ब्रेकिंग न्यूज
⚡ वन्यजीव संरक्षणाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत! ✦ ⚡ Pune Video:पुण्यातील MPSCविद्यार्थ्यांना पोलिसांकडून नोटीस, २९ क्लास, अभ्यासिका चालकांनाही नोटिसा ✦ ⚡ लिलाबाई बापूराव कुचनकर यांचे निधन ✦ ⚡ चारा संपला, पाणीही नाही प्यायला, जिवापाड जपलेल्या मुक्या जिवाला अर्ध्या किंमतीत विकायची वेळ, बीडमधलं भीषण व… ✦ ⚡ ‘आई मला वाचव’ तरुणाचा व्हॉट्सॲपवर मेसेज अन् घडलं भयंकर, पंढरपूरमधील त्या घटनेने एकच खळबळ ✦ ⚡ Eknath Shinde Amit Shah: दिल्लीत खलबतं, महाराष्ट्रात टेन्शन! एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा; अमित शाहांसो… ✦ ⚡ Instagram वर मैत्री, लिव इन रिलेशनशीपमध्ये असताना मृत्यू, कल्याणच्या मुलीसोबत छत्तीसगडमध्ये काय घडलं? ✦ ⚡ दिनेश धोंडूजी वैद्य यांच्या ३० वर्षांच्या ज्ञानयज्ञाची सांगता ✦ ⚡ ज्ञानेश्वर ढोके यांच्या ३२ वर्षांच्या ज्ञानयज्ञाची सांगता ✦ ⚡ 6,6,6,4,6,4,6,6… इकडं अभिषेकने ‘गोल्ड’ पटकावलं, तिकडं गुरू Yuvraj Singh चा राडा! ऑस्ट्रेलियाविरुद्ध 71 धा…
SP News Maregaon

हिंगोलीत इंधन पुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसचे ठिय्या आंदोलन:इंदिरा गांधी पुतळ्यासमोर घोषणाबाजी

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


हिंगोली जिल्हयासह राज्यभरात इंधन पुरवठा सुरळीत करावा यासह इतर मागण्यांसाठी जिल्हा काँग्रेसच्या वतीने सोमवारी ता. २५ माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुतळ्या समोर एक तास ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली आहे. इंधन पुरवठा सुरळीत न झाल्यास आगामी काळात तिव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. हिंगोली येथील इंदिरा गांधी पुतळा परिसरात सकाळी आकरा वाजता आंदोलनास सुरवात झाली. यावेळी जिल्हाध्यक्ष डॉ. सतीष पाचपुते, प्रदेश पदाधिकारी महमद जकी कुरेशी, माजी जिल्हाध्यक्ष सुरेश सराफ, दत्तराव कदम, मिलींद उबाळे, डॉ. निळकंठ गडदे, अतुल नायक, डॉ. साहेबराव देवकते, नंदकुमार पाटील, ॲड. प्रदीप पोले, रवी कोकरे, भगवान खंदारे, शासन कांबळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. राज्यात इंधन तुटवडा निर्माण झाल्याने शेतीची कामे ठप्प झाली असून पेरणीपुर्व मशागतीचे कामे न झाल्यास पेरणी कशी करावी असा प्रश्‍न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. या शिवाय इंधन मिळत नसल्याने नागरीकांना वाहनाद्वारे प्रवास करणेही कठीण झाले आहे. केंद्र शासनाने तसेच राज्य शासनाचे चुकीचे धोरण यासाठी कारणीभूत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. शासनाने वाहनांसाठी मुबलक इंधन उपलब्ध करून द्यावे तसेच वाहनांचे आरसी बुक दाखविल्यानंतर कॅन मध्ये इंधन देण्याची मागणी करण्यात आली. तसेच इंधन दरवाढ मागे घ्यावी अशी मागणी ही करण्यात आली या शिवाय बँकांकडून नाणे टंचाईचे कारण दाखवून पैसे देण्यास नकार दिला जात आहे. त्यामुळे बाजारपेठेतील व्यवहार ठप्प होत असून नागरीकांना स्वतःचे पैसे बँकेतून वेळेवर मिळत नसल्याने आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे नाणे टंचाई दुर करावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. शासनाने इंधन व नाणे टंचाईचा प्रश्‍न तातडीने सोडवावा अन्यथा तिव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. सकाळी आकरा वाजता सुरु झालेले ठिय्या आंदोलन दुपारी बारा वाजता मागे घेण्यात आले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर