ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

आषाढी वारी तयारी:वारकऱ्यांची सेवा, 23 जर्मन हँगर शामियाने, 220 टँकर तर 158 तात्पुरती उपचार केंद्र, जिल्हा परिषद सीईओंची माहिती, पालकमंत्री गोरे यांनी घेतला आढावा‎

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


आषाढी वारीत निमित्त येणाऱ्या वारकरी मंडळींच्या सुविधेसाठी जिल्हा परिषदेकडून पालखी मार्गावरील स्वागत कमानी थाटल्या जाणार आहेत. स्वच्छतेची काळजी म्हणून ५ हजार फिरते शौचालय, २०० पाण्याचे टँकर. आरोग्यासाठी १५८ तात्पुरते उपचार केंद्र तर १२१ बाईक ॲम्बुलन्स असतील. दिंडी प्रमुखांना ४५०० मेडिसिन किट वाटप करण्यात येतील. पशुसंवर्धन विभागामार्फत पालखीतील मानाचे घोडे व बैल यांच्यासाठी चारा व निवारा याची सोय केली जाणार असल्याचे जि.प.चे सीईओ कुशल जैन यांनी दूर दृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी होऊन सांगितले. ग्रामीण भागातून पालखी पुढे गेल्यानंतर व आधी स्वच्छतेवर भर दिला जाणार आहे. पुणे विभागीय आयुक्त कार्यालय येथे दूर दृश्य प्रणालीद्वारे पुणे, सातारा, सोलापूर व अहिल्यानगर या तीन जिल्ह्यांचा पालखी सोहळा नियोजनाचा आढावा पालकमंत्री गोरे यांनी घेऊन मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील, प्रांताधिकारी सचिन इथापे, विजया पांगारकर, आशिष लोकरे, तहसीलदार पंढरपूर सचिन लंगोटे, पंढरपूरचे मुख्याधिकारी महेश रोकडे, जी. एस. कथले, साहेबराव देसाई, महावितरणचे सुनील माने, गजानन नेरपगार आदी उपस्थित होते. पालकमंत्री गोरे पुढे म्हणाले की, पालखी मार्गाची सुरक्षितता, रस्त्यातील अडथळे, रिंगण सोहळ्याचे ठिकाण, पालखी मुक्कामाची ठिकाणे, रस्ते व पूल दुरुस्ती अशी अन्य सर्व कामे संबंधित विभाग प्रमुखांनी स्वतः लक्ष घालून तत्परतेने पूर्ण करून घ्यावीत. तात्पुरत्या शौचालयाजवळ चिखल होऊ नये, तसेच पालखी मुक्काम स्थळी योग्य ठिकाणी काँक्रिटीकरण व मुरुमीकरण करावे, अशा सूचना दिल्या. ६५ एकर, वाळवंट परिसर आणि वाखरी या ठिकाणी स्वच्छतेबाबत आवश्यक सुविधांचे नियोजन करा. याशिवाय पालखी विश्वस्त ॲड. राजेंद्र उमाप यांनी माऊलींच्या पालखीच्या वतीने वारकऱ्यांसाठी आवश्यक सुविधा, मोबाईल नेटवर्क उपलब्ध करून द्यावे. वाहनांना टोल माफी मिळावी, अशी मागणी केली. संत तुकाराम पालखी विश्वस्त व सोपान काका पालखी विश्वस्तांनी वारकरी सुविधांची मागणी केली. पालखी मार्ग, रिंगण सोहळा स्थळी सुरक्षिततेची काळजी सीसीटीव्ही, निरीक्षण टॉवर, लाईफ जॅकेट, बोटींग सुविधा स्वच्छ पाणी, निवाऱ्यासाठी जर्मन हँगर व वॉटरप्रूफ मंडप, फूट मसाज, आरोग्य सुविधा, मेडिसिन किट, स्नानगृहे, मोबाईल चार्जिंग व्हॅन, वारीतील वाहनांसाठी पुरेसे इंधन तसेच गॅस पुरवठा व इतर आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या. नेटवर्क साठी टॉवरची पुरेशी सुविधा, सीसीटीव्ही कॅमेरे, निरीक्षण टॉवर, ठिकठिकाणी ध्वनीक्षेपक, आपत्कालीन यंत्रणा, लाईफ जॅकेट, बोटींग सुविधा करा.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर