ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

INDIA आघाडीने निवडणूक आली की जागे होऊन फायदा नाही:भविष्यात काँग्रेसचा PM हवा असल्यास आतापासून कामाला लागा- संजय राऊत

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


निवडणूक आली की इंडिया आघाडी वळवळ करते जिवंत आहे हे दाखवते, असे दाखवून चालणार नाही, राष्ट्रीय प्रश्नांवर आतापासूनच एकत्रित लढा देणे आवश्यक आहे, राहुल गांधींच्या नेतृत्वाची धास्ती सत्ताधाऱ्यांनी घेतली असली, तरी आघाडी अधिक मजबूत होणे काळाची गरज आहे, असे उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊत यांनी ‘इंडिया’ आघाडीच्या सद्यस्थितीवर आणि काँग्रेसच्या नेतृत्वावर अत्यंत कडक शब्दांत भाष्य केले आहे. संजय राऊत म्हणाले की, इंडिया आघाडीचे नेतृत्व बदलण्याची गरज असल्याचे मी स्वतः म्हटलेले नाही, तर काँग्रेसमधीलच अनेक नेत्यांचा हा ‘अंतरात्मा’ आहे. मणिशंकर अय्यर आणि संजय बारू यांच्यासारख्या व्यक्तींच्या भूमिकांचा दाखला देत राऊत म्हणाले की, बिहारमधील निकाल निराशाजनक आहेत. राहुल गांधींच्या नेतृत्वाची धास्ती सत्ताधाऱ्यांनी घेतली असली, तरी आघाडी अधिक मजबूत होणे काळाची गरज आहे. केवळ निवडणुकीपुरते काम करु नये संजय राऊत म्हणाले की, काँग्रेस हा आघाडीतील सर्वात मोठा पक्ष असून त्यांचे 100 च्या आसपास खासदार आहेत. त्यामुळे देशाचे नेतृत्व करण्याची आणि आघाडीला दिशा देण्याची मोठी जबाबदारी काँग्रेसवर आहे. राऊत यांनी स्पष्ट केले की: भविष्यात काँग्रेसचा नेता पंतप्रधान व्हावा, ही आमची भूमिका आहे; पण त्यासाठी आतापासूनच जमिनीवर काम करावे लागेल. केवळ निवडणुकीच्या काळात हालचाली करून फायदा होणार नाही.शेतकरी, कष्टकरी आणि मणिपूरसारख्या राष्ट्रीय प्रश्नांवर इंडिया आघाडीने सामूहिक भूमिका मांडणे आवश्यक होते, जे अद्याप प्रभावीपणे घडताना दिसत नाही. आम्ही चळवळीतील माणसे आहोत, घरात बसून राहणे आम्हाला मान्य नाही. जनतेच्या प्रश्नांसाठी सरकारला जाब विचारणे आमचा अधिकार आहे, असेही ते ठामपणे म्हणाले. ..तर मनपाचे आकडे वेगळे असते मुंबई महानगरपालिकेच्या संदर्भात बोलताना संजय राऊत म्हणाले की, जर महाविकास आघाडी (मविआ) एकत्र लढली असती, तर आज दिसणारे आकडे वेगळे असते. काँग्रेसची कामगिरी वाईट नाही, पण विखुरलेल्या मतांमुळे भाजपला सत्तेत येण्याची संधी मिळाली. हीच भावना उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचीही असल्याचे त्यांनी नमूद केले. रोहित पवारांची भेट काल सत्र न्यायालयात रोहित पवार आणि आपली अचानक भेट झाल्याचे संजय राऊतांनी सांगितले. यावेळी अजित पवार यांच्या अपघाता संदर्भातील काही बाबी आणि राज्यातील इतर राजकीय घडामोडींवर चर्चा झाली.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर