ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

जिल्हा परिषद, पंचाय समितीचे कामकाज ठप्प:हिंगोली जिल्ह्यात लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांचे सलग दुसऱ्या दिवशी कामबंद आंदोलन

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


राज्यातील शासकीय निमशासकीय कार्यालयातील लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांच्या चौथ्या वेतन आयोगापासूनच्या वेतन त्रुटी दूर कराव्यात यासह इतर मागण्यांसाठी लिपिक वर्गीय कर्मचारी संघटनेचे सलग दुसऱ्या दिवशी मंगळवारी ता. २४ कामबंद आंदोलन सुरुच होते. या आंदोलनामुळे जिल्हा परिषदेसह पाचही पंचायत समितीचे कामकाज ठप्प झाले आहे. राज्यामध्ये शासकीय व निमशासकीय शासकीय कार्यालयात काम करणाऱ्या लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. यामध्ये प्रामुख्याने चौथा वेतन आयोगापासूनची वेतन त्रुटी दूर करावी, सुधारित वेतनश्रेणी लागू करावी, पदानामध्ये बदल करावा, जुनी सेवानिवृत्ती वेतन योजना पूर्वीप्रमाणेच लागू करावी, जिल्हा परिषदेमधील कर्मचाऱ्यांचे मृद व जलसंधारण विभागामध्ये समावेशन करू नये यासह इतर मागण्यांचा समावेश आहे. या मागण्यासाठी कर्मचारी संघटनेच्या वतीने वेळोवेळी शासनाकडे निवेदन देऊन मागण्या मान्य न झाल्यामुळे संघटनेने कामबंद आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. त्यानुसार सोमवारपासून ता. २३ कामबंद आंदोलन सुरु करण्यात आले आहे. या आंदोलनात संघटनेचे पालक अध्यक्ष संतोष बांगर, जिल्हाध्यक्ष राजीव घुगे, नितीन दहिफळे, अविनाश दराडे, प्रसाद घंटाराम, शिवाजी हाके, उदय देशपांडे, वसंत घुगे, प्रवीण काळबांडे, विवेक दळवी, तुकाराम हमाने, राजेश कोंडावार, नंदकिशोर परीहार, लक्ष्मीकांत क्षीरसागर, जावळे, विलास सदावर्ते, प्रफुल्ल खंदारे, आदिनाथ सोनटक्के यांच्यासह जिल्हाभरातील लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांनी आंदोलनात सहभाग घेतला आहे. या आंदोलनामुळे जिल्हा परिषदेसह हिंगोली, कळमनुरी, वसमत, सेनगाव व औंढा नागनाथ पंचायत समितीचे कामकाज सलग दुसऱ्या दिवशीही ठप्प झाले आहे. सध्या अर्थसंकल्प अधिवेशन सुरु असून या अधिवेशनासाठी मागविण्यात आलेली माहिती दिली जाणार नसल्याचाची भुमीका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासन चांगलेच अडचणीत सापडले असून जिल्हा परिषदेतील सर्वच विभागांमधून शुकशुकाट निर्माण झाला आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर