ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

नोव्हेंबरपासून सिंहस्थ गुरु दोषामुळे शुभ कार्याला ब्रेक:23 जानेवारी 2017 पर्यंत विवाह नाहीत‎

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


३१ ऑक्टोबर रोजी देवगुरू बृहस्पतीचा सिंह राशीत प्रवेश होत असल्याने शहरात ‘सिंहस्थ गुरु दोष’ लागणार आहे. या दोषामुळे नोव्हेंबर २०२६ पासून २३ जानेवारी २०२७ पर्यंत विवाह, वास्तूपूजन, भूमीपूजन, नवीन कामांचा शुभारंभ, मुंडन, यज्ञोपवीत व व्रत उद्यापन यासारखी सर्व शुभ कार्ये वर्ज्य राहणार असल्याचे अकोला पुरोहित संघाचे म्हणणे आहे. श्री बालाजी मंदिरात पुरोहित संघाची सभा आयोजित करण्यात आली. सभेत गोदावरी नदीचा नकाशा, मुहूर्त चिंतामणी, धर्म सिंधू, निर्णय सिंधू तसेच महाराष्ट्रीयन, सम्राट व निर्णय सागर पंचांगांचा आधार घेऊन हा निर्णय घेण्यात आला. सभेत गोदावरी नदीचा नकाशा, मुहूर्त चिंतामणी, धर्म सिंधू, निर्णय सिंधू तसेच महाराष्ट्रीयन, सम्राट व निर्णय सागर पंचांगांचा आधार घेऊन हा निर्णय घेण्यात आला. सभेत सांगण्यात आले की, या कालावधीत नक्षत्र पंचपाद व गुरु नवमांशाचा विशेष दोष राहील. त्यामुळे २३ जानेवारी २०२७ नंतरच शुभ कार्ये करण्यात यावीत. दरम्यान, २०२६-२७ मध्ये नाशिक येथे कुंभमेळा होणार आहे. सिंहस्थ गुरु दोषाचे नियम मलमास व गुरु-शुक्र अस्ताप्रमाणे पाळले जातात. मात्र वेगवेगळ्या गावांसाठी व राज्यांसाठी हे नियम बदलू शकतात, असेही पुरोहित संघाने स्पष्ट केले. आधुनिक ज्योतिषशास्त्राचे काही जाणकार सिंह राशीतील गुरु दोष मानत नाहीत, असेही सभेत नमूद करण्यात आले. सभेला पं. रमेश अडीचवाल, रतन तिवारी, नरेंद्र पंचारिया, लाला तिवारी, राजूभाई जाडा, प्रमोद तिवारी, श्याम सुंदर अवस्थी, आलोक शर्मा, सुमित तिवारी, भैरव शर्मा, सुरेश सिवाल व पं. रवि कुमार शर्मा आदी पुरोहित उपस्थित होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर