ब्रेकिंग न्यूज
⚡ Nagpur Crime : दोन महिन्यापूर्वी लग्न, दिवाळीला घरी आले; फराळ झाला अन् शिक्षक दामपत्याने घराच्या गॅलरीतच सं… ✦ ⚡ पांडवदेवीच्या पावन भूमीत आज गोवर्धन यात्रेचा भक्तीमय जयघोष! ✦ ⚡ दुष्काळामुळे मेंढपाळ व्यवसाय आर्थिक संकटात, अचानक घसरले दर, सोलापूरमधील भीषण वास्तव, Video ✦ ⚡ CRIME : ब्लँकेटमध्ये गुंडाळून उजनी धरणात फेकलं, विवाहित महिलेच्या हत्येचं गुढ अखेर उकललं! पोलिसांनी 2 तासात… ✦ ⚡ वाद होताच दोस्ती विसरला, पुण्यात तरुणाने थेट मित्राच्या अंगावर फेकलं ॲसिड, चिमुकलीसह 4 जणांना भाजलं ✦ ⚡ सासरच्यांकडून त्रास, पतीनंही दिली साथ; विवाहितेचं टोकाचं पाऊल, पाच दिवस मृत्यूशी झुंज अन्… ✦ ⚡ Diwali 2026: लक्ष्मीपूजनाच्या दिवशी केरसुनी का पूजतात? शास्त्र काय सांगतं? महत्त्व आणि परंपरा, Video ✦ ⚡ दिवाळीला सोलापूरच्या शेकऱ्यावर संकट, 4 एकर ऊस डोळ्यांदेखत जळून झाला खाक, लाखोंचं नुकसान ✦ ⚡ तक्रार द्यायला आलेली महिला, पोलिसानं तिथंच ओळख काढली, साताऱ्यात थेट निलंबनाची कारवाई, काय घडलं? ✦ ⚡ MPSC Exam : अर्ज कसा करायचा? किती मुदतवाढ? परीक्षेच्या तारखेतही बदल, MPSC परीक्षेसंर्भात A to Z माहिती
SP News Maregaon

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत हाणामारी?:राऊत VIDEO शेअर करत म्हणाले – घटना का व कुठे घडली? हे सांगता की सांगू?

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासोबत हाणामारी झाल्याचा दावा केला आहे. त्यांनी यासंबंधी एक व्हिडिओ शेअर केला असून, त्यात राहुल नार्वेकर व त्यांच्या सहकाऱ्यांशी एक महिला व व्यक्ती वाद घालताना दिसून येत आहेत. राहुल नार्वेकरांनी ही घटना कुठे व का घडली हे सांगावे अन्यथा मी ती सांगेन, असा इशाराही राऊत यांनी या प्रकरणी विधानसभा अध्यक्षांना दिला आहे. सोशल मीडियावर ‘ब्रेकिंग’ ट्विट संजय राऊत यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावर ‘ब्रेकिंग’ असा उल्लेख करत हा व्हिडिओ पोस्ट केला. ‘विधानसभा अध्यक्षांसोबत ही हाणामारी कोठे आणि का झाली? राहुल नार्वेकर यांनी पळ काढला आहे! तुम्ही सांगताय की मी सांगू?’ असा थेट सवाल त्यांनी केला आहे. हे ट्विट त्यांनी राहुल नार्वेकरांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही टॅग केले आहे. त्यामुळे या प्रकरणाला अधिकच राजकीय रंग चढला आहे. व्हिडिओत नेमके काय दिसते? संजय राऊत यांनी शेअर केलेल्या व्हिडिओत दिसून येत आहे की, एक महिला आणि एक पुरुष काही कारणावरून राहुल नार्वेकर व त्यांच्या सहकाऱ्यांशी वाद घालत आहेत. घटनास्थळी उपस्थित काहीजण या प्रकरणी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत आहेत. सदर महिला नार्वेकरांसोबतच्या एका व्यक्तीला मारहाण करतानाही दिसून येत आहे. पण संजय राऊत यांनी दावा केला तसा नार्वेकरांशी धक्काबुक्की झाली आहे का? हे या व्हिडिओत दिसत नाही. हा व्हिडिओ जुना आहे की ताजा? हे ही अजून स्पष्ट झाले नाही. त्यामुळे हा प्रसंग नेमका कोणत्या पार्श्वभूमीवर घडला, तो वैयक्तिक स्वरूपाचा होता की सार्वजनिक कार्यक्रमातील, याविषयी अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. विधानसभा अध्यक्षांच्या भूमिकेची प्रतीक्षा या व्हिडिओवर विधानसभा अध्यक्षांच्या कार्यालयाकडून अद्याप प्रतिक्रिया आली नाही. सत्ताधारी पक्षानेही यावर अद्याप स्पष्टीकरण दिले नाही. पण संजय राऊत यांनी या प्रकरणी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्यात आधीच राजकीय वातावरण तापले असताना या व्हिडिओमुळे आरोप-प्रत्यारोपांच्या नव्या फेरीला सुरुवात होण्याची चिन्हे आहेत. सोशल मीडियावर या व्हिडिओवर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी संजय राऊत यांच्या दाव्याचे समर्थन केले आहे, तर काहींनी व्हिडिओची सत्यता आणि संदर्भ स्पष्ट करण्याची मागणी केली आहे. अलिबागच्या म्हात्रोळी गावातला व्हिडिओ – काँग्रेस दुसरीकडे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या प्रकरणी राहुल नार्वेकर यांच्यावर टीका केली आहे. तसेच हा व्हिडिओ अलिबाग तालुक्यातील म्हात्रोळी गावचा असल्याचाही दावा केला आहे. अलिबाग तालुक्यातील म्हात्रोळी गावामध्ये स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात न घेता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे दादागिरी करून शेतीमध्ये मोजणी करण्याचे काम करत होते. स्थानिक शेतकऱ्यांनी केलेल्या विरोधामुळे नार्वेकर यांना अक्षरशः पळ काढावा लागला, असे ते म्हणालेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर