ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

अशोक खरातच्या पत्नीचा पाय खोलात:अटकपूर्व जामिनावरील सुनावणी लांबली; ‘नसरापूर’ आरोपीला 24 मे पर्यंत पोलिस कोठडी

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


महाराष्ट्रात गाजत असलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणात एक नवी अपडेट आहे. न्यायालयाने खरातच्या पत्नीच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी करणे टाळले आहे. त्यावर आता मे महिन्याच्या अखेरीस सुनावणी होण्याची शक्यता आहे. यामुळे खरातच्या पत्नी कल्पना यांचा पाय आणखी खोलात गेल्याची चर्चा आहे. दरम्यान, न्यायालयाने नसरापूर येथील अल्पवयीन मुलीवरील बलात्कार व हत्या प्रकरणातील आरोपीला 24 मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. भोंदू अशोक खरातची पत्नी कल्पना खरात सध्या फरार आहे. त्यांनी यापूर्वी राहता येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी याचिका केली होती. पण कोर्टाने ती फेटाळून लावली होती. त्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली. पण त्यांना तिथेही दिलासा मिळाला नाही. कल्पना खरातवर शिर्डी पोलिस ठाण्यात फसवणूक व बेकायदा सावकारीचा गुन्हा दाखला आहे. या गुन्ह्यात अशोक खरात व इतर आरोपींनी शेतकऱ्यांची 10 कोटींची जमीन बळकावल्याचा प्रयत्न केला होता. कल्पना खरातच्या वकिलांनी हा दिवाणी दावा असल्याचे नमूद करत या प्रकरणात यापू्र्वीच नोटीस बजावण्यात आल्याची बाब कोर्टाच्या निदर्शनास आणून दिली. जामिनावर मे च्या शेवटी सुनावणी होण्याची शक्यता कल्पना खरातचे वकील कोर्टाला म्हणाले, अशोक खरातवरील आरोपांमुळे संपूर्ण कुटुंब लज्जित झाले आहे. त्यामुळे आमच्या अटकपूर्व जामिनावर तात्काळ सुनावणी घेतली जावी. या प्रकरमी गत 6 मे रोजी नोटिसा जारी करण्यात आल्या होत्या. प्रकरण 12 मे रोजी ठेवण्याची मुभा देण्यात आली होती. पण आज न्यायालयीन कामकाजावरील ताण व प्रकरणातील गुणदोषांच्या आधारावर सुनावणी होऊ शकली नाही. आम्ही या प्रकरणी तातडीची सुनावणी घेण्याची मागणी केल्यामुळे कोर्टाने आम्हाला चालू महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात न्यायालयीन सुट्टीत हे प्रकरण मांडण्याची मुभा दिली. नसरापूर प्रकरणातील आरोपीला 24 मेपर्यंत पोलिस कोठडी दुसरीकडे, नसरापूर बलात्कार व हत्या प्रकरणातील आरोपीला कोर्टाने 14 मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या आरोपीला आज पुण्याच्या शिवाजीनगर सत्र न्यायालयात ऑनलाईन पद्धतीने हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने आरोपीला पोलिसांविरोधात काही तक्रार आहे का? असा प्रश्न केला. त्यावर आरोपीने नाही असे उत्तर दिले. या प्रकरणी संक्षिप्त सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने आरोपीला 24 मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. या 70 वर्षीय आरोपीवर एका 4 वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केल्याचा आरोप आहे. आरोपीने मुलीची हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवून ठेवला होता.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर