ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

सोलापूरच्या महिलांचा प्रश्न…रात्रभर जागल्याने आरोग्यावर परिणाम:कधी सुटका होणार?, जागरण पाण्यासाठी…रात्री 10 पासूनच नळाकडे डाेळे, पहाटेपर्यंत होते धावपळ

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


हद्दवाढ भागातील कामगारबहुल नगरांमध्ये पाण्यासाठी चक्क जागरणच असते. पाण्याचा दिवस म्हणजे रात्रीची जेवणावळी झाली, की नळाकडे डोळे लावून बसायचे. दिवसभर काम करून थकवा आल्याने डोळा लागला की, पाणी मिळणार नाही म्हणून महिला बाहेरच गप्पा मारत बसतात. पाणीपुरवठ्याच्या वेळाच निश्चित नाहीत. कधी दहा तर कधी मध्यरात्रीनंतर. अगदी पहाटेपर्यंत पाण्यासाठी धडपड असते. दुसऱ्या दिवशी रोजगार बुडण्याच्या चिंतेसह ही मंडळी जागरण करतात. अक्कलकोट रस्त्यावरील काही नगरांमध्ये हे चित्र गेल्या अनेक वर्षांपासून कायम आहे. यातील काही भाग महापौर विनायक कोंड्याल यांच्या प्रभागातही येतो. जुळे सोलापुरातील काही भागातही अशीच धडपड दिसून येते. उन्हाळ्याची चाहूल लागली की, पाण्याचे वेळापत्रक कोलमडते आणि ही मंडळी हातपंपाकडे वळतात. परंतु त्याही नादुरुस्त असल्याकडे बोट दाखवून म्हणतात, ‘‘सांगा, आम्ही जगायचं कसं…?’’

आरोग्यावर परिणाम
दिवसभर कामाला जावे लागते. रात्री पाण्यासाठी कसरत असते. रात्रभर जागरण करावी लागते आणि दुसऱ्या दिवशी काम होत नाही. आरोग्यावर परिणाम होतोय. अनिता जाधव, नागरिक पहाटे चारलाच पाणी येते
गेल्या अनेक वर्षांपासून आम्हाला पहाटे चार वाजताच पाणी येतो. त्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी मोटारीची तयारी करत असतो. पहाटे चारला उठून पाणी भरतो. त्याचा प्रचंड त्रास होतो. पाण्याच्या वेळा दिवसाच निश्चित पाहिजेत. जयश्री बाबर, नागरिक सहा दिवसाआडच पुरवठा
रात्री-अपरात्री पाणीपुरवठा होतो. त्याला दाब नसल्याने मोटारी लावून ओढण्यात येते. पाणी मिळाले की, पहाटे थोडीशी झोप. त्यानंतर दुसऱ्या दिवशी कामावर पळावे लागते. मनीषा बनसोडे, नागरिक मध्यरात्रीनंतरच पाणी
आमच्याकडे मोटार नाही. मध्यरात्री एकनंतर पाणी येते. मुबलक मिळत नसल्याने पाणी पुरत नाही. एक एक घागर पाण्यासाठी शेजाऱ्यांची मदत घ्यावी लागते. अन्यथा, हातपंपावरून घ्यावे लागते. नसीमा पीरजादे, नागरिक रात्री जेवण उरकले की, बाहेर गप्पा सुरू होतात
घरात आणि घरांच्या बाहेर पाण्याचे बॅरल, पाणी येण्यापूर्वी सर्व बॅरल्स स्वच्छ करण्याचे काम सुरू होते. पाण्याला दाब नसल्याने मोटारी काढण्यात येतात. प्लगपीन लावून सज्ज करण्यात येते. मोटार नसलेल्या ठिकाणी नळांभोवती खड्डे आहेत. तिथे छोटीशी कळशी लावण्यात येते. त्याने मोठ्या घागरींमध्ये पाणी भरले की, पुरुष त्या उचलून नेतात. मध्यरात्रीनंतर सुरू झालेला हा खेळ पहाटेपर्यंत चालतो. पहाटे थोडीशी झोप झाली, ही पुन्हा कामावर पळण्याची धडपड सुरू होते. दर चार दिवसांतील हेच चित्र. मध्यमवर्गीय भागात पाइप टाकूनच झोपतात
जुळे सोलापूरच्या शिवगंगा नगर भाग एक ते तीनमध्ये पहाटे चार वाजता पाणीपुरवठा होतो. गेल्या अनेक वर्षांपासून हाच प्रकार आहे. यामध्ये काहीच सुधारणा होत नाही. 18 फेब्रुवारीला पहाटे चार वाजता पाणी येणार असल्याने आदल्या दिवशी रात्रीच नळाला मोटार लावून पाईप टाकून ठेवण्यात येते. मध्यमवर्गीय कुटुंबे असल्याने घरोघरी मोटारी, पाणी साठवून ठेवण्याची क्षमता. त्यामुळे त्यांना अधिक त्रास नाही. पहाटे उठून पाणी भरून घेतात.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर