ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

स्वारगेट अत्याचार प्रकरणाला वर्ष, पीडिता न्यायाच्या प्रतीक्षेत:893 पानी आरोपपत्र असूनही न्यायालयीन प्रक्रिया थांबलेली, पुरावे ठोस, तरीही आरोप निश्चितीच नाही

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


पुण्यासह संपूर्ण राज्यात तीव्र संताप आणि खळबळ निर्माण करणाऱ्या स्वारगेट बस डेपो अत्याचार प्रकरणाला आता वर्षाचा कालावधी पूर्ण झाला आहे. मात्र एवढा काळ लोटूनही आरोपीविरुद्ध न्यायालयात आरोप निश्चिती झालेली नाही. त्यामुळे खटल्याची नियमित सुनावणी सुरू होण्यास विलंब होत आहे. या प्रकरणातील पीडिता अद्याप न्यायाच्या प्रतीक्षेत असून, न्यायालयीन प्रक्रियेतील टप्पे पूर्ण होण्याची वाट पाहत आहे. आरोपी दत्तात्रय गाडे याने जामीन मिळवण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे, तर पुणे सत्र न्यायालयात निर्दोष मुक्ततेचा अर्ज दाखल केला आहे. या अर्जांवर निर्णय झाल्यानंतरच आरोप निश्चिती होणार असल्याने संपूर्ण प्रक्रिया थांबलेली आहे. घटनेचा तपशील पाहता, 25 फेब्रुवारी 2025 रोजी पहाटे पावणेसहा ते पावणेसातच्या सुमारास पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात उभी असलेल्या शिवशाही बसमध्ये ही गंभीर घटना घडली. आरोपी दत्तात्रय रामदास गाडे (वय 37, रा. गुनाट, ता. शिरूर) याने तरुणीवर दोन वेळा अत्याचार केल्याचा आरोप आहे. घटनेनंतर तो घटनास्थळावरून फरार झाला होता. आपल्या मूळ गावी जाऊन शेतात लपून बसलेल्या आरोपीला पुणे पोलिसांनी अटक केली. त्याला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले आणि न्यायालयाने 12 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. त्यानंतर त्याची रवानगी येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. या प्रकरणाचा तपास शैलेश संखे यांच्या पथकाने वेगाने पूर्ण केला. अवघ्या 52 दिवसांत 893 पानी आरोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले. गुन्हे शाखेने प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. ए. मकानदार यांच्या न्यायालयात हे आरोपपत्र सादर केले. तपासादरम्यान 82 साक्षीदारांची चौकशी करण्यात आली असून, त्यापैकी पाच जणांचे जबाब न्यायालयात नोंदवण्यात आले आहेत. एकूण 12 पंचनामे करण्यात आले. त्यात गुगल सर्च हिस्टरी, तुलनात्मक ध्वनी तीव्रता पडताळणी, ओळख परेड, सीसीटीव्ही फुटेज आणि निवेदन यांचा समावेश आहे. या सर्व पुराव्यांच्या आधारे आरोपी गुन्ह्याच्या वेळी घटनास्थळी उपस्थित असल्याचे थेट आणि परिस्थितीजन्य पुरावे पोलिसांनी मांडले आहेत. तपासात समोर आलेल्या मुद्द्यांनुसार, घटनास्थळी दोघांचे केस तसेच आरोपीच्या शर्टाचे बटण सापडले. रासायनिक प्रयोगशाळेच्या तपासणीत हे केस आरोपी गाडेचेच असल्याचे स्पष्ट झाले. गुन्हा घडताना त्याने परिधान केलेला शर्टही पोलिसांनी जप्त केला आहे. शिवाय आरोपी लैंगिकदृष्ट्या सक्षम असल्याचा अहवाल ससून रुग्णालयातील तीन तज्ज्ञ डॉक्टरांनी दिला आहे. पाच प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी आरोपीला पहाटेपासून स्वारगेट स्थानकात पाहिल्याचे सांगितले असून, तो पीडितेशी बोलत असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. त्यांचे जबाब न्यायालयात नोंदवण्यात आले आहेत. सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या आधारेही आरोपी घटनास्थळी उपस्थित असल्याचे प्रयोगशाळेच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. आरोपीचा मोबाईल अद्याप सापडलेला नसला तरी त्याच्या क्रमांकावरून सायबर तज्ज्ञांनी गुगल सर्च हिस्टरी तपासली. त्यात आरोपी वारंवार अश्लील व्हिडिओ पाहत असल्याचे आढळले. त्यामुळे गुगल सर्च हिस्टरीचा पंचनामा करण्यात आला. याशिवाय पोलिसांनी प्रथमच तुलनात्मक ध्वनी तीव्रता पडताळणी केली. शिवशाही बसमधून बाहेर आवाज ऐकू येतो का, याची तांत्रिक तपासणी करण्यात आली; मात्र आवाज बाहेर येत नसल्याचे निष्पन्न झाले. ओळख परेडमध्ये पीडित तरुणीने आरोपीला ओळखले आहे. या प्रकरणात आरोपीचा डीएनए घटनास्थळी सापडलेल्या पुराव्यांशी जुळल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. एसटी महामंडळातील चालक-वाहक, कॅबचालक, रिक्षाचालक तसेच वैद्यकीय अहवाल यांसारखे महत्त्वाचे पुरावे आरोपपत्रासोबत जोडण्यात आले आहेत. पीडितेने घटनेनंतर चालक-वाहकांना माहिती देऊन आरोपीचा शोध घेण्याची विनंती केली होती. त्या कर्मचाऱ्यांचे जबाबही न्यायालयात नोंदवले गेले आहेत. पुरवणी आरोपपत्र दाखल करण्याची परवानगीही न्यायालयाने पोलिसांना दिली आहे. मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी याचिका दाखल दरम्यान, आरोपी दत्तात्रय गाडेने यापूर्वी पुणे न्यायालयात केलेले जामीन अर्ज फेटाळण्यात आले. त्यानंतर त्याने वकिलामार्फत मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी याचिका दाखल केली आहे. तसेच पुणे सत्र न्यायालयात निर्दोष मुक्ततेचा अर्ज सादर केला आहे. या दोन्ही अर्जांवर पुणे पोलिस, सरकारी पक्ष आणि पीडितेच्या वकिलांनी जोरदार विरोध केला आहे. या खटल्यात सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील अजय मिसार काम पाहत आहेत, तर पीडितेच्या वतीने ॲड. श्रीया आवले बाजू मांडत आहेत. न्यायालय या अर्जांवर निर्णय दिल्यानंतरच आरोप निश्चितीची प्रक्रिया पूर्ण होईल आणि खटल्याच्या नियमित सुनावणीचा मार्ग मोकळा होईल. तोपर्यंत मात्र पीडिता आणि तिचे कुटुंब न्यायाच्या प्रतीक्षेतच राहणार आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर