ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

अडगावला १ कॉपीबहाद्दर पकडला‎:जिल्ह्यातील ८७ पैकी २२ केंद्र संवेदनशील; २६ हजार विद्यार्थ्यांनी दिला गणिताचा पेपर‎

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण‎ मंडळाच्या वतीने घेण्यात येत‎असलेल्या बारावीच्या परीक्षेत ‎शनिवारी (दि.२१) गणिताचा पेपर ‎झाला. या परीक्षेला जिल्ह्यातील ‎एकूण २६८८७ विद्यार्थी प्रविष्ट झाले ‎आहेत. जिल्हाभरातील ८७ केंद्रांवर‎ बारावीची परीक्षा घेण्यात येत आहे.‎ यातील २२ केंद्र ही संवेदनशील‎ आहेत.‎ दरम्यान, गणिताच्या पेपरला ‎जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील‎ अडगाव (ब्रु.) येथील परीक्षा‎ केंद्रावर कॉपी करताना एक विद्यार्थी‎ सापडला. जिल्हा दक्षता पथकातील ‎जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या‎ प्राचार्या रत्नमाला खडके यांनी‎ कॉपीबहाद्दर विद्यार्थ्याला‎ पकडल्याचे माध्यमिक व उच्च ‎माध्यमिक शिक्षण मंडळाच्या ‎सूत्रांकडून समजले. गणिताचा पेपर‎ असल्यामुळे काही अपवाद ‎सोडल्यास बहुतांश विद्यार्थी तणावात‎ होते. परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांमध्ये ‎धाकधूक दिसून आली. कॉपीमुक्त‎ परीक्षेसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या‎ अध्यक्षतेखालील दक्षता समिती व‎ माध्यमिक शिक्षण विभाग विशेष‎ दक्षता बाळगत आहे. हुशार ‎विद्यार्थ्यांचे परीक्षेत नुकसान होऊ ‎नये, गुणवत्तेला चालना मिळावी,‎ यासाठी भरारी व बैठ्या पथकांची ‎तैनाती करण्यात आली आहे.‎ संवेदनशील केंद्रांवर बैठ्या ‎पथकांचा पहारा आहे तर भरारी‎ पथके अचानक केंद्रांवर पोहोचून तपासणी करत आहेत.‎ परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही‎लावण्यात आले असून सीसीटीव्ही‎नसणाऱ्या परीक्षा केंद्रावरील‎पर्यवेक्षकांनी अदलाबदल करण्यात‎येत आहे. परीक्षा केंद्राबाहेर व‎आवारात पोलिसांचा बंदोबस्त आहे.‎त्यामुळे भयमुक्त व कॉमीमुक्त‎वातावरणात परीक्षा घेण्यात यश येत‎असल्याचे दिसून येत आहे.‎ दुपारी २ वाजता पेपर सुटल्यानंतर विद्यार्थी रिलॅक्स दिसून आले. यंदाचा गणिताचा पेपर खूप कठीण‎नव्हता, अशी प्रतिक्रिया काही विद्यार्थ्यांनी बोलताना दिली. काही विद्यार्थ्यांना सी सेक्शन कठीण‎वाटला तर काहींना डी सेक्शन अवघड होता, अशा प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी पेपर सुटल्यानंतर दिल्या.‎ गतवर्षीच्या तुलनेत पेपर सोपा‎ यावर्षीचा गणिताचा पेपर गतवर्षीच्या तुलनेत खूप सोपा‎होता. ग्रुप सी व ग्रुप डी मधील प्रश्न विद्यार्थ्यांना स्कोअर‎करण्यासाठी उपयुक्त दिसून आले. कॅल्क्युलस, भूमिती,‎बीजगणीत, प्रॉबॅबिलिटीवरील प्रश्नांची काठिण्य पातळी‎सामान्य होती. त्यामुळे विद्यार्थी गणितात यावर्षी चांगले‎गुण घेण्याची संधी दिसून येत आहे.‎

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर