ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

छत्रपती संभाजीनगर मनपात गटनेतेपदी त्र्यंबक तुपे की किशोर नागरे?:एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत निर्णयासाठी आज नंदनवनवर बैठक

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


छत्रपती संभाजीनगर येथे शिवसेनेच्या नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक आणि पंचायत समिती सदस्यांची महत्त्वाची बैठक आज मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार आहे. ‘नंदनवन’ निवासस्थानी होणाऱ्या या बैठकीत महापालिकेच्या गटनेत्याच्या नावावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, या निवडीच्या पार्श्वभूमीवर पक्षातील गटबाजी पुन्हा उफाळून आल्याचे चित्र आहे. महापालिकेतील गटनेता कोण होणार, याबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होती. गटनेत्याचे नाव उपमुख्यमंत्री शिंदे जाहीर करणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, पालकमंत्री संजय शिरसाट यांनी त्र्यंबक तुपे यांचे नाव सुचवून वरिष्ठ पातळीवर सहमती मिळवल्याची चर्चा आहे. दुसरीकडे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांच्या गटाकडून किशोर नागरे यांचे नाव पुढे आल्याने पेच निर्माण झाला आहे. यापूर्वी पक्ष निरीक्षकांनी नगरसेवकांकडून कोऱ्या कागदावर स्वाक्षऱ्या घेतल्या होत्या; मात्र गटनेत्याचे नाव अद्याप जाहीर झाले नसल्याने नगरसेवकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. दोन गटांतील संघर्षामुळे काही नगरसेवकांनी या वादात पडण्यास नकार दिला असून अंतिम निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पक्षातील गटबाजी स्पष्ट गटनेता निवडीवरून दोन गटांमध्ये मतभेद असल्याने एकमत होत नव्हते. वरिष्ठांच्या सूचनेनुसार बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस खासदार संदीपान भुमरे, आमदार प्रदीप जैस्वाल तसेच शिवसेनेचे निरीक्षक विलास पारकर उपस्थित होते. पालकमंत्री शिरसाट हे केज येथे असल्याने बैठकीस उपस्थित राहू शकले नव्हते. बैठकीदरम्यान नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या आणि गटनेतेपदाच्या निवडीची प्रक्रिया सुरू करण्यात आली. काही नगरसेवकांनी ‘आम्हाला गृहीत धरू नका’ अशी भूमिका मांडत उपमहापौर निवडीवेळीही अशीच बैठक व्हायला हवी होती, असे मत व्यक्त केले. शिरसाट–जंजाळ वादाचा परिणाम पालकमंत्री शिरसाट आणि जिल्हाप्रमुख जंजाळ यांच्यातील वाद मनपा निवडणुकीपूर्वीपासूनच सुरू असून निवडणुकीनंतरही तो कायम आहे. या अंतर्गत संघर्षाचा परिणाम गटनेता निवडीवर होत असल्याचे मानले जात आहे. परिस्थिती हाताळण्यासाठी पक्षाला मुंबईहून निरीक्षक पाठवावा लागला. निरीक्षकांनी सर्वांना एकत्र बसवून नगरसेवकांच्या थेट स्वाक्षऱ्या घेतल्या. म्हणून कमी नगरसेवक दिव्य मराठीशी बोलताना राजेंद्र जंजाळ यांनी सांगितले की, अंतर्गत वादामुळे पक्षाला केवळ 13 जागांवर समाधान मानावे लागले. मला पराभूत करण्यासाठी माझ्याच विरोधात उमेदवार उभे करण्यात आले. यात अंतर्गत कोण होते, हे सर्वांना माहिती आहे. तरीही मी माझे अस्तित्व सिद्ध केले. हिंदू नगरसेवकांमध्ये मी तिसऱ्या क्रमांकाच्या मताधिक्याने निवडून आलो, असे ते म्हणाले. तसेच पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्रिपदासाठी शुभेच्छा दिल्याचा उल्लेख करत, मी मुख्यमंत्री नाही; मात्र पालकमंत्री नक्की होईल, असा टोला त्यांनी लगावला.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर