ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: ‘ऑक्टोबर हिट’मुळे रेल्वेचा खोळंबा, मुंबईत रुळांच्या प्रसरणाने प्रवाशांचे हाल, काय घडतंय? ✦ ⚡ वन्यजीव संरक्षणाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत! ✦ ⚡ कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार, एकाचा खून, पित्रा-पुत्रासह तिघांना जन्मठेप, काय घडलं? ✦ ⚡ Pune Video:पुण्यातील MPSCविद्यार्थ्यांना पोलिसांकडून नोटीस, २९ क्लास, अभ्यासिका चालकांनाही नोटिसा ✦ ⚡ लिलाबाई बापूराव कुचनकर यांचे निधन ✦ ⚡ चारा संपला, पाणीही नाही प्यायला, जिवापाड जपलेल्या मुक्या जिवाला अर्ध्या किंमतीत विकायची वेळ, बीडमधलं भीषण व… ✦ ⚡ ‘आई मला वाचव’ तरुणाचा व्हॉट्सॲपवर मेसेज अन् घडलं भयंकर, पंढरपूरमधील त्या घटनेने एकच खळबळ ✦ ⚡ Eknath Shinde Amit Shah: दिल्लीत खलबतं, महाराष्ट्रात टेन्शन! एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा; अमित शाहांसो… ✦ ⚡ Instagram वर मैत्री, लिव इन रिलेशनशीपमध्ये असताना मृत्यू, कल्याणच्या मुलीसोबत छत्तीसगडमध्ये काय घडलं? ✦ ⚡ दिनेश धोंडूजी वैद्य यांच्या ३० वर्षांच्या ज्ञानयज्ञाची सांगता
SP News Maregaon

रांगोळीतून माऊली अन् तुकोबांचे दर्शन, प्रेक्षक थक्क:पंढरीत पोट्रेट रांगोळी अन् सुलेखनाची जादू, राज्यातील कलाकारांची मांदियाळी‎

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


येथे सुरू असलेल्या अक्षर संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी आज व्यक्तिचित्र रांगोळी (पोट्रेट रांगोळी) आणि सुलेखन (कॅलिग्राफी) प्रात्यक्षिकांचे थक्क करणारे सादरीकरण करण्यात आले. कॅमेऱ्याने टिपलेल्या छायाचित्रांपेक्षाही अधिक जिवंत, भावस्पर्शी आणि चेहऱ्यावरील सूक्ष्म हावभाव रांगोळीच्या माध्यमातून साकारताना पाहून उपस्थित प्रेक्षक अक्षरशः भारावून गेले होते. ​या संमेलनात राज्यभरातून आलेले नामवंत कलाकार आपली कला सादर करत आहेत. यामध्ये मुंबईचे विलास राहते व मिताली सुर्वे, नाशिकच्या कल्याणी बागुल, सिंधुदुर्गचे केदार टेमकर, पुण्याच्या शारदा अवसरे, पालघरची श्रावणी पाटील आणि कर्नाटकातील भारत नांद्रे या कलाकारांनी साकारलेल्या व्यक्तिचित्र रांगोळ्या उपस्थितांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरल्या. संमेलनास जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे सभापती चेतन केदार, पंढरपूरचे सभापती डॉ. शुभम आगावणे, महाराष्ट्राच्या महसूल व वन विभागाचे उपसचिव संजय इंगळे आदींनी भेट दिली. पुण्याच्या कलाकार शारदा अवसरे या पेशाने वकील असून त्यांनी साकारलेली रांगोळी या संमेलनातील सर्वात मोठे आश्चर्य ठरली. त्यांनी संत तुकाराम महाराजांचे अत्यंत सुंदर रेखाटन केले आहे. विशेष म्हणजे, ही रांगोळी उलट्या बाजूने पाहिल्यास ”पायथागोरस”च्या सिद्धांतानुसार संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचे रूप धारण करते. हा अद्भूत चमत्कार पाहण्यासाठी रसिकांनी मोठी गर्दी केली होती. ​रांगोळीसोबतच अक्षरांना सुंदर रूप देणाऱ्या ”सुलेखन” (कॅलिग्राफी) प्रात्यक्षिकावर विशेष चर्चा व सादरीकरण पार पडले. यामध्ये मुंबईचे श्रीकांत गवंडे व हेमंत घरत, जळगावचे सूर्यकांत वाघमारे आणि सांगलीचे श्रीराम मोहिते यांनी आपल्या लेखणीची जादू दाखवली. ​यानंतर ”कलेचा प्रवास: लोकल ते ग्लोबल” या विषयावर विशेष मुलाखत रंगली. मुंबईचे डॉ. तेजस लोखंडे यांनी मुलाखती घेतल्या. या चर्चासत्रात मिताली सुर्वे , अमित भोरकडे आदींचा सहभाग होता. ” पायथागोरस’ रांगोळीने वेधून घेतले लक्ष

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर