ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

डोंबिवली हादरली!:10 बिअर आणि 45 झोपेच्या गोळ्या घेऊन डॉक्टरचा आत्महत्येचा प्रयत्न, काय आहे प्रकरण?

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


डोंबिवली येथील एका नामांकित रुग्णालयातील डॉक्टरने 10 बिअर आणि तब्बल 45 झोपेच्या गोळ्यांचे सेवन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या टोकाच्या पाऊलामुळे डोंबिवलीच्या वैद्यकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, सुदैवाने वेळीच उपचार मिळाल्याने या डॉक्टरचे प्राण वाचले आहेत. विशेष म्हणजे, आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या या डॉक्टरची पत्नी देखील शहरातील एक नामांकित डॉक्टर असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, एका नर्ससोबत असलेल्या प्रेमसंबंधातून हा सर्व प्रकार घडला आहे. संबंधित नर्स लग्नासाठी वारंवार तगादा लावत असल्याने मानसिक दडपणाखाली येऊन डॉक्टरने हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणी डोंबिवलीतील विष्णूनगर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असून घटनेचा सखोल तपास सुरू केला आहे. प्रेमप्रकरण आणि त्यातून झालेला हा आत्महत्येचा प्रयत्न सध्या शहरात चर्चेचा विषय ठरला आहे. 10 बिअर आणि तब्बल 45 झोपेच्या गोळ्यांचे सेवन डोंबिवलीतील एका नामांकित डॉक्टरने नर्ससोबतच्या प्रेमसंबंधांतून उद्भवलेल्या वादातून 10 बिअर आणि तब्बल 45 झोपेच्या गोळ्यांचे सेवन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संबंधित नर्स लग्नासाठी वारंवार तगादा लावत असल्याने आलेल्या मानसिक दडपणातून डॉक्टरने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले असून, सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. या प्रकरणाची विष्णूनगर पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून, वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडवून देणाऱ्या या घटनेचा सखोल तपास सुरू केला आहे. डॉक्टर बेशुद्ध अवस्थेत आढळले समोर आलेल्या माहितीनुसार, रुग्णालयातील एका नर्ससोबत प्रेमसंबंधामुळे संबंधित डॉक्टर काही काळापासून दुसऱ्या घरात स्वतंत्र राहत होते. त्याच ठिकाणी त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. डोंबिवली पश्चिमेतील विष्णूनगर पोलिस स्टेशन हद्दीतील हे नामांकित रुग्णालय असून पती-पत्नी दोघेही डॉक्टर मिळून ते चालवतात. संबंधित डॉक्टर रुग्णालयात हजर न राहिल्याने त्यांना वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र प्रतिसाद न मिळाल्याने कर्मचारी त्यांच्या निवासस्थानी गेले. दरवाजा उघडून आत प्रवेश केला असता डॉक्टर बेशुद्ध अवस्थेत आढळले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डोंबिवलीतील नामांकित डॉक्टरने परिचारिकेसोबत असलेल्या प्रेमसंबंधांतून आणि त्यातून उद्भवलेल्या कौटुंबिक कलहामुळे आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित परिचारिकेने लग्नासाठी लावलेला तगादा आणि डॉक्टर विवाहित असल्याने निर्माण झालेला दुरावा, यामुळे आलेल्या टोकाच्या मानसिक दडपणातून त्यांनी मद्यप्राशन करून मोठ्या प्रमाणात झोपेच्या गोळ्या घेतल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. पती-पत्नीमधील वादामुळे गेल्या काही दिवसांपासून ते डोंबिवलीतील एका उच्चभ्रू सोसायटीत स्वतंत्र राहत होते; या प्रकरणाचा पुढील तपास विष्णूनगर पोलिसांकडून सुरू असून या घटनेने वैद्यकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर