ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट:फरार आरोपी कृष्णा आंधळे तीनदा मस्साजोगला येऊन गेला; देशमुख कुटुंबीयांना धोका?

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


संतोष देशमुख हत्याकांडातील फरार आरोपी कृष्णा आंधळे हा आतापर्यंत 3 वेळा मस्साजोगला येऊन गेल्याची धक्कादायक बाब आज समोर आली. त्यामुळे पीडित देशमुख कुटुंबीयांनी त्याच्यापासून आपल्या जिवाला धोका असल्याचा दावा करत सुरक्षेची मागणी केली आहे. संतोष देशमुख हत्याकांडाची आज बीडच्या सत्र न्यायालयात सुनावणी झाली. त्यात न्यायालायने सरकारी पक्षाला बचाव पक्षाला योग्य ते सर्व दस्तऐवजांची पूर्तता करण्याचे कडक निर्देश दिले. आजच्या सुनावणीत आरोपींचे वकील, पुराव्यांची कमतरता व सरकारी वकिलांच्या नियुक्तीवर जोरदार खडाजंगी झाली. आरोपी क्रमांक 3 ते 7 यांनी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना या प्रकरणातून वगळण्याची मागणी केली. त्यांनी तसा अर्ज कोर्टात सादर केला. कोर्टाने सरकारी पक्षाला या अर्जावर आपले लेखी म्हणणे मांडण्याचे निर्देश दिले. आरोपी जयराम चाटे याने आपला वकील बदलला आहे. आता त्याच्यातर्फे वकील एम के वाघीरकर हे युक्तिवाद करणार आहेत. आरोपी प्रतीक घुले यानेही वकील लावण्यासाठी कोर्टाकडे 10 ते 15 दिवसांचा वेळ मागितला आहे. कोर्टाने त्यांना हा वेळ दिला. त्यानुसार आता 6 मार्च रोजी या प्रकरणाची पुढील सुनावणी होईल कृष्णा आंधळे मस्साजोगला आला? दुसरीकडे, आजच्या सुनावणीनंतर पत्रकारांशी बोलताना संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे याच्याविषयी एक नवा दावा केला. ते म्हणाले की, प्रस्तुत प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे मागील 6 महिन्यांत 3 वेळा आमच्या गावी येऊन गेला. यामुळे आमच्या कुटुंबाच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. आम्ही ही गोष्ट या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीआयडीच्या कानावर घातली आहे. त्यांनीही हा फरार आरोपी गावात येऊन गेल्याचे मान्य केले आहे. त्यामुळे त्याला लवकरात लवकर अटक करून त्याची संपूर्ण बीड जिल्ह्यात धिंड काढण्यात यावी. आतापर्यंत कोणकोणत्या आरोपींना अटक? सदर प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत 7 जणांना अटक केली आहे. यापैकी काहींवर हत्या व काहींवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटकेत करण्यात आलेल्यांत जयराम चाटे, महेश केदार, प्रतीक घुले, विष्णू चाटे, सुदर्शन घुले, सुधीर सांगळे व माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा राईट हँड मानल्या जाणाऱ्या वाल्मीक कराडचा समावेश आहे. यापैकी विष्णू चाटे व सुदर्शन घुले यांच्यावर हत्या व खंडणीचाही गुन्हा दाखल आहे. तर वाल्मीक कराड याच्यावर खंडणी प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणातील कृष्णा आंधळे हा आरोपी अद्याप फरार आहे. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथक नेमले आहे. पण अद्याप त्याचा शोध लावण्यात पोलिसांना अपयश आले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर