दुपारी 12.20 वा. मुलुंड (पश्चिम) येथील एलबीएस रोडवरील जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीजवळ मेट्रोच्या खांबाचा काही भोग कोसळला. बांधकाम सुरू असताना सिमेंट मेट्रोच्या खांबाचा काही भाग कोसळून रिक्षावर पडला. मुंबई अग्निशमन दल, पोलिस, मेट्रो कर्मचारी, वॉर्ड कर्मचारी आणि 108 रुग्णवाहिका सेवा घटनास्थळी उपस्थित आहेत. ऑटोरिक्षातील 3-4 जण जखमी झाल्याची शक्यता आहे. तपशीलांची प्रतीक्षा आहे. दुर्घटनेवर काँग्रेसची टीका काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी या दुर्घटनेवरून सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. त्या म्हणाल्या, मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त झालाय का? आज दुपारी मुलुंड पश्चिम, एलबीएस रोडवर जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीजवळ मेट्रोच्या निर्माणाधीन पिलरचा भाग कोसळून मोठी दुर्घटना घडली. यात एक निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला असून काही जण गंभीर जखमी झाले आहेत.
सरकार आणि एमएमआरडीए प्रशासनाला काही देणंघेणं आहे की नाही?
फक्त इन्फ्रा मॅन म्हणून PR करायचे, मार्केटिंग करायचं पण मुंबईकरांचा जीव टांगणीला लागला आहे, त्याच काय?

मेट्रोचे काम सुरू असताना सुरक्षेचे नियम फक्त कागदावरच का? वर्दळीच्या रस्त्यावर काम सुरू असताना खालून जाणाऱ्या वाहतुकीसाठी पुरेशी सुरक्षा व्यवस्था का नव्हती? मेट्रोची कामं वेगाने होत आहेत, हे दाखवण्याच्या नादात त्याचा दर्जा आणि तांत्रिक सुरक्षेकडे दुर्लक्ष होतंय का?
जबाबदारी कोणाची? दरवेळी अशा घटना घडल्यानंतर फक्त ‘चौकशी’चं नाटक होतं. याची जबाबदारी कोण घेणार?
विकास हवाय, पण तो मुंबईकरांच्या जीवावर बेतणारा नको, असे त्या म्हणाल्यात.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर