ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

पुण्यात ठाकरे गटाचा उमेदवारच भाजपत गेला:बंडखोर उमेदवारानेही घेतले कमळ हातात, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात केला पक्षप्रवेश

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


पुणे महापालिकेच्या रणधुमाळीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठे भगदाड पडले आहे. येथील प्रभाग क्रमांक 9 व 11 मधील ठाकरे गटाच्या अधिकृत उमेदवारांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपत प्रवेश केला आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात त्यांनी भाजपचे कमळ हाती घेतले. त्यामुळे कोथरुडमधील भाजपची ताकद कैकपटीने वाढली आहे. पुणे महापालिकेसाठी 15 जानेवारीला मतदान होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. त्यात सर्वच राजकीय पक्ष एकमेकांचे कार्यकर्ते व उमेदवार फोडून एकमेकांना धक्के देत आहेत. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाला पुण्यात राजकीय धक्का पबसला आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, पुण्याच्या प्रभाग क्रमांक 9 मधील ठाकरे गटाचे बंडखोर उमेदवार महेश सुतार व पूजा सुतार, तसेच नियोजन समितीचे सदस्य सुखदेव तापकीर यांनी भाजपचा झेंडा हाती धरला. त्याचप्रमाणे प्रभाग 11 मधील ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार बाळासाहेब धनवडे, विद्यार्थी सेनेचे अमर गायकवाड व माजी नगरसेवक पैलवान दिलीपदादा गायकवाड यांनीही आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश करत महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्या पुण्यातील निवासस्थानी या सर्वांचे भाजपमध्ये स्वागत केले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, भाजपचे 2 उमेदवार यापूर्वीच बिनविरोध निवडून आले आहेत. आता या महत्त्वाच्या पक्षप्रवेशांमुळे भाजपच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले आहे. ही केवळ सुरुवात असून आगामी काळात भाजप महापालिकेत निर्विवाद वर्चस्व गाजवेल. या प्रसंगी भाजपचे उमेदवार लहू बालवडकर, गणेश कळमकर, रोहिणी चिमटे, अजय मारणे, अभिजीत राऊत यांसह डॉ. संदीप बुटाला, प्रकाशतात्या बालवडकर आणि इतर प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ऐन निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाच्या उमेदवारांनीच साथ सोडल्याने या प्रभागांमध्ये भाजपचे पारडे आता जड झाले आहे. आता पुढे काय होणार? महापालिका निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याची मुदत 2 जानेवारी ही होती. ही मुदत आता उलटून गेल्यामुळे आता ईव्हीएमवर ठाकरे गटाच्या उमेदवारांची नावे असतील. त्यांच्या मतदारांना संबंधित उमेदवारांच्या नावापुढे मशालीचे चिन्ह व मतदानाचा पर्यायही उपलब्ध असेल. पण पक्षांतर करणारे उमेदवार प्रचाराच्या काळात मशालीला नव्हे तर भाजपला मतदान करण्याचे आवाहन करतील. तसेच ईव्हीएमवरील आपल्या नावापुढील मशाल चिन्हावर बटन न दाबण्याचे आवाहनही ते यावेोली करताना दिसून येतील.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर